Skip to main content

Posts

Showing posts from December, 2020

आरोग्य विभागातील पदभरतीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा: ना. टोपे

मुंबई| सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असून सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णांच्या सेवेकडे लक्ष द्यावे. सेवेचा दर्जा उंचावतानाच सौजन्यपूर्ण वागणूक सामान्यांना द्यावी. आरोग्य विभागाच्या महत्त्वाच्या योजनांच्या माहितीचा फलक प्रत्येक ग्रामपंचायतीवर लावावा. दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करावी, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. या वर्षात नागरिकांसह आरोग्य यंत्रणा कोरोनाशी यशस्वी लढा देत आहे. कोरोना नियंत्रणात असला तरी त्यासाठीचे नियम पाळणे आवश्यक आहे. नवीन वर्ष सर्वांना आरोग्यदायी आणि कोरोनामुक्त जावो अशा शुभेच्छा आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. विभागातील पदभरतीला गती मिळावी यासाठी आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, मागासवर्ग कक्षाचे अधिकारी, आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आढावा घेतला. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी, संचालक डॉ.साध...

कॅप्टन रामबहादूर यादव यांचा सेवानिवृत्त निमित्त सत्कार

नाशिक| भोसला मिलीटरी कॉलेजमधील निवासी प्रशासकीय प्रशिक्षण अधिकारी श्री रामबहादूर यादव हे आज (ता.३१) सेवानिवृत्त होत असून त्यानिमित्त सकाळी दहाला भोसला कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये त्याचा सत्कार झाला.  भोसलाच्या निवासी प्रशासकीय प्रशिक्षण अधिकारी म्हणून त्यांनी चोख कामगिरी बजावली. ३० वर्षे सैन्य दलात सेवा करून त्यांनी  भोसला महाविद्यालयातही जवळपास सात वर्षे सेवा केली. सैन्यात असतांना त्यांनी कारगील युध्द, नैसर्गिक आपत्ती निवारण इत्यादी विविध उपक्रमात सक्रीय योगदान देत चांगली कामगिरी बजावली. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, कर्मचारी, प्राध्यापक वर्ग ऑनलाइन स्वरूपात सहभाग नोंदवला. कार्यक्रमास संस्थेचे सरकार्यवाह डॉ.दिलीप बेलगावकर, नाशिक विभागाचे कार्यवाह हेमंत देशपांडे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष हेरंब गोविलकर, कनिष्ठ महाविद्यालय समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ.प्रणव रत्नपारखी उपस्थित होते. विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने ऑनलाइन सहभाग नोंदवावा,असे आवाहन प्राचार्य डॉ.उन्मेष कुलकर्णी यांनी केले होते. 

कृषीमंत्री दादा भुसे यांना कोरोनाची लागण

नाशिक| कृषीमंत्री दादा भुसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली तपासणी करून घ्यावे असे आवाहन ना. भुसे यांनी केले आहे. Photo:File त्याबाबत माहिती देताना ना. भुसे म्हणाले, माझी कोविड-19 ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोविड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य तो उपचार घेत आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती ठीक आहे. लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत पुन्हा रुजू होईन असे सांगितले आहे.

गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशन महाराष्ट्र संघटनेची स्थापना

