Skip to main content

Posts

Showing posts from November, 2024

महापरिनिर्वाण दिनासाठी विशेष गाड्या; असा असेल टाईमटेबल

नाशिक रोड|  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे मुंबई ते नागपूर दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे.   नागपूर ते मुंबई विशेष गाड्यांचा तपशील- गाडी क्र. ०१२६२ ही ४ डिसेंबरला नागपुरहून २३.५५ वाजता सुटेल आणि मुंबई सीएसटी येथे दुस-या दिवशी १५.३० वाजता पोहोचेल.    गाडी क्र. ०१२६४ ही ५ डिसेंबरला नागपूरहून ०८ वाजता सुटेल आणि मुंबईला त्याच दिवशी २३.२० वाजता पोहोचेल.   गाडी क्र. ०१२६६ ही ५ डिसेंबरला नागपुरहून १५.५० वाजता सुटेल आणि मुंबईला दुस-या दिवशी १०.५५    वाजता पोहोचेल.   थांबे अजनी ,   सेवाग्राम ,  वर्धा ,  अकोला ,  जलंब ,   मलकापुर ,  भुसावळ ,  जळगांव ,  चाळीसगांव ,  मनमाड ,  नाशिक रोड ,  इगतपुरी ,  कसारा ,  कल्याण,  दादर. संरचना: सामान्य व्दितीय श्रेणीचे १६ डबे.   अतिरिक्त नागपूर ते मुंबई एकेरी विशेष- गाडी क्र. ०२०४० ही ७ डिसेंबरला नागपुरहून १३.२० वाजता सुटेल आणि मुंबईला दुस-या दि...

तीन महिन्यात हरवलेली ४१४ मुले कुटुंबाच्या हवाली

नाशिक रोड| प्रतिनिधी| मध्य रेल्वेच्या ऑपरेशन नन्हे फरिश्ते मोहिमेला मोठे यश मिळत आहे. या मोहिमे अंतर्गत कौटुंबिक वाद, किरकोळ कारणावरून घरातून पळून जाऊ पाहणा-या ४१४ लहान मुलांना पुन्हा त्यांच्या कुटुंबाकडे सुखरूप हवाली करण्यात आले.  ऑगस्ट ते ऑक्टोबर २४ या तीन महिन्यात वाट चुकलेल्या ४१४ मुलांना कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले. काही मुले भांडण, कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगल्या आयुष्याच्या, शहराच्या ग्लॅमरच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता नाशिक रोड आदी रेल्वे स्थानकावर येतात. तेथून रेल्वेने मुंबईसारख्या मोठ्या शहरात जाऊ पाहतात. रेल्वे स्थानकावर बावरलेली, भुकेलेली, थंडीत कुडकुडत रडवेली झालेली अशी मुले, मुली रेल्वे सुरक्षा दलाचे जवान आणि नन्हे फरिश्तेचे स्वयंसेवक हेरतात. हे प्रशिक्षित कर्मचारी विविध स्वयंसेवी संस्थांच्या  मदतीने मुलांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या  पा लकांकडे पुन्हा जाण्यासाठी प्रबोधन करतात. या उदात्त सेवेबद्दल पालक रेल्वे आणि स्वयंसेवी संस्थांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात.  मध्य रेल्वेचे   रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) रेल्वे स्थानक...

