- आधुनिक सुविधायुक्त हॉस्पिटल्ससह सीजीएचएस वेलनेस सेंटरच्या विस्तारीकरणावर भर देणार: डॉ. भारती पवार - TheAnchor

Breaking

January 3, 2022

आधुनिक सुविधायुक्त हॉस्पिटल्ससह सीजीएचएस वेलनेस सेंटरच्या विस्तारीकरणावर भर देणार: डॉ. भारती पवार

मुंबई| नाशिक| एम्स राज्यात नागपूर येथे आहे, एका राज्यात एकच एम्स असल्याने त्यामुळे येथे ते देता येत नसले तरी सीजीएचएस वेलनेस सेंटरच्या माध्यमातून आधुनिक सुविधा युक्त हॉस्पिटल्स तयार करून त्याच्या विस्तारीकरणासाठी पुढील काळात प्रयत्न केले जातील अशी ग्वाही केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांनी आज येथे दिली. 
CGHS-will-focus-on-expansion-of-wellness-center-with-modern-facilities-Dr-Bharti-Pawar
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांच्या हस्ते आज केंद्र सरकारच्या आरोग्य योजने अंतर्गत गांधीनगर नाशिक येथील नवीन अॅलोपॅथिक निरामय स्वास्थ्य केंद्राचे उद्घाटन झाले. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना त्याबोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर महापौर सतीश कुलकर्णी, खा. हेमंत गोडसे, आ. देवयानी फरांदे, ज्येष्ठ भाजप नेते लक्ष्मण सावजी, भाजप शहराध्यक्ष गिरीष पालवे, आ. सीमा हिरे, आ. सरोज अहिरे, विजय साने, नगरसेवक अनिल ताजनपुरे, राहुल दिवे, नगरसेविका सुषमा पगारे, कुणाल वाघ, दिल्ली येथील सीजीएचएसचे संचालक निखिलेश चंद्र आणि मुंबई येथील सीजीएचएसच्या अवर संचालक डॉ.डी.एम.देसाई, प्रेस कामगार युनियनचे अध्यक्ष राम हरक, सचिव रवी आवरकर यांच्यासह सीजीएचएस केंद्राचे अधिकारी, प्रेस कर्मचारी युनियनचे सभासद व पदाधिकारी, केंद्र सरकारचे सेवारत आणि निवृत्तीधारक उपस्थित होते. 
आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार पुढे म्हणाल्या की, हे सरकार केंद्राच्या सेवारत कर्मचाऱ्यांचा निवृत्तीनंतर देखील काळजी घेणारे सरकार आहे. नरेंद्र मोदींच्या माध्यमातून देशाला असे पंतप्रधान लाभले आहे ज्यांनी आपल्या कार्यकाळात विकासाला गती दिली आहे. ७० वर्षात जे झाले नाही त्यांनी करुन दाखविले. माजी पंतप्रधान अटबिहारी वाजपेयी यांच्या काळात ७ एम्स होते. मोदींच्या नेतृत्वात आता २२ एम्स उभे राहिले. १५७ वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी दिली. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, महापौर सतीश कुलकर्णी, केंद्र सरकारच्या कर्मचारी युनियननी सातत्याने सीजीएचएस वेलनेस केंद्राची मागणी केली. मी देखील वेळोवेळी पाठपुरावा केला. निवृत्तीधारकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिले त्यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्नशील होते. त्यात नाशिक जिल्ह्याला केंद्रात मंत्रीपद लाभल्याने वेलनेस सेंटरचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले. चांगली वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी या वेलनेस सेंटरच्या यादीत आणखी हॉस्पिटलचा समावेश करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


नाशिक सीजीएचएस सेंटर महाराष्ट्रतील चौथे शहर: आ. देवयानी फरांदे
 
सीजीएचएस सेंटरच्या माध्यमातून नाशिक शहरासाठी ही मोठी उपलब्धी आहे. नाशिक सीजीएचएस वेलनेस सेंटर हे मुंबई, पुणे आणि नागपूरनंतर महाराष्ट्रातील चौथे शहर आहे. या ठिकाणी मोठी जागा उपलब्ध आहे, त्यामुळे येथे एखादा मोठा कारखाना किंवा मोठा प्रकल्प आणावा अशी मागणी या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी म्हणून आ. देवयानी फरांदे यांनी केली. 

केंद्राच्या सुमारे दीड लाख सेवारत आणि निवृत्ती धारकांना फायदा: महापौर सतीश कुलकर्णी

महापौर सतीश कुलकर्णी यांनी एम्सच्या तोडीचे हॉस्पिटल बनवता येईल का यावर मंत्र्याचे लक्ष वेधले. तसेच ते म्हणाले, केंद्र सरकारच्या सीजीएचएस वेलनेस सेंटरच्या माध्यमातून चांगली सेवा उभी राहिली आहे. या सेवेचा लाभ केंद्राच्या १.६ लाख सेवारत आणि निवृत्तीधारकांना लाभ मिळणार आहे. त्यात आणखी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याची त्यांनी मागणी केली.

निवृत्तीधारकांची संख्या बघता आणखी १० केंद्रांची गरज: खा. हेमंत गोडसे

केंद्र सरकारच्या कामगार संघटनांनी केलेला पाठपुरावा, त्यासाठी सातत्याने संसदेत केलेली मागणी केली. मात्र संसदेत नुसते प्रश्न मांडून चालत नाही तर सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा लागतो. केंद्राने १६ सेंटरला परवानगी दिली त्यात नाशिक हे पहिले केंद्र ठरले आहे. या केंद्रासाठी जागेची आवश्यकता होती. आदी सिडको आणि इतर ठिकाणी शोध घेतला पण गांधीनगरची जागा योग्य असल्याने या ठिकाणी केंद्र निश्चित झाले, असे सांगून निवृत्तीधारकांची सख्या बघता अशा आणखी १० केंद्रांची गरज असल्याचे खा. हेमंत गोडसे यांनी सांगितले


सध्या संपूर्ण देशातील 74 शहरांमधील अंदाजे 38.5 लाख लाभार्थी केंद्र सरकारी आरोग्य योजनेत समाविष्ट आहेत. सरकारी आणि सीजीएचएस योजनेअंतर्गत समाविष्ट केलेल्या निवृत्तीवेतनधारक आणि इतर निवडक लाभार्थ्यांसाठी या योजनेत समाविष्ट केलेल्या केंद्रांमध्ये उपचारांसाठी उपलब्ध रोखरहित सुविधा, आपत्कालीन परिस्थितीत शासकीय/खासगी रुग्णालयांमध्ये घेतलेल्या उपचारांच्या खर्चाची परतफेड, श्रवणयंत्र, कृत्रिम अवयव, उपकरणे इत्यादी खरेदीसाठी झालेल्या खर्चाचा परतावा  आणि कुटुंब कल्याण, माता आणि बाल आरोग्य सेवा यासह नाशिकमधील सीजीएचएस निरामय स्वास्थ्य केंद्र  ओपीडी अर्थात बाह्य रुग्ण विभागाद्वारे  उपचार प्रदान करेल.

सीजीएचएस निरामय स्वास्थ्य केंद्राचा शहरातील सुमारे 71,000 सेवारत आणि निवृत्तीवेतनधारक केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह सुमारे 1.6 लाख लाभार्थ्यांना फायदा होईल. यापूर्वी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सीजीएचएस निरामय स्वास्थ्य केंद्राचे उपचार घेण्यासाठी मुंबई किंवा पुण्याला जावे लागत होते.