नाशिक| बँकेत किंवा वित्तीय संस्थेत सोने तारण कर्ज घेतांना सोने व्हॅल्यूअर्सची भूमिका ही फार महत्वाची असते. व्हॅल्यूअर्सना व्हॅल्यूशन करतांना भेदसवणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे तसेच सर्व व्हॅल्यूअर्स नवीन मूल्यांकनाचे नवं तंत्रज्ञान अवगत करून देण्याचा उद्दिष्टयाने गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशन- महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आलेली आहे. या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षपदी मुंबई येथील पुरुषोत्तम काळे तसेच आपल्या नाशिकचे राजेंद्र दिंडोरकर यांची राज्य कार्याध्यक्ष तर चेतन राजापूरकर यांची राज्य उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. संस्था महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका स्तरीय कार्यकरणीची निवड प्रक्रिया सुरू असून खान्देश विभाग प्रमुख श्री भैयाभाऊ भामरे यांनी नाशिक जिल्हा अध्यक्षपदी चारुहास घोडके व उपाध्यक्षपदी प्रल्हाद दुसाने यांची निवड झाली आहे, तसेच नासिक शहर अध्यक्षपदी अरविंद बागुल व उपाध्यक्ष पदी गोपाळ विसपुते यांची निवड झालेली आहे. संघटनेची पहिली कार्यशाळा लवकरच नाशकात लवकरच महाराष्ट्र राज्यातील सर्व गोल्ड व्हॅल्यूअर्स साठी कार्यशाळा नासिक येथे घेण्यात येणार आहे अशी माहिती उप...

खा. संजय राऊत यांचे पुन्हा शेरोशायरीव्दारे भाजपावर शाब्दिक बाण

मुंबई| शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी आपल्या शेरोशायरीतून  नाव न घेता भाजपावर पुन्हा शाब्दिक बाण डागत निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या शयरीत म्हटले, तुम लाख कोशिश करलो मुझे बदनाम करने की मैं जब भी बिखरा हूँ दुगनी रफ्तार से निखरा हूँ...त्यांची अशा प्रकारची शायरी सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय आहे. खा. संजय राऊत यांना इडीने नोटीस पाठवल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यासंदर्भात सोमवारी खा. राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली होती. यावेळी त्यांनी भाजपाचे काही नेते इडी कार्यालयात जाऊन कागदपत्रे आणत असल्याचा गंभीर आरोप केला होता. महाआघाडी सरकार स्थापनेसाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला अशा सर्वांना इडीच्या नोटिसा पाठवून त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. सध्या ते आपल्या विरोधकांचा समाचार ते सोशल माध्यमातूनच ते आपल्या खास शैलीत शेरोशायरीद्वारे घेत आहे. विरोधकांना ते शाब्दिक बाणा ने घायाळ करत असून त्यांनी सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म फेसबुक वर एक शेर पोस्ट करत नाव न घेता भाजपावर निशाणा साधला आहे. यापूर्वीचा शेर आ देखे जरा किसमे कितना हैं दम,  जमक ...

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी हटवली

नाशिक|शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांच्या मागणीला अखेर यश आले असून दि. १  जानेवारी २०२१ पासून केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांद्यावरील निर्यातीची बंदी हटवली आहे. व्यापारी आणि शेतकरी वर्गाने या निर्णयाचे स्वागत केले. उशीरा का होईना केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याने निर्यातक्षम कांद्यातून दोन पैसे गाठीशी जमतील अशी अपेक्षा शेतकरी वर्गात व्यक्त होत आहे. Photo:File कांद्याच्या आयातीवरील अटी शिथिल केल्याने कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये काद्यांच्या दरात  लासलगावसह जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये उन्हाळ कांदा ७०० ते १५५१ तर लाल कांदा १००० ते १९५० रु. प्रति क्वि. इतका घसरला आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याची घसरण सुरू आहेच, त्यात निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत असतांनाही आयातीच्या अटी आणखी शिथिल होत असल्याने कांदा दरातील घसरण सुरूच होती.

आनंदा परत ये..!

