Skip to main content

Posts

Showing posts from December, 2022

युवक क्रांती दलाच्या मराठवाडा विभाग संघटकपदी शाम तोडकर

औरंगाबाद| युवक क्रांती दलाचा तरुण आणि लढाऊ चेहरा म्हणून शाम तोडकर मानले जातात. संघटना वाढविण्यासाठी ते मराठवाडय़ात लवकरच दौरा करणार असून युवती आणि महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. येणाऱ्या काळात शेतकरी, विद्यार्थी आणि दुर्बल घटकांसाठी विशेष कार्यक्रम राबविणार आहेत, अशी माहीती शाम तोडकर यांनी निवडीनंतर माध्यमांशी बोलताना  दिली.  युवक क्रांती दलाची बैठक नुकतीच पुणे येथे पार पडली, युक्रांदचे ज्येष्ठ नेते अन्वर राजन यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.  त्यात शाम तोडकर यांची मराठवाडा संघटकपदी एकमताने निवड करण्यात आली.   युक्रांदच्या राज्य उपाध्यक्षपदी संदीप बर्वे, कार्यवाहपदी जांबुवंत मनोहर, राज्य संघटकपदी अप्पा अनारसे, सहकार्यवाहपदी राजकुमार डोंबे व रश्मी सोवनी यांची निवड करण्यात आली. युक्रांदचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी पुणे शहराध्यक्ष सचिन पांडुळे, नगर जिल्हाध्यक्ष सुदाम लगड, नीलम पंडीत, सुदर्शन चखाले, प्रसन्न मराठे

क्रिकेटपटू ऋषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी, अपघातानंतर कार जळून खाक

नवी दिल्ली|दिल्ली-डेहराडून महामार्गावर रुडकी येथे मर्सिडिज कार डिव्हायडरवर आदळून झालेल्या अपघातात भारताचा क्रिकेटपटू ऋषभ पंत गंभीर जखमी झाला. आज पहाटे ५.३०च्या सुमारास साखर झोप लागल्याने कार डिव्हायडर आदळून  हा अपघात झाला अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. सुदैवाने या अपघातातून तो बचावला असून त्याच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाली आहे. फोटो: सोशल मीडिया  कार अपघात इतका भयानक होता की अपघातानंतर कारचा जळून कोळसा झाला,  परंतु तत्पूर्वी ऋषभ पंत गाडीतून काच तोडून बाहेर आल्याने त्याचे प्राण वाचले त्यानंतर गाडीला आग लागून तिचा कोळसा झाला असे एका वृत्तवाहिनीशी बोलतांना प्रत्यक्षदर्शीने सांगितले. त्यानंतर १०८ क्रमांकावर सूचना देऊन रुग्णवाहिका बोलवण्यात आली आणि उपचारांसाठी रूडकी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली, त्याला पुढील उपचारासाठी दिल्लीला हलविण्यात आल्याचे पोलिसांनी माध्यमांना सांगितले.

पंतप्रधानांच्या मातोश्री श्रीमती हीराबेन मोदी यांचे निधन

मुंबई|  पंतप्रधानांच्या   मातोश्री   श्रीमती हीराबेन   मोदी (वय१००)   यांचे आज   निधन   झाले. त्यांच्यावर अहमदाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली गांधीनगर येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  त्यांच्यानिधनानंतर  आपल्या   ट्विटर   संदेशात   पंतप्रधान   म्हणाले : " एका   समर्पित   शतायुषी   जीवनाचा   ईश्वरच रणी    शानदार   विराम ...,  एक   तपस्वी   जीव न यात्रा ,  निष्काम   कर्मयोगाचे    प्रतीक   आणि मूल्यांवरील   अचल   निष्ठा   यांना   हे   जीवन  समर्पित  झाले   होते . मी   जेव्हा   त्यांना  100  व्या   वाढदिवसाच्या   दिवशी   भेटलो   तेव्हा   त्यांनी   एक   गोष्ट   मला सांगितली ,  जी   नेहमी   माझ्या   स्मरणात  रा हील ,'  कार्य   करा   बुद्धीने ...

