Skip to main content

Posts

Showing posts from April, 2021

समाज कल्याण कर्मचाऱ्यांकडून माणूसकीचे दर्शन; कोरोनामुळे निधन झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटूंबास १ लाखांची मदत

नाशिक| कोरोनामुळे आकस्मिक निधन झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटूंबाच्या पाठीमागे उभे राहून माणूसकी कुठेतरी जिवंत असल्याचं उदाहरण समाज कल्याण कर्मचाऱ्यांनी समाजापुढे ठेवले आहे. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नंदुरबार कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक जितेंद्र साळुंखे (वय 47) यांचे 5 एप्रिल रोजी कोरोनामुळे निधन झाले. घरातील कर्ता पुरूष अचानक सोडून गेल्यामुळे त्यांच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. तेव्हा या कुटूंबाच्या पाठीमागे उभे राहत समाज कल्याण कर्मचाऱ्यांनी त्यांना मानसिक आधार तर दिला ; परंतु 1 लाखांचा निधी तात्काळ जमा करून कुटूंबाच्या स्वाधीन केला.  जितेंद्र साळुंखे यांचं संपूर्ण कुटूंब कोरोना पॉझिटिव्ह होते. आई, पत्नी , मुलगा व स्वत:जितेंद्र साळुंखे यांच्यावर धुळे येथे उपचार सुरू होते. या उपचारात त्यांची आई बरी होऊन घरीच विलीगीकरणात राहत  होती.  उपचार सुरू असतांना जितेंद्र यांचा मृत्यु झाला. मुलाच्या मृत्युचा धक्का सहन न झाल्यामुळे त्यांच्या आईचा मृत्यु झाला. मुलगा व पत्नीं यांचे उपचार चालू असल्यामुळै त्यांना जितेंद्र यांच्या मृत्युची कल्पना देण्यात आली नाही.  मुलगा व पत...

त्र्यंबक शहरासाठी मोफत ३ ॲाक्सीजन सिलेंडर पुरवठा

नाशिक| त्र्यंबकेश्वर शहर व व आता ग्रामीण भागासाठी मोफत ३ मोठे सिलेंडर  पुरुषोत्तम कडलग व त्यांचे सहकारी यांचे मार्फत आज उपलब्ध करून देण्यात आले. शहर व ग्रामीण भागात देखिल कोरोना रूग्णांचे प्रमाण वाढत असुन अनेक समस्यांना जनतेला सामोरे जावे लागत आहे त्यात त्र्यंबकला ICU ची सुविधा नसल्याने नाशिक ला बेड उपलब्धतेविषयी रूग्नांच्या नातेवाईकांना धावपळ होते त्याच बरोबर आॅक्सीजनच्या तुटवड्याअभावी O2 बेड न मिळणे,बेड मिळाला तर रेमडीसावर इंजेक्शन साठाचा प्रश्न समोर उभा रहातो अशा अनेक संकटातून शेवटी तो रूग्न व त्याच्या घरात झालेले ईतर पोझीटीव रूग्न यांचे अतोनात हाल होतात.. त्र्यंबक व तालुक्यांतील रुग्णांसाठी एक दिलासा म्हनुण कमीत कमी रूग्नालयात बेड मिळेपर्यंत त्याची ॲाक्सीजन लेवल खाली जावु नये म्हणुन रूग्नाला आॅक्सीजन मिळावा म्हणुन मोठे ३ सिलेंडर पुरूषोत्तम कडलग व त्यांचे सहकारी कैलास मोरे,अब्दुल मन्सुरी,निलेश पवार,विजय गांगुर्डे,प्रशांत लोंढे,गणेश मोरे यांनी करून दिले आहे. सदर सिंलेंडर संपल्यास ते पुन्हा भरून देखिल दिले जाईल असे देखिल पुरुषोत्तम कडलग यांनी सांगितले. ही संपुर्ण माहीती व १ भरलेले...