Photo: File मी पेपर उघडला त्यात  मीच दिलेली जाहिरात होती हरवला आहे .. "आनंद " पत्ता विसरण्याचा त्याला आहे छंद ... रंग ... दिसेल तो उंची ..भासेल ती कपडे सुखाचे बटण  दुःखाचे कुणाला न सांगता घरातून गेला आहे निघून थकलो आहोत सगळीकडे शोधून "आनंदा" परत ये कुणीही तुझ्यावर रागवणार नाही तुझ्यावर  कसलीही सक्ती करणार नाही घरातले सगळे आसुसून बघताहेत तुझी वाट दार उघडं ठेवलंय वाढून ठेवलंय आशेचं  ताट शोधून आणणाऱ्याला दिलं जाईल इनाम मग म्हटलं आपणच करावं हे  काम काय आश्चर्य .. सापडला की गुलाम .. एका नव्या कोऱ्या पुस्तकाआड एका जुन्या गाण्याच्या अर्थाच्या पल्याड आठवणींच्या मोरपिसात अगरबत्तीच्या मंद वासात मोगऱ्याच्या  मखमली स्पर्शात ... अवेळी येणाऱ्या पावसात त्यानेच मारला पाठीत धप्पा जुन्या मित्रमैत्रिणीशी मारताना गप्पा मी म्हटलं अरे , इथेच होतास , उगाच दिली मी जाहिरात तो म्हणाला वेडे असता तुम्ही माणसं बाहेर शोधता, मी असतो तुमच्याच मानण्यात अन अंतर्मनाच्या कोपऱ्यात... ! योगेश कमोद , लेखक   जेष्ठ पत्रकार,  नाशिक.

३१ डिसेंबर आणि नववर्षासंदर्भात नागरिकांसाठी काय आहे मार्गदर्शक सूचना..बघा

मुंबई| मदत व पुनर्वसन विभागाने एका आदेशान्वये राज्यात दि. २२ डिसेंबर, २०२० ते ५ जानेवारी, २०२१ या कालावधीत रात्री ११.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. कोविड -१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता त्याचप्रमाणे वरील आदेशान्वये दिलेल्या सूचना विचारात घेता ३१ डिसेंबर २०२० व नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. Photo:File मार्गदर्शक सूचना १)कोरोनाच्या अनुषंगाने दि. ३१ डिसेंबर २०२० रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व दि. १ जानेवारी २०२१ रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे. २) ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. ३) विशेषत: मुंब...

ईदगाहवर प्रस्तावीत बस टर्मिनलला मुस्लिम समाजाचा विरोध

नाशिक |प्रतिनिधी| मागील सुमारे 400 वर्षापासून नाशिक शहर परिसरातील लाखो भाविक ज्या शाहजानी ईदगाह मैदानावर रमजान ईद, बकरी ईदच्या वेळी नमाज पठण करतात, त्या मैदानावर मनपाकडून बस टर्मिनल तयार करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. या प्रस्तावाला विरोध करीत मनपाचे त्वरीत प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन देऊन करण्यात आली. आज (दि.28) दुपारी खतीब-ए-नाशिक हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजाच्या शिष्टमंळाने आयुक्त कैलास जाधव यांची भेट घेत चर्चा करुन निवेदन दिले. सुमारे 400 वपर्षापासून मुस्लिम बांधव या ठिकाणी नमाज पठण करतात. ही शाहजानी ईदगाह मैदानाची जागा शासन वक्फ ट्रस्ट नोंदणीकृत आहे.  या जागेच्या सातबारा उतार्‍यावर देखील मुस्लीम समाजाचे नाव असल्याने नमुद करीत महापालिकेने या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये, अशी मागणी करण्यात आली. नगरसेवक मुशीर सय्यद, नगरसेविका समीना मेमन, नगरसेविका शाहीन मिर्झा, आशा तडवी, माजी नगरसेवक हाजी निजाम कोकणी, गुलजार कोकणी,  हनिफ बशीर, रजा अकॅडमीचे एजाज रजा, हाजी जाकीर, सलीम पटेल, साजीद...