'कॅट'च्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी संजय सोनवणे; संघटकपदी सौ.निलीमा पाटील तर महाराष्ट्र कॅट सचिवपदी मेहुल थोरात यांची निवड

नाशिक|राष्ट्रीय स्तरावरील संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स ( कॅट) च्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी महाराष्ट्र चेंबरचे उत्तर महाराष्ट्र शाखा को- चेअरमन संजय सोनवणे, महिला संघटकपदी सौ. निलीमा पाटील, तर महाराष्ट्र कॅटच्या जॉईंट सेक्रेटरी पदी मेहुल थोरात यांची नियुक्ती केल्याचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सचिन निपूंगे यांनी जाहीर केले.  संजय सोनवणे  सौ. निलीमा पाटील  मेहुल थोरात  श्री संजय सोनवणे यांचा सामाजिक कार्यातील प्रदीर्घ अनुभव, संघटन कौशल्य, आणि अभ्यासू वृत्ती , सौ नीलिमा पाटील यांचा उद्योग व्यापार शेत्रात केलेले काम, आणि श्री मेहुल थोरात यांचा जेम ज्वेलरी सराफी, व्यावसायिक अनुभव चा कॅट या संघटनेला निश्चित फायदा होईल अशी खात्री श्री सचिन निपुंगे यांनी व्यक्त केली, पद्यश्री बाबुभाई राठी सभागृह येथे  महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, कॅटचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सचिन नीपुंगे  यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यांच्या अडचणीं बाबत व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. स्वागत महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी केले....

या सहा देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना RTPCR करावी लागणार

नवी दिल्ली |कोविड- 19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्य कुटुंब कल्याण विभागाने चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड येथून भारतात प्रवास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी त्या देशांमधून निघण्यापूर्वी RTPCR चाचण्या करणे अनिवार्य करण्यात आले आहे. वरील देशातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 1 जानेवारी 2023 पासून हवाई सुविधा पोर्टलवर कोविड नकारात्मक RTPCR चाचणी अहवाल अपलोड करणे आवश्यक करण्यात आहे. भारताचा प्रवास सुरू केल्यापासून 72 तासांच्या आत चाचणी घेण्यात यावी असे स्पट करण्यात आले आहे.

नाशकात रिलायन्स जिओची 5G सेवा देण्याची घोषणा

नाशिक|प्रतिनिधी| नाशकात रिलायन्स जिओतर्फे ट्रू 5G सेवा देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये 5G सेवा सुरू करणारी रिलायन्स जिओ ही पहिली आणि एकमेव ऑपरेटर कंपनी ठरली आहे. आता जिओ वापरकर्ते 1 GBPS+ पर्यंतच्या स्पीडसह अमर्यादित 5G डेटाचा आनंद कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय घेऊ शकणार आहे. जिओ ट्रू 5G सेवा मिळवण्यासाठी ग्राहकांना त्यांचे सिम कार्ड बदलण्याची गरज नाही. त्यांना एक जिओ 5G नेटवर्क सुसंगत 5G हँडसेट, राहत्या/ कामाच्या ठिकाणी 5G नेटवर्कची उपलब्धता तसेच प्रीपेड आणि सर्व पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी 239 किंवा अधिक वैध सक्रिय योजनेवर असणे आवश्यक असेल. एकदा या निकषांची पूर्तता झाल्यानंतर, जिओ ग्राहकांना जिओ वेलकम ऑफर मिळेल असे सांगण्यात आले आहे.