नाशिकमध्ये महायुतीचे वर्चस्व

नाशिक|दिअँकर वृत्तसेवा |नाशिक जिल्ह्यातील विधानसभेच्या 15 जागांपैकी महायुतीने 14 जागा जिंकून वर्चस्व मिळवले आहे. एक जागा एमआयएमने विजय मिळवला आहे. जिल्ह्यातील 15 जागांचा निकाल पुढीलप्रमाणे 1. दिंडोरी - *नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी अजित पवार गट)* - पडलेली मते : 138442 - सुनिता चारोस्कर (राष्ट्रवादी शरद पवार) - एकूण पडलेली मते 93910 - *नरहरी झिरवाळ 44532 मतांनी विजयी* 2. नाशिक पूर्व - *राहुल ढिकले (भाजप)* - एकूण पडलेली मते : 156246 - गणेश गीते (राष्ट्रवादी शरद पवार) - एकूण पडलेली मते 68429 - *राहुल ढिकले 87571 मतांनी विजयी* 3. नाशिक मध्य - *देवयानी फरांदे (भाजप)* - एकूण पडलेली मते : 104986 - वसंत गिते (ठाकरेंची शिवसेना) - एकूण पडलेली मते 87151 - *देवयानी फरांदे 17835 मतांनी विजयी* 4. नाशिक पश्चिम - *सीमा हिरे (भाजप)* - एकूण पडलेली मते : 140773 - सुधाकर बडगुजर (ठाकरेंची शिवसेना) - एकूण पडलेली मते : 72661 - *सीमा हिरे 68116 मतांनी विजयी* 5. देवळाली - *सरोज अहिरे (राष्ट्रवादी अजित पवार गट)* - एकूण पडलेली मते : 81297 - राजश्री अहिरराव (शिंदेची शिवसेना) - एकूण पडलेली मते : 40463 - योगेश घ...

राज्यात ६५.११ टक्के मतदान; नाशिकला ६७.५७ टक्के

मुंबई| विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ६५.११ टक्के मतदान झाले आहे. राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे : अहमदनगर – ७१.७३ टक्के, अकोला – ६४.९८ टक्के, अमरावती – ६५.५७  टक्के, औरंगाबाद- ६८.८९ टक्के, बीड – ६७.७९ टक्के, भंडारा – ६९.४२ टक्के, बुलढाणा – ७०.३२ टक्के, चंद्रपूर- ७१.२७ टक्के, धुळे – ६४.७० टक्के, गडचिरोली – ७३.६८ टक्के, गोंदिया – ६९.५३  टक्के, हिंगोली – ७१.१० टक्के, जळगाव – ६४.४२ टक्के, जालना – ७२.३० टक्के, कोल्हापूर – ७६.२५ टक्के, लातूर – ६६.९२ टक्के, मुंबई शहर- ५२.०७ टक्के, मुंबई उपनगर -५५.७७ टक्के, नागपूर – ६०.४९ टक्के, नांदेड –  ६४.९२ टक्के, नंदुरबार- ६९.१५  टक्के, नाशिक – ६७.५७  टक्के, उस्मानाबाद – ६४.२७ टक्के, पालघर – ६५.९५ टक्के, परभणी – ७०.३८ टक्के, पुणे –  ६१.०५ टक्के, रायगड –  ६७.२३ टक्के, रत्नागिरी – ६४.५५ टक्के, सांगली – ७१.८९ टक्के, सातारा – ७१.७१ टक्के, सिंधुदुर्ग – ६८.४० टक्के, सोलापूर – ६७.३६ टक्के, ठाणे – ५६.०५ टक्के, वर्धा –  ६८.३० टक्के, वाशिम – ६६.०१...

मतदान करा! सोने दागिने मजुरीवर 25% सूट मिळावा:राजापूरकर सराफ यांची खास ऑफर

नाशिक| दिअँकर वृत्तसेवा| जिल्ह्यातील १५ मतदार संघासाठी बुधवारी सकाळी मतदान होईल. जास्तीत जास्त मतदारांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावे, यासाठी शासकीय पातळीवर जनजागृती मोहीम राबवली जात आहे. त्यात आता खाजगी व्यावसायिक ही मागे नाही. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा म्हणून अनेकांनी पुढाकार घेतला असून या अनुषंगाने मतदारांसाठी येथील राजापुरकर सराफ यांच्यातर्फे विशेष ऑफर ठेवण्यात आली आहे.  आपलाच पिढ्यान पिढ्याचा सोनार म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजापूरकर सराफतर्फे मतदान करा व सोने दागिने मजुरीवर २५ टक्के सूट मिळावा, असे जाहीर करण्यात आले. अधिक माहितीसाठी राजापुरकर सराफ यांच्या सिद्धी संकुल, चांदी गणपती मंदिरामागे, नवीन सराफ बाजार गायधनी गल्ली रविवार कारंजा नाशिक येथे संपर्क साधण्याचे आवाहन संचालक चेतन राजापुरकर केले आहे.

