Skip to main content

Posts

Showing posts from September, 2020

🌹🌲🌳"माझी शाळा" 🌳🌲🌹

🌹🌲🌳"माझी शाळा" 🌳🌲🌹  ******************************* फोटो:जी पी खैरनार  लहानपणीची शाळा आमची, खुप छान होती हो ! माती कौलारु छत होतं, अंगणात घाण नव्हती हो !!                      शाळा जरी साधी होती,                       गुरुजी आमचे होते हुशार !                       साधी भोळी राहणी त्यांची,                       उच्च होते त्यांचे विचार !!  शाळेत येणारी सारी मुलं,  कुटुंबातील वाटायची हो ! दुपारी जेवनाच्या सुट्टीत,  एकत्र सारे खदाडायचो हो !!                     गुरुजी दारात दिसता क्षणी,                      भीती खुप वाटायची हो !                     नवीन पाढा शिकविणार म्हणून,...

नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त खाटा आणि ऑक्सीजनची व्यवस्था व्हावी: संसदेत शून्य प्रहरात खा. डॉ. भारती पवार यांची महत्वपूर्ण मागणी

नाशिक| कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता नाशिक जिल्ह्यात अतिरिक्त रुग्ण खाटा व ऑक्सिजनची व्यवस्था करण्याची खा.डॉ.भारती पवार यांनी केली संसदेत मागणी नाशिक जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस जलद गतीने वाढत असल्याने दिल्ली येथे सुरू असलेल्या संसदीय अधिवेशनात शून्य प्रहरात प्रश्न मांडत खा.डॉ.भारती पवार यांनी अध्यक्षांच्या माध्यमातून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांचे लक्ष वेधले.  नाशिक येथील जिल्हा सामान्य रूग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर व बेडच्या पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात कमतरता भासत असल्याने अनेक रुग्णांना आरोग्य सुविधे अभावी खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. तर बऱ्याच रुग्णांना वेळेवर उपचारांसाठी खाटांची उपलब्धता होत नसल्याने त्यांची हेळसांड होत आहे तर अनेकांना उपचारा अभावी जिव गमवावे लागले आहे.  केंद्र सरकरमार्फत लवकरात लवकर मध्यवर्ती पथकाकडून (केंद्रीय पथक) नाशिक जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालयांचा योग्य तो आढावा घेण्याची मागणी खासदार डॉक्टर भारती पवार यांनी केली आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात जा...

🌹🌳🌲🌳🌹बालपण 🌹🌳🌲🌳🌹

_*🌹🌳🌲🌳🌹 बालपण 🌹🌳🌲🌳🌹*_  *************************************** फोटो:जी पी खैरनार * _बालपणीचा काळ आमचा,_* *_खुप होता चांगला !_* *_दांडाफळी घरं होती,_* *_नव्हता तेव्हा बंगला !!_*                      _*घरं जरी साधी होती,*_                       _*आजी होती प्रेमाळू !*_                       _*साधी भोळी राहणी होती,*_                       _*देवभोळी असे श्रद्धाळू!!*_  *_घरी येणारे सगळे पाहुणे,_*  *_आपलेच वाटायचे हो !_* *_सण दिवाळी दसऱ्याला,_*  *_आनंदाने भेटायचे हो !!_*                     *_मामा दारात दिसला की,_*                      *_आकाश ठेंगणे व्हायचे हो !_*                   ...

अभिप्राय योजनेद्वारे नाशिक जिल्ह्यातील मांडलेले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

नाशिक| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष अभिप्राय योजनेला जिल्ह्यात चांगले यश मिळाले असून अनेक प्रश्न आपल्यापर्यंत आले आहे. त्याची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच पक्ष संघटना वाढविण्यासाठी सक्षमपणे काम करणारे लोक पुढे यायला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे केले. नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले असतांना त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय नाशिक येथे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. सरकार  स्थापन झाल्यानंतर देशात आणि राज्यात दुर्दैवाने कोरोनाची महामारी पसरली त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला असून त्यातून मार्ग काढत शासन जनतेच्या हिताचे धोरणात्मक निर्णय घेत आहे. याच काळात नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाचे सूक्ष्म नियोजन करत उपाययोजना करण्यात आल्याने राज्याच्या तुलनेत नाशिकचा मृत्युदर कमी करण्यात यश मिळाले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंलदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रदेशा...