ओबीसींच्या प्रश्नासाठी कोणतेही सरकार आले तरी संघर्ष करावा लागतो: छगन भुजबळ

नागपूर| ओबीसींच्या प्रश्नासाठी कोणतेही सरकार आले तरी आम्हाला संघर्ष हा करावाच लागतो असे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज राष्ट्रवादी भवन नागपुर येथे व्यक्त केले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की गेले अनेक दिवस प्रलंबित असलेला पुण्यातील भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरू करून स्मारक उभे करणे आणि फुले वाड्याचा विस्तारीकरणाचा प्रश्न आम्ही मार्गी लावला आहे. यासाठी समता परिषद आणि बाबा आढाव यांनी उपोषण केले होते त्यामुळे सरकार सोबत मी बैठक घेतल्या.हा प्रश्न दोन महिन्यात मार्गी लावण्याच्या सूचना मी दिल्या त्याच प्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. ओबीसींची जातीय जनगणना आपण केली पाहिजे अशी आपली मागणी जुनीच आहे. ओबीसींच्या जनगणनेच्या इतिहासाची आठवण त्यांनी यावेळी उपस्थितांना करून दिली.  जनगणना करण्याची मागणी ही समीर भुजबळ यांनी संसदेत केली आणि त्याला दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, शरद...

जिजाबाई मुरलीधर पाटील यांचे निधन

नाशिक| गंगापूर येथे राहणाऱ्या सौ.जिजाबाई पाटील (७५) यांच आज अल्पशा आजाराने निधन झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा श्रीनिवृत्तीनाथ महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष  मुरलीधर  पाटील यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात मुली, मुलगा, पुतण्या, भाऊ असा मोठा परिवार आहे.  गंगापूर अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त करून भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. त्यावेळी श्रीनिवृत्तीनाथ महाराज  पंचक्रोशी मंडळाने ही श्रद्धांजली वाहिली.

राजधानीतील खानपान सेवेच्या तक्रारींची रेल्वेकडून दखल; रेल्वेने केल्या या नव्या उपाय योजना

मुंबई|रेल्वेतील खानपान सेवेबाबत आलेल्या तक्रारी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने राजधानी गाड्यांसह इतर रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या अन्नाचा  दर्जा सुधारण्यासाठी नव्या उपाय योजना हाती घेतल्या आहे. प्रवाश्यांना अधिक दर्जेदार खानपान देण्यासाठी उपाय योजना केल्या जाणार आहे, अशी  माहिती रेल्वे ,  दूरसंवाद  आणि इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.   1) बेस किचन/स्वयंपाकगृह युनिट्सचे आधुनिकीकरण हाती घेतले.बेस किचन/स्वयंपाक गृहामध्ये स्वयंपाक तयार करत असताना प्रत्यक्ष देखरेख करण्याच्या दृष्टीने सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. 2) राजधानी गाड्यांमध्ये भारतीय रेल्वे खानपान आणि  पर्यटन महामंडळ लिमिटेड (आय.आर.सी.टी.सी) पर्यवेक्षकांची नियुक्ती. खाद्यपदार्थांच्या पॅकेट्सवर QR कोड लावले आहेत ज्यावर किचनचे नाव, पॅकेजिंगची तारीख, कालबाह्यता तारीख, वजन इत्यादी तपशील दिले आहेत. 3) पॅन्ट्री कार आणि किचन युनिटमधील स्वच्छता आणि  आरोग्यपूर्ण स्थिती तपासण्यासाठी तृतीय पक्ष लेखापरीक्षण ...

नव्या व्हेरियंटबाबत आरोग्य खाते सतर्क; राज्यांनी पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने इन्साकॉगकडे पाठवावे: डॉ मांडविया

नवी दिल्ली|केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी काही देशांमध्ये कोविड-19 रुग्णांच्या संख्येत नुकत्याच झालेल्या वाढीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतातील कोविड-19 परिस्थितीचा आणि स्थितीवर देखरेख, प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य प्रणालीच्या सज्जतेचा  एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला.   या बैठकीला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती प्रवीण पवार, नीती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉक्टर व्ही के पॉल आणि इतर वरिष्ठ अधिकारी तसेच सार्वजनिक आरोग्य तज्ञ उपस्थित होते.  यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना जगभरातल्या कोविड-19 परिस्थितीची आणि स्थानिक पातळीवर दिसत असलेल्या चित्राची माहिती देण्यात आली. चीन, जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स आणि अमेरिका यांसारख्या काही देशांमध्ये कोविड-19 रुग्णांच्या संख्येत झालेल्या वाढीने निर्माण झालेल्या आव्हानाला अधोरेखित करत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी आपल्या सज्जतेचे आणि नव्या आणि उदयाला येणाऱ्या कोविड-19 परिवर्तकाच्या विरोधात, विशेषतः आगामी काळात येऊ घातलेल्या उत्सवाच्या तोंडावर  सज्ज राहण्याचे आणि दक्ष राहण...