राज्यात ९.७ कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क, नाशिकमध्ये ४९२२ मतदान केंद्रे

मुंबई|लोकशाहीच्या उत्सवासाठी अर्थातच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ होत आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर रांगेत उपस्थित असलेल्या सर्व मतदारांचे मतदान होईपर्यंत त्या मतदान केंद्रावर मतदान घेतले जाणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानासाठी 2 लाख 21 हजार 60 बॅलेट युनिटचा वापर केला जाणार आहे.      मतदार नोंदणीत वाढ; राज्यात ९.७ कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघातील सुमारे ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष ५ कोटी २२ हजार ७३९,  तर महिला मतदार ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ इतक्या आहेत, ६ हजार १०१ तृतीयपंथी मतदार असून मतदारसंख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे. राज्यात ४.६९ कोटी महिला मतदार राज्यात 4,69,96,279 महिला मतदार  आहेत. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. दिव्यांग (PwDVoters) मतदारांची एकूण संख्या 6,41,425 इतकी...

विधानसभा निवडणुकीसाठी २ लाखांहून अधिकशाईच्या बाटल्यांची तरतूद

मुंबई| विधानसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी राज्यात सुमारे २ लाख २० हजार ५२० शाईच्या बाटल्यांची तरतूद करण्यात आली आहे. या शाईचे वाटप जिल्हानिहाय करण्यात येत आहे.     राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघांमध्ये  १ लाख ४२७ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदार केंद्रासाठी प्रत्येकी २ शाईच्या बाटल्या याप्रमाणे २ लाख ८५४ शाईच्या बाटल्यांची संख्या होते. २ लाख ८५४ शाईच्या बाटल्यांबरोबरच अधिकच्या म्हणून काही अशा एकूण २ लाख २० हजार ५२० शाईच्या बाटल्या, मतदानासाठी आवश्यक ते साहित्य मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्याची निवडणूक यंत्रणेमार्फत कार्यवाही सुरु आहे.

नाशिकमध्ये ४५ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे; निवडणूक आयोगाचे महत्वपूर्ण आदेश

राज्यात ४२६ मतदान केंद्र  ‘ महिला नियंत्रित ’   मुंबई| केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त ४५ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे असणार आहे. यानंतर जळगावमध्ये ३३, गोंदिया ३२ आणि सोलापूर २९, मुंबई उपनगरमध्ये २६ महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी प्रत्येकी तीन महिला नियंत्रित मतदान केंद्र असतील. महिला नियंत्रित मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वजण महिला असतील. लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी महिला नियंत्रित महिला मतदान केंद्र असणार आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही...

मायबाप जनतेच्या सेवेसाठी राजकारणात: खा. सुप्रिया सुळे यांचा अजितदादांवर पलटवार

नाशिक| दिअँकर वृत्तसेवा| ते त्यांचे मत आहे. लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे. ही निवडणूक आमच्या कुटुंबासाठी नाही लढत, ही वैचारिक लढाई आहे. महाराष्ट्रातील अन्याया विरोधात, मायबाप जनतेसाठी, याभागातील शेतकऱ्यांच्या हमी भावासाठी, महिलांसाठी, महागाई, भ्रष्टाचाराविरोधात ही लढाई आहे. आम्ही घराण्यासाठी राजकारणात आलो नाही. या राज्यातील मायबाप जनतेच्या सेवेसाठी आलो आहे,असे खा. सुप्रिया सुळे अजितदादांवर पलटवार केला.  नाशिक येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ खा. सुप्रियाताई सुळे नाशिक दौऱ्यावर होत्या. पत्रकारांशी संवाद साधतांना अजितदादा पवार यांनी पवार घराण्यातील कटूता कमी होईल असे वाटत नाही, असे स्टेटमेंट दिले होते, त्यावर पलटवार करतांना त्याबोलत होत्या. उद्योगपती अडाणी यांच्याविषयी अजित दादांच्या युटर्न बाबत पत्रकारांनी प्रश्न केला असता. त्यांनी सांगितले, हा प्रश्न अजित पवारांना विचारा मी पहिल्याच दिवशी सांगितले होते. त्यांनीच स्टेटमेंट दिले. त्यांनी युटर्न घेतला. दोन्ही प्रश्न त्यांनाच विचारा असे सांगून अधिक काही बोलण्यास नकार दिला. साहेब पहिले म्हणायचे सुप्रियाकडे लक्ष दया आता ना...