वाहन परवाना आणि परमिट नूतनीकरणास मुदतवाढ

नवी दिल्ली| केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने वाहन परवाना, नोंदणी प्रमाणपत्र, परमिट यासारख्या वाहनविषयक कागदपत्रांची वैधता कोविड-19 चा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने 31 मार्च 2021 पर्यंत वाढवली आहे. यात 1 फेब्रुवारी 2020 किंवा 31 मार्च 2021 रोजी वैधता संपणाऱ्या सर्व कागदपत्रांचा समावेश आहे. यामुळे नागरिकांना सामाजिक अंतर राखून वाहतुकीशी संबंधित सेवा मिळविण्यात मदत होईल. मंत्रालयाने आज यासंदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. Photo: Files सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी मार्गदर्शक सूचनांचे महत्त्व समजून योग्य रितीने याची अंमलबजावणी करावी, जेणेकरुन कोरोना महामारीच्या काळात नागरीक, वाहतूकदार आणि इतर संघटनांना त्रास होणार नाही, अशी विनंती केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने केली आहे.

आर्थिक आणि कोरोनाचे संकट दूर कर: आ.रोहित पवारांचे श्री सप्तश्रृंगीला साकडे

नाशिक| नाशिक दौऱ्यात आ.रोहित पवार काल यांनी  वणी येथील सप्तशृंगी देवी मातेचे मनोभावे दर्शन घेतलं. यावेळी राज्यावरचं आर्थिक व कोरोनाचं संकट दूर होऊ दे, अशी श्री सप्तशृंगी देवी चरणी प्रार्थना केली.  यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आ. नितीन पवार, आ. हिरामण खोसकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग आदी उपस्थित होते. यावेळी संस्थानच्या वतीने श्री सप्तशृंगी मातेची प्रतिमा आ. पवार यांना भेट देेेऊन सत्कार करण्यात आला.

🌹🌹🌳🌳"बळीच्या व्यथा"🌳🌳🌹🌹

🌹🌹🌳🌳"बळीच्या व्यथा"🌳🌳🌹🌹  ***************************************   _पाऊस पडण्या चाहूल लागे,_   _बेडुक गागे डराव डराव !_   _बळी राजाला सांगत असे,_   _शेतीची मशागत करानां राव !!_                           _बरड राना देऊन पाळ्या,_                           _कष्ट घेई सर्जा राजा बैलांशी !_                           _पिकावं सोनं लागती आशा,_                           _कष्टकरी बळीच्या डोळ्यांशी !!_   _कुहू कुहू गीत कोकिळा गाई,_   _साद घाली कष्टकरी राजाला !_   _पेरते व्हावे गीत गाऊन सांगे,_   _पेरता पक्षी शेतकरी राजाला !!_                           _पाऊस पडता आनंद हो...

सरकारला शेतकरी आंदोलकांचे पत्र; काय आहे चर्चेसाठीचा अजेंडा..वाचा

टीम अँकर नवी दिल्ली| सरकारतर्फे शेतकरी आंदोलकांना पत्र पाठवण्यात आले होते, त्याला उत्तर देत शेतकरी आंदोलकांनी चर्चेसाठी चार मुद्यांचा अजेंडा सरकारला दिला आहे. त्यावर २९ डिसेंबर रोजी बैठक घेऊन सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार असल्याचे आज सांगण्यात आले. त्यामुळे सर्व देशाचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. फोटो:फाईल किसान संघटनांच्या नेत्यांची आज बैठक झाली. त्यात आंदोलकांनी घेतलेल्या निर्णयाबाबत पत्रकारांना माहिती देण्यात आली. याप्रसंगी संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य डॉ. दर्शनपाल, योगेंद्र यादव, बलबीरसिंग ककाजी, बिपिन पटेल, प्रतिभा शिंदे, रणजीतसिंह राजू, जगनमोहन उत्पल, चौधरी हरपालसिंग आदि नेते बैठकीला उपस्थित होते.  सरकारने शेतकरी संघटनांना पत्र पाठवून सर्व मुद्यांवर आदरपूर्वक चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले.  शेतकरी संघटनांनी त्यावर एकमताने विचार करत सरकारला प्रतिसाद देत सरकारशी चर्चा तयारी दर्शवली असून संयुक्त किसान मोर्चाने चार कलमी अजेंडा दिला असून त्यावर २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता बैठक घेण्याचे कळवले आहे. अशी माहिती आज संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी झालेल्या पत्रकार...