'एआयडब्लूपीए'च्या अध्यक्षपदी जगदीश होळकर तर उपाध्यक्षपदी प्रियंका सावे यांची निवड

नाशिक| प्रतिनिधी| भारतीय वाईन उत्पादक संघटनेच्या अध्यक्षपदी एकमताने जगदीश होळकर यांची निवड करण्यात आली आहे. (AIWPA) 'एआयडब्लूपीए'च्या  व्यवस्थापकीय समिती सदस्यांची बैठक नाशिक येथील सोमंदा वीनयार्ड आणि रिसॉर्ट येथे झाली. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.  अध्यक्ष: जगदीश होळकर   सचिव: राजेश जाधव कोषाध्यक्ष: राजेश बोरसे जगदीश होळकर हे भारतातील वाईन क्षेत्रातील अभ्यासू तज्ज्ञ म्हणून देशविदेशात परिचित असून त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले. संघटनेची कार्यकारणी पुढीलप्रमाणे आहे उपाध्यक्षपदी श्रीमती प्रियंका सावे तर सचिव म्हणून राजेश जाधव आणि कोषाध्यक्षपदी राजेश बोरसे यांची निवड करण्यात आली. प्रियंका सावेंच्या रुपाने संघटनेत पहिल्यांदाच एका महिला उद्योजिकेची निवड झाली आहे.  या निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येऊन भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या, तसेच ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडल्याबद्दल सर्व व्यवस्थापकीय समितीची सदस्य आणि पदाधिकाऱ्यांचे नीरज अग्रवाल आणि सदाशिव नाठे यांनी आभार मानले.

सीमावासियांच्या पाठिशी एकत्रितपणे उभे राहू: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर| सीमावासियांच्या पाठिशी सर्वपक्षीयांनी एकत्रितपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंबंधी उपस्थित केलेल्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी निवेदन केले. मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, मराठी माणूस आणि मराठीच्या अस्मितेशी निगडीत या विषयावर केंद्राने गांभीर्याने दखल घेऊन बैठक बोलविली. या बैठकीत राज्याने ठोस भूमिका घेतली. केंद्रीय गृहमंत्री यांनी घेतलेल्या बैठकीत सीमेवर राज्यातील गाड्या अडविल्या जातात, ही बाब लोकशाहीला धरून नाही, ही माहिती दिली.  कुठल्याही परिस्थ‍ितीत अशा प्रकारची घटना होऊ नये. हा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे या विषयावर सामंजस्याची भूमिका घ्यावी. कर्नाटकचे मुख्यमंत्री अणि गृहमंत्री यांच्या उपस्थितीत केंद्राने भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली आहे, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले. सीमावासियांसाठी शासन सकारात्मक असून काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 48 गावांसाठी दोन हजार कोटींची सिंचन योजना मंजूर केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी सभागृहाला दिली.

