मुंबई| कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढवण्यात आला असला तरी मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा जाहीर करण्यात आल्या आहेत. फोटो:फाईल काही सवलतींमध्ये वाढ करत राज्यातील मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेस काही अटींच्या अधीन राहून 5 ऑगस्ट 2020 पासून सुरु करण्यास संमती देण्यात आली आहे. तसेच खेळाडुंचा संघ नसलेल्या काही आऊटडोअर खेळांना काही अटींच्या अधीन राहून 5 ऑगस्ट 2020 पासून संमती देण्यात आली आहे. कोवीड विषाणू नियंत्रणासाठी राष्ट्रीय स्तरावरील सूचना मास्कचा वापर- सार्वजनिक ठिकाणे, कार्यस्थळे या ठिकाणी तसेच प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक आहे. सामाजिक अंतर पाळणे (सोशल डिस्टंसिंग) : प्रत्येक व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी वावरताना इतरांपासून किमान 6 फुटाचे (दो गज की दूरी) अंतर राखावे. ग्राहक सुरक्षित अंतर राखतील याची दुकानदारांनी काळजी घ्यावी, दुकानांमध्ये एका वेळी 5 व्यक्तिंपेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देऊ नये. जमावाबाबतची बंधने : मोठ्या प्रमाणावर जमाव होऊ शकणारे...