कोरोना जनजागृतीसाठी ‘सुभाष जांगड़ा’ धावले ‘नाशिक ते शिर्डी’

नाशिक| कोरोना विषयक जनजागृती करण्यासाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुभाष जांगडा यांनी आज नाशिक ते शिर्डी ९० किलोमीटर अंतर धावत पूर्ण करून कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी साई चरणी साकडे घातले.  सुभाष जांगडा यांनी आज पहाटे ४.३० वाजता नाशिकच्या सातपूर येथील दत्त मंदिरात दर्शन घेऊन धावण्यास सुरुवात केली. दुपारी ३.१२ वाजेच्या सुमारास त्यांनी नाशिक ते शिर्डी अंतर पूर्ण करत शिर्डी येथे साईबाबा यांचे दर्शन घेत कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी साकडे घातले. यावेळी त्यांच्या समवेत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, वरिष्ठ सल्लागार जयपाल शर्मा, दादा देशमुख, विशाल पाठक, राजेंद्र सहानी, राजेश इसर्वाल, राजवीर जांगडा, राहुल जांगडा, योगिता निकम राजपूत, रुपाली मुंढे, दिनेश जांगडा, नवीन वर्मा, सचीदानंद शुक्ल आदी सहभागी झाले होते. गेल्या पाच वर्षापासून सुभाष जांगडा हे नाशिक ते शिर्डी विविध सामाजिक संदेश देण्यासाठी धावत असतात. सुभाष जांगडा यांचे यंदाचे सहावे वर्ष असून त्यांनी आज नाशिक ते शिर्डी हे ९० किलोमीटरचे अंतर धावून पूर्ण करत कोरोनाविषयक जनजगृती केली. या अगोदर जांगडा ...

मिशन पूर्ण केल्याशिवाय कुठेच जाणार नाही; कोणी हुरळून किंवा घाबरून जाऊ नये: पाटील

पुणे| मी कोल्हापूरला जाणार अशी उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र कुणी हुरळून आणि घाबरून जाण्याचं कारण नाही, केंद्राने दिलेले मिशन पूर्ण केल्याशिवाय मी कुठेच जाणार नसल्याचे स्पष्टीकरण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलतांना दिले.  फोटो:फाईल बापट साहेबांचा संदर्भ धरून मी बोललो असे पाटील यांनी सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आयुष्यात सर्वानाच सेटल व्हावे लागते, पुणे सेटल होण्यास चांगले आहे,असे बापट यांनी सांगितल्यावर आपण पुणे सेटल होण्यास फारच चांगले आहे असे सांगून मी माझ्या कोल्हापूरला जाणार असे म्हणालो, याचा अर्थ  लगेच बॅग आवरून जाणार असा नाही. केंद्राने दिलेले मिशन जो पर्यंत पूर्ण होत नाही तो पर्यंत कुठे ही जाणार नाही. माझे विधान हे निवृत्ती नंतरच्या विषयाबाबत होता असा खुलासा त्यांनी केला. तसेच मी कधी ही जाऊ शकतो, त्याला काल मर्यादा नाही असे शेवटी स्पष्ट केले. मात्र केंद्राने कोणते मिशन दिले आहे असे विचारले असता त्यांनी त्याबाबत अधिक बोलणे टाळले, तसेच तुम्ही कोथरूड मधून पून्हा लढणार का? या पत्रकारांच्या प्रश्नाला ही बगल दिली.