'कोवळे किरण- संवाद आपुलकीचा' अंतर्गत समुपदेशन शिबिर

नाशिक| सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्लिश मीडियम या शाळेत पालकांसाठी' कोवळे किरण -संवाद आपुलकीचा' या विषयावर समुपदेशनपर व्याख्यान संपन्न झाले. पालकांचे वर्तन - मुलांचे अनुकरण याविषयी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पश्चिम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध  होमिओपॅथिक मानसोपचारतज्ञ डॉ. वृषिनीत सौदागर यांनी  व्याख्यानातून मुलांच्या मानसिक शारीरिक, शैक्षणिक व सामाजिक, समस्यांवर  अतिशय  हसत खेळत, सर्वंकष उदाहरणे देऊन सोप्या, पटेल, रुचेल अशा शब्दांमध्ये प्रभावीपणे  समुपदेशन केले.  कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने झाला, संस्थेचे पालक नितीनजी गर्गे यांनी प्रास्ताविकामध्ये पालकांशी पाल्याच्या हिताविषयी संवाद साधला. प्रमुख वक्ते डॉ. वृषिनीत सौदागर यांनी चित्रफितीद्वारे  'पालकांचे वर्तन - मुलांचे अनुकरण' या मुद्द्यावर भर दिला. मुलांचे मातीशी नाते जुळू द्या तरच त्यांची प्रतिकारशक्ती वाढेल  हे सांगतानाच व्यवहारातील उदाहरणे देऊन मानसिक शक्ती वाढावी म्हणून मुलांना अध्यात्माकडे वळवा , पाल्यांशी सुसंवाद साधा हे  स्पष...

महापुरुषांचा अपमान कदापि सहन करणार नाही: खा. शरद पवार यांचा इशारा

महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा भाजपाचा डाव कदापी यशस्वी होऊ देणार नाही !: नाना पटोले मुंबई|राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सीमावादाचा प्रश्नाने डोके वर काढले असून सीमेवरची गावं शेजारच्या राज्यात जाण्याची मागणी करत आहेत. महापुरुषांचा अपमान, सीमावाद या प्रश्नावर महाराष्ट्रद्र्योह्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा हा मोर्चा आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणला तेव्हापासून महाराष्ट्र एकसंध रहावा यासाठी प्रयत्न करण्यात आले पण ईडी सरकार मात्र महाराष्ट्राचे तुकडे करू पहात असून आम्ही ते कदापी होऊ देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.  नाना पटोले पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करण्याचे काम राज भवनातून भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून सुरु झाले आणि नंतर भाजपाच्या नेत्यांनी सातत्याने तेच काम सुरु ठेवले. भाजपा नेते सातत्याने महापुरुषांचा अपमान करत आहेत यावर जनतेत प्रचंड चीड आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुल...

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘मानस’ ॲप उपयुक्त: कुलगुरू माधुरी कानिटकर

नाशिक| विद्यार्थ्यांच्या सकारात्मक मानसिक आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी ’मानस’ अॅप उपयुक्त असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प.वि.से.प यांनी केले. आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी विद्याशाखेतील विद्यार्थ्यांकरीता विद्यापीठातर्फे ‘कुलगुरु का कट्टा’ ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प.वि.से.प यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमास मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, आयुर्वेद व युनानी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकांत देशमुख, होमिओपॅथी विद्याशाखेचे डॉ. धनाजी बागल, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे व संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.  विद्यापीठाचे मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, MANAS म्हणजे मेंटल हेल्थ आणि नॉर्मलसी ऑगमेंटेशन सिस्टम या प्रणालीचे विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील लि...

नागपूर-बिलासपूर 'वंदे भारत एक्सप्रेस' पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ

नागपूर| प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नागपूर रेल्वे स्थानकावर नागपूर-बिलासपूर शहरांदरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ या वेगवान रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. या गाडीमुळे या दोन्ही शहरांदरम्यान वेगवान रेल्वेगाडीचा पर्याय उपलब्ध झाला असून ही देशातील सहावी तर महाराष्ट्रातील दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ठरली आहे. याप्रसंगी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व  महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर यावेळी  उपस्थित होते. वंदे भारत एक्सप्रेस गाडीविषयी आज प्रारंभ झालेली देशातील ही सहावी तर महाराष्ट्रातील दुसरी वंदेभारत एक्सप्रेस ठरली आहे. स्वदेशी बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय अभियंत्यांच्या क्षमतेची साक्ष आणि‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचे फलित आहे. या एक्सप्रेस गाडीच्या माध्यमातून महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आणि छत्तीसगडची राजधानी रायपूर आणि बिलासपूर ही महत्वाची शहर जोडली जाणार. नागपूर – बिलासपूर एकूण अंतर:412 ...