वाढदिवशी आकाश पगार अडकले जागृती देवरे यांच्या लग्न बेडीत; मान्यवरांनी दिले नववधूवरांना आशीर्वाद

नाशिक|राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांचा मुलगा आकाश व मुख्याध्यापक दिलीपराव देवरे यांची कन्या जागृती यांचा विवाह मोजक्या वऱ्हाडींच्या उपस्थितीत संपन्न झाला. तर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातुन ॲानलाईन पद्धतीने हजारो नेटकऱ्यांनी या विवाहास हजेरी लावत वधुवरांना आशीर्वाद दिले. नाशिक येथील हाॅटेल एक्सप्रेस इन येथे संपन्न झालेल्या या विवाहास पालकमंत्री ना.छगनराव भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदामंत्री ना.जयंतराव पाटील, गृहनिर्माण मंत्री ना.जितेंद्र आव्हाड, विधानसभेचे उपाध्यक्ष ना.नरहरी झिरवाळ, अभिनेता अभिजीत खांडकेकर, पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर, माजी मंत्री विनायकदादा पाटील, बापुसाहेब भुजबळ, आमदार हेमंतराव टकले, आ.दिलीपराव बनकर, आ.नितीनभाऊ पवार, आ.सरोजताई आहिरे, आ.हिरामण खोसकर, आ.सीमाताई हिरे, आ.दिलीपजी बोरसे, माजी आमदार दिपीकाताई चव्हाण, संजयनाना चव्हाण, जयंतराव जाधव, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डाॅ.सयाजीराव गायकवाड, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.भगीरथजी शिंदे, एम.ई.टी.शिक्षण संस्थेच्या संचालिका डाॅ.शेफालीताई भुजबळ, संचालक दिलाप...

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून पाहणी

नांदेड| जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीसह अनेक भागात नदी-नाले, ओढ्यांना पूर आल्यामुळे काही भागातील शेतकऱ्यांची शेतातील माती पिकासह वाहून गेली आहे. या नुकसानीची मला कल्पना असून जिल्ह्यात यापूर्वीच एक व्यापक आढावा बैठक बोलवून प्रत्येक ठिकाणचे पंचनामे करण्याचे निर्देश मी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. शासन स्तरावरुन शेतकऱ्यांसाठी जे काही करता येणे शक्य आहे ते जरुर करु या शब्दात नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या बांधावर जाऊन धीर दिला.   अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचा झालेल्या आढावा घेण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह भोकर तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन पाहणी केली. शेताच्या बांधावरच त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब कदम, जिल्हा परिषद सदस्य प्रकाशराव भोसीकर, भोकरचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिक...

औरंगाबाद जिल्ह्यात 23681 कोरोनामुक्त, 5954 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद| विशेष प्रतिनिधी| जिल्ह्यात आज 404 जणांना (मनपा 255,  ग्रामीण 149) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 23681 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 323 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 30491 झाली आहे. आजपर्यंत एकूण 856 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 5954 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. फोटो: फाईल अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पाइँटवर 59, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 97 आणि ग्रामीण भागात 64 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्णसंख्या) आहे. ग्रामीण (101) साशेगाव (2), गणेश चौक वाळूज (1), कमलापूर रोड वाळूज (1), संत कॉलनी , वाळूज (1), शिवनेरी कॉलनी, रांजणगाव (1),ओम साई नगर , रांजणगाव (1), बजाजनगर, रांजणगाव (1), सारा गौरव, फुलंब्री (1), बिडकीन (2), शिवना (1), भवानी नगर, बजाज नगर (1), लासूर स्टेशन (3), वीरगड, लासूर स्टेशन जवळ (1), संतोषी माता कॉलनी, कन्नड (1), शिवाजी नगर, कन्नड (1), यशवंत नगर, पैठण (2), भवानी नगर, पैठण (1), राम नगर, पैठण (1), महावी...

आपण माणूस म्हणून कसे आहोत याला ही महत्व असते:उपाध्याय पी. पी. प्रवीणऋषीजी

नाशिक|आपण व्यापारी, कारखानदार, व्यावसायीक नंतर आहोत. आधी माणूस आहोत. माणूस म्हणून कसे आहोत हे विशेष महत्वाचे असते असे प्रतिपादन उपाध्याय पी. पी. प्रवीणऋषीजी ( एम. एस) यानी केले .    ते पुढे म्हणाले की, श्रेष्ठ लोकांसोबत जा श्रेष्ठ व्हा आणि इतरांना श्रेष्ठ बनवा, यशस्वी लोकांनाच आठवावे, कोणाकडून प्रशिक्षण घ्यावे, योग्य गुरु निवडावा जो तुमच्या चुका माफ करणार नाही सुधारून घेईल, व्हिजन क्लिअर असावे, सहयोग देणे आणि घेण्यामुळे व्यक्ती समर्थ बनतो. या पाच सूत्रामुळे व्यक्ती यशस्वी होतो आणि यशस्वी माणूस यशस्वी उद्योजक निश्चित होतो. सहयोग घेण्याची कला मधमाशीकडून शिका स्वतः श्रेष्ठ बना इतरांना श्रेष्ठ बनवा. रस्त्यावर चालणारे बनू नका रस्ता निर्माण करणारे बना असे सांगून उपाध्याय पी. पी. प्रवीणऋषीजी ( एम. एस) यांनी शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी यांच्यासह अनेक मान्यवरांची उदाहरणाद्वारे दिले.     सुरवातीला मंत्राचा पाठ केला.  महाराष्ट्र चेंबरतर्फे आयोजित यशस्वी व्यक्ती किंवा यशस्वी व्यावसायिक होऊ इच्छिता ? याविषयावर मार्गदर्शन करतांना यशस्वी होण्याचे ५ सूत्र ...