चंद्रकांत पाटलांना कुठे ही जाऊद्या कोल्हापूर,पुणे, घरी: भुजबळांचा टोला

नाशिक| चंद्रकांत पाटील यांना कुठे ही जाऊद्या कोल्हापूरला, पुणे, घरी हा त्यांचा विषय आहे, असे सांगून नाशिकचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांनी त्यांना टोला लगावला आहे. फोटो: फाईल ना. भुजबळ यांना आज पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूरला जाणार या वक्तव्याविषयी छेडले असता त्यावेळी त्यांनी टोमणा मारला.  पीक विम्यावर ते म्हणाले पीक विमा मिळत नाही, त्याबाबत खूप तक्रारी आहे. कंपन्या फक्त त्यांचा फायदा बघतात. नाममात्र परतावा देऊन मोठी रक्कम आपल्या जवळ ठेवतात, त्यामुळे केंद्राने यावर लक्ष केंद्रित करून कायदा करून नियम घालावे अशी मागणी केली.  एकनाथ खडसेंना  नोटीस येणारच होती खडसे भाजपातून राष्ट्रवादीत आले त्यामुळे एकनाथ खडसे यांना इडीची नोटीस येणारच होती, आम्हाला कल्पना होती, असे सांगून भाजपा विरोधकांना नोटिशी पाठवून त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. माझ्या विरुद्ध, प्रताप सरनाईक आणि आता खडसे असा प्रकार सुरू आहे. विरोधात बोलले की इडीची तलवार लटकलेली असते अस हीे ते म्हणाले.

'एच.ए.एल'ने शेतकऱ्यांसह नुकसानग्रस्तांचे प्रश्न तत्काळ सोडवावे: खा.डॉ.भारती पवार

नाशिक|एच.ए.एल.कडे शेतकऱ्यांसह नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना ते सोडविण्याकरिता नागरिकांसह, शेतकरी आसपासच्या गावातील सरपंच तसेच ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा करून देखील त्यावर कोणत्याही प्रकारचा मार्ग निघत नसल्याने अखेर नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी खा.डॉ. भारती पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहीत एच.ए.एल.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीने बैठक आयोजित करण्याच्या मागणी केली होती, त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी खा.डॉ.भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात एच.ए.एल. अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत शिरवाडे वणी येथे विमान कोसळून तेथील अनेक शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे नुकसान झाले होते परंतु त्यांना अद्याप पावेतो देखील कुठल्याही प्रकारची भरपाई मिळाली नाही. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळावी तसेच जानोरी ग्रामपंचायतीचा थकीत कर लवकरात लवकर वर्ग करावा त्याचप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता एच.ए.एल. ने नियमित दळणवळणातील बंद केलेला रस्ता त्वरित खुला करावा जेणेकरून आजूबाजूच्या परिसरातील गावांच्या रहदारीचा प्रश्न मार्गी ...

टोल नाक्यावर ताफा थांबवून मंत्री ना.भुजबळ यांनी वाहतूक केली सुरळीत

नाशिक| नाताळच्या सुट्ट्या आणि वीक एन्ड असल्याने मुंबई आग्रा महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे  घोटी टोल नाक्यावर आज दोन किलोमीटर अंतरापर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती.  यावेळी मुंबईहून नाशिकच्या दिशेने येत असतांना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपला ताफा बाजूला थांबवून घोटी टोल नाक्यावर स्वतः उभे राहून सर्व वाहने सोडण्याच्या सूचना केल्या. यानंतर येथील वाहतूक सुरळीत होईपर्यंत मंत्री छगन भुजबळ हे घोटी टोल नाका येथे थांबून त्यांनी प्रवाशांना दिलासा दिला.तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

दिलीप भावसार यांचे दुःखद निधन

नाशिक| सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त उपअभियंता दिलीप यादव भावसार वय 67 यांचे नुकतेच हृदय विकाराने दुखःद निधन झाले.  नाशिक, धुळे, नवापूर, सटाणा, भुसावळ आदी ठिकाणी ते कार्यरत होते. राष्ट्रीय महामार्गाच्या अनेक प्रकल्पात त्यांचा सहभाग होता. निवृत्ती पश्चात उत्तर महाराष्ट्रातील अनेक मोठ्या बांधकाम, पूल उभारणी, रस्ते प्रकल्पांना त्यांनी स्थापत्य सल्लागार म्हणून मार्गदर्शन केले होते.  साहित्यिक आणि सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे त्यांना उत्कृष्ट वाचक म्हणून गौरविण्यात आले होते.  त्यांच्या पश्चात सुविद्य पत्नी श्रीमती संगीता भावसार, मुलगा आर्किटेक्ट नकुल,  मुलगी, इंजिनिअर सौ मानसी, डॉ. अनुजा, जामात डॉ. निखिल अरबट्टी, डॉ. संकल्प महाजन, स्नुषा इंजिनिअर गरिमा, आणि नातवंडे असा परिवार आहे.

