नाशिक। प्रतिनिधी: कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना जिल्हा परिषदेच्या विविध यंत्रणेमार्फत राबविली जात आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेत झाली. यावेळी सुरक्षित अंतर ठेवून चर्चा करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संजय बनकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप)रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मबाक) दीपक चाटे व शिक्षणाधिकारी वैशाली झनकर उपस्थित होते. फोटो: टीम अँकर वेंटिलेटर्सची गरज पडल्यास जिल्हा स्तरावर संदर्भित करणार:- डॉ. कपिल आहेर प्रशासकीय पातळीवरील कोरोना प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक औषध खरेदी, औषधी साहित्य वाटप व कोरोना रुग्ण आढळलेल्या तालुक्यात प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय संशयित रुग्णशोध व आरोग्य शिक्षण...