व्यापक लसिकरणाने कोरोनावर नियंत्रण: आरोग्य विद्यापीठाच्या कार्यशाळेतील सूर

नाशिक| कोरोनाची झळ साऱ्या जगभर पसरली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी व्यापक लसिकरणाची गरज आहे असे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे कोविड-19 आजारा संदर्भात लसिकरणासाठी जनजागृती या विषयावर ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे, विद्यापीठाचे मा. प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे संचालक डॉ. अश्विनकुमार तुपकरी, ओरिजिन फाऊंडेशनचे संचालक डॉ. संदीप माने आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक श्री. संदीप कुलकणी व अधिकारी वर्ग ऑनलाईन उपस्थित होते. याप्रसंगी डॉक्टर आणि समाजसेवा या विषयावर ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी सांगितले की, समाजसेवा ही निरपेक्षपणे केली पाहिजे. कोविड-19 पेक्षाही अनेक भयंकर आजार कदाचित भविष्यात येतील, मात्र खंबीरपणे त्याचा सामना करावा. कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे व हात वारंवार धुणे या गोष्टींक...

प्रसिध्द व्यापारी जयंतीलाल सराफ यांचे निधन

नाशिक येथील सुप्रसिद्ध व्यापारी जयंतीलाल प्रतापमल सराफ (७३) रा. मेनरोड यांचे काल दिर्घ आजारने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुन नातवंडे असा परिवार आहे. ते रामा डायमंडचे संचालक रवी सराफ यांचे वडील  होते.

वाढीव फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवू नये: शिक्षण विभाग

मुंबई| विद्यार्थ्यांनी वाढीव फी भरली नाही म्हणून त्यांना शिक्षणापासून, परिक्षेस बसण्यापासून वंचित ठेवता येणार नाही असा आदेश मा.उच्च न्यायालयाने दि. १ मार्च २०२१ रोजी दिला आहे. त्यामुळे कोणत्याही शाळेने विद्यार्थ्यांनी वाढीव फी भरली नाही म्हणून त्यांना शिक्षणापासून किंवा परिक्षेस बसण्यापासून वंचित ठेवल्यास ही बाब पालकांनी संबंधित शिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. कोरोना विषाणू (Covid-१९) या आजाराच्या संसर्गास प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ ची अंमलबजावणी सुरु असून राज्यात लॉकडाऊन असतांना काही संस्था/शाळा, विद्यार्थ्यांना/पालकांना संपूर्ण फी भरण्याची सक्ती करीत असल्याबाबतच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्यामुळे शालेय शिक्षण विभागाने दि. ३० मार्च २०२० च्या शासन परिपत्रकान्वये सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू वर्षाची व आगामी वर्षाची फी जमा करण्याबाबत सक्ती करु नये, लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतर फी जमा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या...

दिलासादायक निर्णय: गरीब आणि गरजू लोकांना दरमहा मिळणार ५ किलो धान्य

दिल्ली| देशातील कोविड-19 च्या उद्रेकामुळे उद्भवलेल्या आर्थिक अडचणींमुळे गरीब आणि गरजू लोकांना सामना कराव्या लागणाऱ्या हालअपेष्टा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पुढील 2 महिने अर्थात मे आणि जून 2021 या कालावधीसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 (एनएफएसए) अंतर्गत समावेश असणाऱ्या सुमारे 80 कोटी लाभार्थींना दरमहा माणसी 5 किलो मोफत धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच्या “प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने (पीएम -जीकेवाय)” च्या धर्तीवरच हे वाटप केले जाणार आहे. फोटो: फाईल या विशेष योजनेअंतर्गत (पीएमजीकेएवाय) अंत्योदय अन्न योजना (एएवाय) आणि प्राधान्य गृहकर्मी (पीएचएच) या दोन्ही प्रवर्गांतर्गत सुमारे 80 कोटी एनएफएसए लाभार्थ्यांना, एनएफएसए च्या दरमहा नियमित मिळणाऱ्या धान्याव्यक्तिरिक्त दरमहा माणसी 5 किलो अतिरिक्त मोफत धान्य (तांदूळ/गहू) देण्यात येणार आहे. अन्नधान्य अनुदान आणि आंतरराज्यीय वाहतुकीसाठी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना केंद्रीय सहाय्य केल्यामुळे केंद्र सरकार यासाठी 26,000  कोटींपेक्षा जास्त खर्च करणार आहे.