नटसम्राट हा सांस्कृतिक ठेवा : उपेंद्र दाते

नाशिक| नटसम्राट हे नाटक सांस्कृतिक ठेवा असून आजच्या सुवर्ण महोत्सवी दिवशी देखील त्याचे गारूड रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते यांनी केले. कुसुमाग्रज मराठी विचार मंचतर्फे नटसम्राटच्या पहिल्या प्रयोगाच्या  सुवर्ण महोत्सवी दिनानिमित्त आयोजित स्वगत स्पर्धेच्या पारितोषक वितरण समारंभ कालिदास कलामंदिर येथे संपन्न झाला. या प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष सतीश बोरा,  उपाध्यक्ष आनंद देशपांडे, सरचिटणीस दिलीप बारावकर, सुभाष सबनीस, शाम पाडेकर, श्रीधर व्यवहारे, डॉ. स्वप्नील तोरणे, मिलिंद कुलकर्णी, मुक्तेश्वर मुंशेट्टिवार, श्रीमती वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. नटसम्राट मध्ये भूमिका करायची स्वप्ने प्रत्येक कलाकार बघत असतो.  मोहिनी घालणारे हे नाटक वाचकांवर, प्रेक्षकांवर संस्कार करीत आहे असे त्यांनी सांगितले.  विचार मंच चे अध्यक्ष सतीश बोरा यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या स्थापनेचा उद्देश स्पष्ट करून सांगितला. नव्या पिढीला तात्यासाहेबांनी दिलेले प्रेरणादायी विचार पोहोचवण्यासाठी मंचाची स्थापना करण्यात आली असल्याचे सांगितले. संस्थेमार्फत...

फेब्रुवारीतील सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; लवकरच नवीन तारखा जाहीर करू: पोखरियाल

नवी दिल्ली|बोर्डाच्या परीक्षेच्या तारखांशी संबंधित प्रश्नावर उत्तर देताना पोखरियाल म्हणाले की हे सरकार विद्यार्थीभिमुख असल्याने आम्ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम केले आहे. सीबीएसई  2021  च्या परीक्षा घेण्यासाठी आवश्यक तयारी करीत आहे.  फेब्रुवारी महिन्यात बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत आणि सीबीएसई लवकरच संबंधितांशी चर्चा करून परीक्षेच्या तारखा जाहीर करेल असे पोखरियाल यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. फोटो:फाईल केंद्रीय शिक्षणमंत्री  रमेश पोखरियाल  ‘ निशंक ’  यांनी आज आगामी स्पर्धात्मक व बोर्डाच्या परीक्षांसंदर्भात देशभरातील शिक्षकांशी आभासी माध्यमातून संवाद साधला. यावेळी  पोखरियाल म्हणाले की ,   गुरूचे महत्त्व हे नेहमीच देवापेक्षाही अधिक आहे आणि म्हणूनच आचार्य देवो भव: ही भावना निरंतर मनात ठेवून आपण सर्व शिक्षकांचा आदर केला पाहिजे.  शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच देशाची ऑनलाईन शिक्षण व्यवस्था यशस्वी झाली आहे असे ते म्हणाले.  विद्यार्थी आणि समाजात मोठ्या प्रमाणात  कोविड - 19  संबंधित जनजागृती केल्याबद्द...