आम्ही विकासासाठी महायुती सोबत गेलो,पण शाहू- फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर ठाम: अजित पवार

नाशिक| दिअँकर वृत्तसेवा| भाजपा महायुतीसोबत जाण्याचा निर्णय कोणा एकाचा नाही तो आम्ही सर्वांनी मिळून घेतलेला निर्णय आहे. आम्ही विकासासाठी हा निर्णय घेतला. पण शाहू- फुले-आंबेडकर यांची विचारधारा सोडलेली नाही. काल,आज आणि उद्याही त्यावर आम्ही ठाम राहू असा पुनर्रउच्चार उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी येथे केला. दिंडोरी पेठ मतदार संघाचे उमेदवार विधान परिषदेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. अजित पवार पुढे म्हणाले की, लखामापूरला कार्यक्रम घेऊन मोठा निधी उपलब्ध करून दिला. दिंडोरी पेठ मतदार संघातील वळण बंधाऱ्या सहित जे कामे आहेत त्याच्या विकासासाठी निधी दिला. या आधी मिळाला नसेल इतका ३ हजार कोटी रुपये एवढा ऐतिहासिक निधी दिला. दिंडोरी पेठच्या विकासाला अग्रक्रम दिला.  भाजपा महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय एकट्या झिरवाळ यांचा नाही, तो सर्व नेत्यांचा होता, त्यात जयंत पाटील आणि राजेश टोपे यांचा ही होता असा स्पष्ट करुन पहिले अडीच वर्ष शिवसेनेसोबत जाणार मह त्यांची विचारधारा ही वेगळी होती, शिवसेना काँग्रसची देखील विचारधारा वेगळी होती मग भाजपा सोबत गेलो तर काय झाले...

भुसावळ विभागाला १२१ कोटींचा महसूल प्राप्त

नाशिक रोड|  प्रतिनिधी| ना शिक, मनमाड, इगतपुरी या महत्वाच्या स्थानकांचा समावेश असलेल्या भुसावळ विभागाला ऑक्टोबर महिन्यात १२१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.भु सावळ या वित्तीय वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात प्रवासी वाहतूकीतून ६३ कोटी रुपये,   अन्य कोचिंगमधून ६.५५ कोटी,    माल वाहतुकीतून ५१.३९ कोटी, अन्य स्त्रोतातून २.३९ कोटी मिळाले. तिकीट तपासणीने महत्त्वाचे योगदान दिले आहे. तिकीट तपासणीच्या ५४ हजार प्रकरणांमधून ३ कोटी १६ लाखांचा महसूल मिळाला.  ऑक्टोबर २४ मध्ये ऑटोमोबाईलच्या ४९ मालगाड्यांमधून (रेक्स) वाहने देशभरात पाठिवण्यात आल्या. त्यातून ६.२०   कोटीचा महसूल मिळाला.  या ४९   रेक्सपैकी नाशिकमधून २५ आणि देवळालीतून २४   रेक पाठविण्यात आले. ऑ क्टोबरमध्ये प्रवाशांसाठी मनमाड स्थानकावर बॅटरी कार सेवा सुरू करण्यात आली आहे. या सुविधांमुळे ज्येष्ठ नागरिक ,  दिव्यांग ,  महिला आणि रुग्णांची  सोय झाली आहे.  प्रवाशाची गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊनच    प्रवास करावा असे आवाहन रेल्वेने ...