रेमडीसीवर इंजेक्शन आणि ऑक्सिजन तातडीने उपलब्धता करा: खा.डॉ.भारती पवार

नाशिक| जिल्हयात कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णांना लवकरात लवकर रेमडीसीवर इंजेक्शन आणि ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन्न, औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे तसेच नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  महाराष्ट्रामध्ये सर्वत्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने हाहाकार माजवला असताना नाशिकमध्ये कोविड-19 या आजाराने बाधित सर्वाधिक रूग्ण आहे. नाशिक जिल्ह्यातील गावागावात कोविड-19 या आजाराने बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असुन बाधित रूग्णांची प्रकृती अपुऱ्या उपाययोजनांच्या अभावामुळे चिंताजनक होत आहे. अशा परिस्थितीत रूग्णांना अतिशय गरजेच्या असणाऱ्या रेमडीसिवर इंजेक्शन व ऑक्सिजनच्या(O2) कमतरतेमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. या गंभिर परिस्थितीत बाधित रूग्णांना उचित उपचार मिळावा याकरिता दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खा.डॉ.भारती पवार यांनी तातडीने रेमडीसिवर इंजेक्शन व ओक्सिजांचा(O2) मुबलकसाठा उपलब्ध व्हावा याकरिता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब व अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांचेक...

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

नाशिक| कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून रुग्णसंख्या दुपटीने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महानगरपालिका रुग्णालयांवर नागरिकांचा विश्वास वाढवा यासाठी नाशिक मनपाच्या पंचवटीतील इंदिरागांधी रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार समीर भुजबळ यांनी देखील लस घेतली. गेल्या दोन महिन्यांपूर्वी पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने मुंबई येथील निवासस्थानी उपचार घेतले. त्यानंतर आज त्यांनी नाशिक शहरातील मनपाच्या पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. यावेळी याठिकाणी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधून सर्व नागरिकांनी नाशिक महापालिकेच्या रुग्णालयात लसीकरण करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.

ऑक्सिजन गळती प्रकरणी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ७ जणांची समिती गठीत

नाशिक| महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत २२ रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे. ही  घटना अत्यंत दुर्देवी व मनाला वेदना देणारी आहे. या घटनेचा तपास व दोषींवर कारवाई करण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. नाशिक  महानगरपालिकेच्या डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक गळतीच्या ठिकाणी भेट देऊन घटना स्थळाची पाहणी केली त्यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलत होते. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंणगे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, आरोग्य उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, वैद्यकिय अधिकारी डॉ.आवेश पलोड आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

दुर्घटनेस जबाबदार असेल त्याची गय केली जाणार नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई| कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेड नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईलच. फोटो:फाईल या दुर्घटनेस जबाबदार असेल त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!”  अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मृत...

ऑक्सिजन पुरवठयाअभावी या २२ रुग्णांचा झाला दुर्दैवी मृत्यू

नाशिक| मनपाच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँकच्या गळतीमुळे ऑक्सिजन अभावी रुग्णांचा दुदैवी मुत्यृ झाला. नाशिक महानगरपालिकेचे डॉ. झाकिर हुसेन हे १५० बेडचे कोविड रुग्णालय असुन येथे आज सकाळी १० वाजता १५७ रुग्ण दाखल होते, पैकी १३१ रुग्ण  ऑक्सिजनवर,  १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर व ६१ रुग्ण क्रिटिकल होते. या रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठयासाठी १३ KL चा लिक्विड ऑक्सिजन टॅंक Taiyo Nippon या कंपनीकडून भाडेतत्वावर घेण्यात आलेला आहे. उपरोक्त कंपनीकडून सदरचा टॅंक हा १० वर्षाकरिता भाडेतत्वावर घेण्यात आलेला असुन त्याची देखभाल दुरुस्ती व यामध्ये भरावयाचा लिक्विड ऑक्सिजन देण्याची जबाबदारीही उपरोक्त कंपनीकडे आहे. सदरचा टॅंक  दि. ३१/०३/२०२१ रोजी कार्यान्वित केलेला आहे. आज दुपारी सुमारे १२.३० वाजता डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे टॅंकची पाहणी केली असता, टॅंकच्या खालच्या बाजुला गळती आढळून आली. त्यामुळे टॅंकमधील ऑक्सिजन पातळी झपाट्याने कमी होत असल्याने रुग्णांस पुरेशा दबावाने ऑक्सिजन मिळत नसल्याचे दिसुन आले. सदरची बाब रुग्णालयातील डॉक्टर यांनी तात्...