समृध्दी महामार्गाच्या कोनशिलेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनावरण

नागपूर|हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या कोनशिलेचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. महामार्गाच्या नागपूर येथील झिरो पॉईंट पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या टोल प्लाझा येथे अनावरणाचा हा कार्यक्रम झाला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते. कोनशिलेचे अनावरण केल्यानंतर प्रधानमंत्र्यांनी महामार्गाची पाहणी केली. तत्पूर्वी श्री. मोदी यांनी समृद्धी महामार्गावर झिरो पॉईंट ते टोल प्लाझा असा 10 किलोमीटरचा प्रवास केला. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्य मान्यवर होते.

नवउद्योजकांनी योजनांचा लाभ घ्यावा: पल्लवी मोरे

नाशिकरोड|प्रतिनिधी| नवउद्योजकांनी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विभागीय संयोजक पल्लवी मोरे यांनी केले. जिल्हा मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेच्या कार्यकारिणीची सभा गंगापूररोड येथे झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या.   मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे, संस्थेचे जिल्हाध्यक्ष विशाल देसले,  जि ल्हा उपाध्यक्ष ॲड. माधव मुधाळे ,   सरचिटणीस उल्हास बोरसे ,  सहसचिव मनोज आमले ,   कार्याध्यक्ष उमेश शिंदे ,  खजिनदार सुनील घुले ,  अमित पवार ,  कुणाल देसले  यांची प्रमुख उपस्थिती होती. विशाल देसले म्हणाले की, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी कोणतीही लाज न बाळगता बूट पॉलिश पासून ते डोक्याच्या तेल मालिशपर्यंत कोणताही व्यवसाय स्वीकारण्यात युवकांनी लाज बाळगू नये या हेतूने मराठा उद्योजक कक्षाची स्थापना केली आहे. या कक्षाच्या माध्यमातून नवोद्योजकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध केल्या जातात. दीपक भदाणे यांनी सेवा संघाच्या उपक्रमा...

सुका मेवा खरेदीकडे ग्राहकांचा वाढतोय कल; डिंकाचे लाडू बनविण्यात महिलावर्ग व्यस्त

नाशिकरोड|प्रतिनिधी|थंडीची चाहूल जाणवल्यास ग्राहकांची पावले सुका मेवा खरेदी कडे वळतात. नाशिक मध्ये गारठा वाढल्याने सुका मेवा टाकून हिवाळ्यातील खास पदार्थ व सर्वांचे आवडते असे "डिंकाचे लाडू" तयार करण्यात घरोघरी महिलावर्ग प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकरोड, उपनगर, गांधीनगर बाजारात किराणा दुकानांमध्ये सुका मेवा खरेदी साठी ग्राहकांची विशेषतः महिलांची गर्दी होत आहे. तरुणवर्ग शरीर कमावण्यासाठी, ज्येष्ठ नागरिक तंदुरुस्तीसाठी तसेच लहान मुलांना पौष्टिक आहार हिवाळ्यात प्राप्त व्हावा, यासाठी सर्वच वयोगटातील लोकांची मागणी सुका मेव्याला असते. बदाम, काजू, खारीक, सुरी खारीक, खोबरे, डिंक, गूळ, साखर, अंजीर, जरदाळू, अक्रोड, तूप, बिब आणि चाराची गोडांबी व ईतर पौष्टिक सुका मेव्याची मागणी वाढल्याचे स्थानिक विक्रेते सांगतात.  यंदा पर्जन्यमान चांगले झाल्याने थंडी  जाणवेल, असा अंदाज हवामान तज्ञांतर्फे बांधण्यात आला होता. तो खरा ठरून साधारण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्या पासून नाशिक मध्ये गारठा वाढायला सुरुवात झाली. पहाटे आणि सायंकाळी सहा नंतर थंडीचा कडाका जाणवतो. बहुतेक ...