शेतमालाला चांगली किंमत दिल्यास शेतकऱ्यास सन्मानाने जगात येईल: शरद पवार

नाशिक| शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. शेतकऱ्यांना घेतलेले कर्ज फेडता येत नाही. त्याच्या मालाला चांगली किंमत मिळत नाही, त्यामुळे कर्ज फेडण्याची त्याची शक्ती क्षीण झाली आहे. तो कर्जबाजारी होत आहे अशी समस्या महाराष्ट्रात निर्माण झाली असून त्याची यापासून सुटका करायची असेल तर त्याच्या शेतमालाला चांगली किंमत दिल्यास काळया आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यास सन्मानाने जगता येईल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आज येथे केले. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शरद पवार हे नाशिक दौऱ्यावर होते. शहरातील उमेदवारांच्या नाशिक येथील आयोजित सभेत ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष गजानन शेलार, गोकुळ पिंगळे, पुरुषोत्तम कडलग, नाशिक पूर्वचे उमेदवार गणेश गिते, मध्यचे वसंत गिते. देवळाली मतदार संघाचे योगेश घोलप उपस्थित होते. पवार पुढे म्हणाले की, भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांना रोखण्यासाठी आम्ही इंडिया आघाडी बनवली. देशाची सर्व शस्त्रे त्यांच्या हाती गेल्यास सर्व देशभर अस्थिर परिस्थिती निर्माण होईल. पंतप्रधान ४०० जागा मागत ...

फडणवीस अन् मनकवडे मोदी?

फडणवीस अन् मनकवडे मोदी? महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दुसऱ्या टप्प्यात येऊन पोहचली आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांचा प्रचार सभांचा धडाका सुरू असून आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळे येथून महाराष्ट्राच्या प्रचाराचा श्रीगणेशा करून निवडणुकीची रंगत वाढवली आहे. धुळ्याच्या सभेत मोदी यांनी महाविकास आघाडीवर शरसंधान साधले. विकासासाठी केंद्रात सत्ता दिली तशी महाराष्ट्रात ही भाजपा महायुतीला द्या, आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या मनातील इच्छा  पूर्ण करू असे जनतेला आश्वासन दिले. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातील प्रचारादरम्यान अमित शहा यांनीही पंतप्रधानाच्या आश्वासनाची री-ओढत याचा पूनर्रउच्चार केला. अन् फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचे सूतोवाच असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले गेलेे.  मोदी-शहा यांनी महाराष्ट्रात येऊन असे संकेत दिले, त्याला अनेक घडामोडींची पार्श्वभूमी आहे. दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होता होता फडणवीस यांना अचानक उपमुख्यमंत्री व्हावे लागले, ते तयार नव्हते पण सरकारवरील पक्षांची पकड राहावी यासाठी शहा यांनी काढलेल्या समजुतीनंतर उपमुख्यमंत्री म्हणून काम कर...

आचारसंहिता अंमलबजावणी दरम्यान ४९३ कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई| विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी  १५ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण ४ हजार ७११ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ४ हजार ६८३ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते. ४९३ कोटी ४६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत दि. १५ ऑक्टोबरपासून आजपर्यंत एकूण ४९३ कोटी ४६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या संकल्पपत्राचे प्रकाशन

मुंबई |भाजपाचे संकल्पपत्र हे महाराष्ट्राला देशात अव्वल स्थानी राखणारे ठरेल, तसेच या संकल्पपत्राच्या आधारे  महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर्सचे  उद्दीष्ट पार करेल असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री श्री अमिअत शाहा यांनी केले. आगामी निवडणुकांसाठीच्या  महाराष्ट्र भाजपाच्या संकल्पपत्राचे प्रकाशन काल मुंबईत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री अमित शाहा यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते पत्रकारांना संबोधित करीत होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की हे संकल्पपत्र जनतेचे संकल्प साकार करणारे ठरेल. तर यावेळी बोलतांना भाजपाच्या जाहिरनामा समितीचे प्रमुख मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की जनतेच्या सहभागातून तयार करण्यात आलेले हे संकल्पपत्र राज्याच्या विकासाचे दृष्टीपत्र ठरणार आहे.  रविवारी मुंबईत एका पत्रकार परिषदेत महाराष्ट्र भाजपाच्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या संकल्पपत्राचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे, उप...