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ यांची जयंती गावागावात साजरी करा: ना.छगन भुजबळ

मुंबई| नाशिक| क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजात अधिक रुजविण्यासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन करत विविध सामाजिक कार्यक्रमातून प्रत्येक गावागावात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात यावी असे आवाहन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले.  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक मुंबई येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, कार्याध्यक्ष बापू भुजबळ, प्रा.हरी नरके, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे, ऍड सागर किल्लारीकर,मंगेश ससाने,कमलाकर दरोडे, पांडुरंग अभंग,ईश्वर बाळबुधे,बाळासाहेब कर्डक, दिलीप खैरे,अॅड.सुभाष राऊत,  प्रित्येश गवळी, प्रा.दिवाकर गमे, प्रा.नागेश गवळी,रमेश बारस्कर,राज असरोडकार, प्रा कविता मेहेत्रे यांच्यासह राज्यभरातील समता सैनिक उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी बहु...

धर्मकाटा एक सेवाधर्म! धर्मकाटा आज ८५ वा वर्धापनदिन

नाशिक| नासिक सराफ बाजारातील धर्मकाटा २३ डिसेंबर रोजी ८५ वर्ष पूर्ण होऊन ८६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. ग्राहकांसाठी असलेला हा एकमेव असा धर्मकाटा  आहे.  की  सराफ असोसिएशनतर्फे चालविला जातो. साधारणता १८९२ साली परचुरे यांचा धर्मकाटा या ठिकाणी होता. कालांतराने हा नासिक सराफ असोसिएशन घेऊन २३ डिसेंबर १९३५ रोजी धर्मकाटा या नावाने सुरू केला. तेव्हापासून धर्मकाटा ही संकल्पना सराफ असोसिएशनतर्फे एक सेवाधर्म म्हणून राबविली जात आहे. व्यवसाय आणि सेवा यातील हा एक अनोखा मिलाप धर्मकाटा साधतो आहे. धर्मकाटा हा सराफ बाजारातील व्यवहारावर विश्वार्यता निर्माण करतान दिसतो. त्यामुळेच धर्मकाट्याला सेवाधर्म म्हटले गेले आहे. मौर्य काळातील चाणक्याने कौटिल्याचे अर्थशास्त्र या ग्रंथात सर्वप्रथम धर्मकाट्याचा उल्लेख आढळतो. चाणक्याने वर्णल्याप्रमाणे, विक्रेता आणि खरेदीदार यांच्यात एक त्रयस्थ व्यक्तीकडून अथवा संस्थेकडून व्यवहाराची अथवा त्या मालाची पडताळणी करावी. या चाणक्य सूत्रासाठीच प्राचीन काळातही धर्मकाटा ही संकल्पना राबविली जात असावी,असे दिसते. त्यामुळे विक्रता आणि खरेदीदार यांच्यातील सोन्याचांदीचे व...

कांदा साठवण क्षमता आणि निर्यात खुली करा: खा.डॉ. पवार यांचे केंद्राला पत्र

नाशिक| कांदा साठवणूक मर्यादेची अट शिथिल करून कांद्यावरील निर्यातबंदी खुली करावी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी केंद्रीय वाणिज्य व ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्र्यांकडे पत्रव्यवहार  करत खा.डॉ.भारती पवार यांनी केली आहे. फोटो:फाईल महाराष्ट्र राज्य हे प्रमुख कांदा उत्पादक राज्य म्हणून ओळखले जाते तसेच देशाच्या ऐकून कांदा उत्पादनापैकी जवळपास 33 टक्के कांदा हा महाराष्ट्रात उत्पादित होतो. नाशिक जिल्ह्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याला परदेशात मागणी असल्याने त्याला चांगला भाव मिळून तो निर्यात होतो. सध्या कांदा निर्यात बंद असल्याने कांद्याचे भाव घसरले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन कांद्यावरील निर्यातबंदी खुली करावी व कांदा साठवणूक मर्यादेची अट शिथिल करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी केंद्रीय वाणिज्य व ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल व केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिह तोमर यांना पत्रव्यवहार...