ऑक्सिजन गळती दुर्घटनेत २२ रुग्णांचा मृत्यू; पालकमंत्र्यांचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

नाशिक| कोरोनाचा फैलाव वाढत असतांना या संकटाशी एकजुटीने लढा दिला जात असतांना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत २२ रुग्णांनी आपला प्राण गमावला असून ही घटना अतिशय दुर्दैवी असुन रुग्णालयात घडलेल्या प्रकारामुळे मन सुन्न झाले, दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत अश्या भावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत. मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून ५ लाख व महापालिकेकडून प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली.   छगन भुजबळ हे आज सकाळी मुंबईहून नाशिकच्या दिशेने निघालो असतांना दुपारी १२.३० च्या सुमारास नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीमध्ये टँकरच्या माध्यमातून रिफिलिंग करत असतांना ऑक्सिजन गळतीची झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या संपुर्ण प्रकरणाची माहिती घेतली तसेच मृतांच्या नातेवाईकांशी चर्चा करून त्यांचे सांत्वन केले...

इ. १० वीच्या परीक्षा रद्द: वर्षा गायकवाड

मुंबई |कोरोनाची गंभीर परिस्थिती बघता इ. दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. फोटो: फाईल मंत्री मंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून अभ्यास करून या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करता येईल, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना काय आहेत, याचा विचार केला जाईल आणि त्याचा निर्णय जाहीर केला जाईल. यासंदर्भात काही तज्ज्ञांशी चर्चा करून, महाराष्ट्र बोर्डासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

भाजीपाला आणि किराणा घेण्याची वेळ स. ७ ते ११ निश्चित

मुंबई| सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी आणि मिठाई दुकाने, सर्व खाद्यपदार्थांची दुकान (चिकन, मटण, कोंबडी, मासे, अंडी सह आता सकाळी ७ ते ११ यावेळेत खुली राहणार आहे. त्यामुळे आता नागरिकांना यावेळेत खरेदीसाठी बाहेर पडता येईल. वरील सर्व प्रकारची घरपोच सेवा सकाळी ७ रात्री ८ पर्यंत असेल असे शासनाने नवे निर्बंध जाहिर केले असून  दि. २० एप्रिल २०२१ संध्याकाळी आठ वाजेपासून १ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत अस्तित्वात राहतील. p कोविड-१९ चा प्रसार थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध व मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत, जे १ मे २०२१ च्या सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहतील. परंतु महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता सदर निर्बंधांमध्ये काही फेरबद्दल केले आहेत. साथीचे रोग कायदा १८९७ च्या कलम दोन, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या तरतुदीनुसार सदर बदल करण्यात येत असल्याची माहिती पत्रकाद्वारे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली आहे. हे बदल खालीलप्रमाणे असतील व २० एप्रिल २०२१ संध्याकाळी आठ वाजेपासून १ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाज...

झेप फाउंडेशनच्या प्रयत्नातून भगुरला कोविड सेंटर मंजूर

भगुर| शहरात वाढते कोविड रुग्ण पाहता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे यांच्या झेप फाउंडेशनच्या प्रयत्नातून आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाने भगुरला कोविड सेंटर मंजूर करण्यात आले असून ते लवकरच सुरू होणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष अँड गोरखनाथ बलकवडे यांनी दिली. बलकवडे परिवाराकडून प्रशासनाला सेंटर सुरु करण्यासाठी मोफत जागा व बेड व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे. भगुर शहरात २० हजार लोकसंख्या असूनशासकीय रुग्णालयात उपचारासाठी नसून किरकोळ भगुर नगरपालिकेचा दवाखाना आहे, आणि नागरिकांना खाजगी दवाखान्यात जाणे परवडत नसल्याने अनेक कोरोना रुग्ण देवळाली छावणी परिषद नाशिकरोड बिटको येथे उपचार घेत आहे तर अनेकांना बेड उपलब्ध नाही अनेक रुग्ण घरीच राहून उपचार घेत आहे. तर काही खुलेआम भगुर शहरात फिरत असल्याने आज रोजी ४८ ते ५० रुग्ण कोरोना बाधित आहे. त्यामुळे भगुरला कोविड सेंटर मिळावे याकरीता राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष.सौ .प्रेरणा बलकवडे यांनी शासनाने प्रस्ताव पाठवून तसा पाठपुरावा केला. त्यानुसार बलकवडे व्यायामशाळा हाँलमध्ये ५० खाटांच्...