महाविकास आघाडीचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर

मुंबई| महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रनामा या जाहिरनाम्याचे हॉटेल ट्रायडंटमधील भव्य पत्रकार परिषदेत प्रकाशन रविवारी करण्यात आले. मविआ सत्तेत आल्यानंतर पहिल्या १०० दिवसात काय कामे करणावर व पाच वर्षांत काय काम करणार हे या जाहीरनाम्यात सविस्तर मांडण्यात आले आहे. या महाराष्ट्रनामामध्ये महिलांना वर्षाला ६ सिलेंडर ५०० रुपयात दिले जातील, महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी शक्ती कायदा आणला जाईल. ३०० युनिट पर्यंत वीजवापर असणा-या ग्राहकांना १०० युनिट मोफत वीज, नवीन औद्योगिक धोरणात रोजगार निर्मितीवर भर असेल. सरकारच्या विविध विभागातील रिक्त २.५ लाख जागा भरल्या जातील. एमपीएससीच्या माध्यमातून नोकर भरती केली जाईल. सरकारी नोकऱ्यातील कंत्राटी भरती पद्धत बंद करणार, सरकारी विभागातील जागांचा अनुषेश भरून काढणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक ठरवून निवडणुका घेतल्या जातील. महाराष्ट्राच्या विकासासाठी कृषी, ग्रामविकास, उद्योग, रोजगार, शहरी विकास, जनकल्याण यावर आधारित आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्रनामा प्रकाशित करत आहोत. महामानव डॉ. बाबासाहेब आंब...

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य

मुंबई| विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे, अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. १२ प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे, ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत, अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त 12 पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्र नसल्यास 12 प्रकारच्या पुराव्यांमध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभ...

बाप नव्हे, काकाच पूर्ण करणार; जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर

नाशिक| राज्याचे उपमुख्यमंत्री सांगलीत गेले म्हणाले, यांनी जेवढ्या घोषणा केल्या त्या यांच्या बापकडून ही पूर्ण होणार नाही, अरे बापाचा विषय नाही या घोषणा तुझा काकाच पूर्ण करणार तुम्ही चिंता करू नका असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले. नाशिक येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मखमलाबाद येथे जाहीरसभा झाली. विरोधकांचा समाचार घेतांना ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते पंडित पिंगळे, श्रीराम शेटे, खा. भास्कर भगरे, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष गजानन शेलार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरूषोत्तम कडलग, अजय बागुल, गोकुळ पिंगळे, गणेश गिते आदी उपस्थित होते. लोकसभा निवडणूक झाली, महायुती घाबरली दिसेल त्याला घेतले, सरकार जाणार म्हणून ५० ते ३० हजार कोटींचे निर्णय घेतले. जाहिरात देऊन कामे केल्याचा बनाव केल्याचा आरोप पाटील यांनी केला. लोकसभेत आधी बहिणीला त्रास दिला, पाडायचा प्रयत्न केला, पाडण्यासाठी टोकाच्या भाषेचा वापर केला. आता लोकसभा निवडणुकीनंतर सर्व बहिणी लाडक्या झ...

महाविकास आघाडीचे घोषणापत्र म्हणजे घोटाळापत्र: नरेंद्र मोदी

नाशिक|दिअँकर वृत्तसेवा| एकीकडे महायुतीचे घोषणापत्र तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे घोटाळापत्र आहे. हे पक्के आहे की जेथे काँग्रेस व त्यांचे सहकारी पक्ष आहे तेथे घोटाळा होणारच असे सांगून ते अशा योजनांची घोषणा करतात की ज्यामध्ये जास्तीत जास्त घोटाळा होईल, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केली. नाशिक येथील तपोवन मैदानात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी काँगेस आणि सहकारी पक्षांच्या महविकास आघाडीवर सडकून टीका केली त्याप्रसंगी ते बोलत होते. मोदी म्हणाले की, महाराष्ट्र विकसित झाला तर भारत विकसित होईल त्यासाठी आपला आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. महाराष्ट्रातील लोकांनी लक्षात घेतले पाहिजे की महाराष्ट्रात भाजप महायुती आहे म्हणून गती आणि प्रगती आहे देश विकास करत असून विकासाचे नवे रेकॉर्ड बनत आहे. देशात गरिबांची चिंता करणारे सरकार असून गरीब पुढे गेला तर देश पुढे जाईल, मात्र काँग्रसने गरिबी हटावचा नारा दिला तरी गरीब रोटी, कपडा आणि मकानपासून काँगेसच्या काळात वंचित राहिला. केंद्रातील भाजपा सरकारच्या १० वर्षाच्या कार...