'केरळ'ची अविस्मरणीय सफर

प्रत्येकाच्या स्वप्नातलं मनातलं आणि भारतीय लोकांची देवभूमी म्हणजेच केरळ! आम्ही नाशिक ते एर्नाकुलम(कोची) मंगला एक्सप्रेस रेल्वेने निसर्गाच्या सुंदर सानिध्यात घेतलेली ही अविस्मरणीय सहल.. एर्नाकुलम (कोची) येथे आम्ही सकाळी 10 वाजता पोहचलो व फ्रेश होऊन आम्ही कोची साईट सीनसाठी निघालो, आम्ही तेथे  चर्च, पैलेस बघितले. तसेच आम्ही मच्छी मार्केट, कथकली नृत्य शैली, संग्रहालय बघून आम्ही मॅरीने ड्राईव्ह या ठिकाणी गेलो.. तेथे अप्रतिम असे सुंदर दृश्य होते, केरळच्या फेमस असा लु-लु मॉलला जाऊन केरळी मसाले मोठ्या प्रमाणात खरेदी केले तसेच या ठिकाणी तेथील पारंपारिक कथकली नृत्य अनुभवले  आणि कोची येथे मुक्काम  केला. प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणजेच कोची ते मुन्नार. आम्ही 140 km असा ४-५ तासांचा  प्रवास केला... प्रवास करताना डोळ्याच्या नजरेत मावणार नाही असे रस्त्याने चहा, कॉफी, मसालेचे मळे बघण्यास मिळाले, मुन्नर हे हिल स्टेशन आहे, मुन्नर हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही. परिसरात थंडी आणि दाट धुकं यामुळे माटुंप्पेट्टी धरण येथे बोट रायडिंगला फार मजा आली. तसेच इको पॉईंट बघण्यासारखा आहे, येथे 3 बाजुं...

सुरक्षेच्या दृष्टीने राज्यात धान्य वितरणासाठी दुकानदारांचे थम ठेवा: रेशन संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नाशिक| देशात तसेच संपूर्ण राज्यात करोनाने थेमान घातले आहे. राज्यात ५२००० हजार व जिल्हातील २६०० रेशन दुकानदारांच्या दारापर्यंत कोरोना आला आहे. थममुळे कोरोना संक्रमणाचा धोका दुकानदारांना संभवतो. सुरक्षिततेच्या दृष्टीने कोरोनावर नियंत्रण मिळेपर्यंत दुकानदारांचे थम घ्यावे अशी मागणी रेशन संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.   संपूर्ण  शासकीय यंत्रणा करोनाशी दोन हात करण्यात गुंतली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत. हॉस्पीटल फुल्ल झाले आहेत. ऑक्सीजन, व्हेंटीलेटर उपलब्ध होत नाही. तरी देखिल डॉक्टर, नर्स, पोलीस यंत्रणा आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. आज राज्यात १०० च्यावर रेशन दुकानदार मृत्यूमुखी पडले. त्यांचे कुंटुब उघड्यावर पडले आहे. शासनाने मदत तर सोडा पण शासनाने साधी सहानभूती ही दाखवली नाही. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने दुकानदारांचे थम ठेवावे अशी मागणी रेशन संघटनेने केली.    ही खेदाची बाब म्हणावी लागेले, इतरत्र गर्दी नको शासन म्हणत आहे. आणि रेशन दुकानात हजारो कार्डधारकांचा थम घ्या म्हणत आहे. केंद्र व राज्य सरकाला अस वाटत आहे. रेशन दुका...

५० शिवसैनिकांनी रक्तदान करून जोपासली सामाजिक बांधिलकी: सुधाकर बडगुजर

नाशिक| कोरोना महामारीच्या काळात रुग्णांना वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज आहे आणि त्यासाठी शिवसैनिकांनी रक्तदान करावे असे आवाहन शिवसेना प्रणित भारतिय विद्यार्थी सेनेच्या वतीने आवाहन केल्यानंतर 50 हून अधिक जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे,असे प्रतिपादन  शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले. शालिमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात हे रक्तदान शिबिर पार पडले.यासाठी भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक वैभव ठाकरे यांनी विशेष पुढाकार घेतला होता.रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून सर्वानी वर्षातून दोन किंवा तीनवेळा रक्तदान केले तर रक्ताचा देशात कुठेच तुटवडा जाणवणार नाही आणि रुग्णांनाहीं जीवदान मिळेल,असे खा.हेमंत गोडसे आणि माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल यांनी सांगितले. यावेळी महानगर संघटक योगेश बेलदार,विधानसभा संघटक विरेंद्र सिंग टिळे,गुड्डीताई रंगरेज, भारतीय विद्यार्थी सेना महानगर संघटक रवींद्र आव्हाड, श्रीकांत मगर, उपजिल्हासंघटक स्वप्नील जाधव,नीलेश पाटील,यशकुमार जानेराव,ओमकार कंगले,करण सूर्यवंशी, राहुल सानप,संजय गोसावी, तालुकासंघटक कुणाल ठाकरे,...

भुजबळ नॉलेज सिटीचे अद्ययावत कोविड सेंटर इतर संस्थांना प्रेरणादायी ठरेल: खा. शरदचंद्र पवार

नाशिक| कोरोनाच्या संकटात संकटग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी त्यांना आधार देणारे वैशिष्ट्यपूर्ण व नावीन्यपूर्ण असे ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था असलेले कोविड केअर सेंटर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली भुजबळ नॉलेज सिटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी नाशिकमध्ये तयार केले आहे. भुजबळांनी हाती घेतलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा उपक्रम असून हे कोविड केअर सेंटर राज्यातील इतर संस्थाना कोरोनाच्या लढाईत काम करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांनी व्यक्त केला. नाशिक येथे मेट भुजबळ नॉलेज सिटी व महानगर पालिका , नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या सहकार्याने विभागीय क्रिडा संकुल,नाशिक येथे १८० ऑक्सिजन व ११५ सीसीसी अशा एकूण २९५ बेडची व्यवस्था असलेल्या कोविड केअर सेंटरचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या हस्ते व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री छगन भुजबळ या...

नासिक जिल्ह्यासाठी एक हजार रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध: खा. डॉ. भारती पवार

नाशिक| कोरोना संकटाचे थैमान सुरू असतांना कोव्हीड रुग्णांची वाढलेली अमर्याद संख्या यामुळे नाशिक जिल्हयात परिस्थिती गंभीर आहे. आहे. रुग्णांच्या नातेवाईकांंकडून रोज  खा. डॉ भारती पवार यांच्याकडं मदतीची  मागणी केेली जात आहेे. त्यात रेमडीसिवर औषध उपलब्ध होत नसल्याने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हतबल झाल्याचे दृश्य होते. अखेर खा. पवार यांनी तत्काळ हालचाली करून रेमडीसीवरची एक हजार औषधे उपलब्ध करून दिले. अतिशय मन हेलवणारे संभाषण 'रुग्णांची गंभीर अवस्था त्यातच त्यांना वेळेवर न मिळणारा बेड ,त्यांना लागणारा ऑक्सीजनचा तुटवडा तसेच रेमडीसीवर हे लागणारे इंजेक्शन आणि अशी परिस्थिती असतांना ही रेमडीसीवर इंजेक्शन कशी उपलब्ध होतील विवंचनेत असतांना रेमडीसीवर उत्पादित करणाऱ्या अनेक कंपन्यांशी खा .डॉ भारती पवारांनी संभाषण करत हे  इंजेक्शन नाशिक जिल्ह्यातील रुग्णांसाठी कसे उपलब्ध करता येईल याकडे लक्ष केंद्रित केले .त्याच बरोबर केंद्राच्या आरोग्य विभागाकडे ही सातत्याने याचा पाठपुरावा करत होत्या. गुजरात, कर्नाटक येथील उत्पादकांशी चर्चा करून शेवटी बंगलोर येथील मायलान कंपनीचे श्री नरेशजी हसीजा या...

तीन तासाच्या थरार नाट्यानंतर बिबट्या जेरबंद

नाशिक| सावरकर नगर येथे बिबट्याचा संचार असल्याचे दिसले. येथील एका निवासस्थानाबाहेर बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.  दरम्यान वनविभागाला पाचारण करण्यात येऊन बिबट्याला जेरबंद करण्यात आले. तीन तास हे थरार नाट्य चालले. पूर्वी ही गंगापूररोड भागात अधून-मधून दर्शन घडत असते. दिंडोरीच्या खा. डॉ.भारती पवार यांच्या नाशिकच्या निवासस्थाना बाहेर ही या बिबट्याचे दर्शन झाले आहे.