गुजरात महाराष्ट्र सीमेवरून ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करा: ट्रान्सपोर्ट असोसिएशन

नाशिक: गुजरात महाराष्ट्र सीमेवरून ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन व गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांच्याकडून परिवहन विभागाकडे करण्यात आलेली आहे. याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय आहिरे यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन अध्यक्ष पी.एम सैनी, सल्लागार प्रदीप जोहर, संजय राठी, उपाध्यक्ष सुभाष जांगडा, देविदास हाकेरे, दीपक मांडलिक, भाऊसाहेब पाटील, प्रमोद देशमुख, रामभाऊ सूर्यवंशी आदी उपस्थित होते. याबाबत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड व नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन अध्यक्ष पी.एम सैनी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र गुजरात राज्यांची बॉर्डर असलेल्या पेठ, बोरगांव व सुरगाणा या मार्गे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक होत असून याबाबत परिवहन विभागाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत जिल्ह्यातील विविध वाहतूक दारांकडून नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन व नाशिक गुड्स ट्...

🌹🌳"काळ कोरोना"🌳🌹

_ *🌹🌳"काळ कोरोना"🌳🌹*_  ***************************   पाहुणा म्हणुन उभा,                     दिसता लोकांचे दारी !  लोक म्हणती कोरोना,                    आलाय आमचे घरी !!  जागरुकता लोकांची,                   जन माणसाच्या दारा !  माझे मन म्हणे मला,                     घरी थांबलेला बरा !!  सुप्त फिरती कोरोना,                       रोग जनमानसात !   जीव घेणं बळ आहे,                 कोरोनाच्या विषाणूत !!  दोन हात करु आता,                   जागतिक संकटाशी !  साथरोग आळा घालु,                  नियम घालु स्वतःशी !!  अर्थचक्र सुरु ठेऊ,      ...

मराठा क्रांती मोर्चा समन्वयक ना.भुजबळ यांच्या भेटीला; मराठा आरक्षणाला माझा पूर्णपणे पाठींबा: छगन भुजबळ

नाशिक| महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे मराठा समाज बांधवाना मोठा दिलासा मिळाला. मात्र नुकताच मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे ही लढाई आता पूर्णपणे न्यायालयीन झाली आहे. त्यामुळे मी जरी ओबीसी नेता असलो तरी मराठा आरक्षणाला माझा पूर्णपणे पाठींबा असून माझा पक्ष, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सर्वेसर्वा खासदार शरदचंद्रजी पवार साहेब आणि राज्यशासन यांचा देखील मराठा आरक्षणास  १०० टक्के पाठींबा असून राज्यशासनाच्या वतीने न्यायालयात हा लढा पूर्ण ताकदीने लढला जाईल. तसेच मराठा मोर्चा समन्वयकांवरील गुन्हे मागे घेणे, सारथी पूर्ण क्षमतेने सुरु करणे, मराठा मुलीसाठी वसतिगृह या सर्व मागण्या आपण शासन दरबारी मांडून त्या पूर्ण करू असे आश्वासन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ यांनी दिले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार जयवंतराव जाधव, नाना महाले, सुनील बागुल, निवृत्ती अरिंगळे, रंजन ठाकरे, ज्येष्ठ नगरसेविका वत्सला खैरे, करण गायकर,...

तुम्ही प्रयत्न करा, नोकरी आम्ही मिळून देऊ: प्रेरणा बलकवडे यांचे आवाहन! मेळाव्याला ६०० युवक युवतींचा प्रतिसाद

नाशिक| वेळ कठीण आहे पण युवक-युवतींनी गोंधळून न जाता नोकरीसाठी सतत प्रयत्नशील रहावे आम्ही ही तुम्हाला नोकरी मिळून देण्यास कटिबध्द आहोत असे आवाहन  राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि झेप भरारी फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी आज येथे केले आहे.  नोकरी मेळाव्याप्रसंगी बेरोजगार युवक युवतींना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.भगूर शहरात युवक युवतींसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि झेप फाऊंडेशनच्या वतीने(Job Fair2020) नोकरी मेळाव्याचे करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी सुमारे ६०० हून अधीक युवक युवतींनी सहभाग नोंदवला.  करोनाच्या पार्श्वभुमीवर लाॅकडाऊनमुळे परप्रांतीय कामगारांचे इतर राज्यात स्थलांतर झाले आहे. त्यामुळे उद्योगीक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. या पार्श्वभुमीवर पुणे,मुंबई, नाशिक, नागपूर येथील नामांकीत अस्थापना कंपन्यांमध्ये विविध प्रकारच्या रिक्तपदांसाठी मोठी संधी देऊ केली आहे.  तरुणांसाठी आज घडीला नोकरी मिळवणे हे खुप कठीण काम वाटते. ‌ योग्य माहितीची कमतरता, अधिक माहिती, नेमका इंटरेस्ट कशात याविषयी माहिती नसणे, करिअरविषयीचे अनेक सम...

नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून चालक दिन साजरा

नाशिक| कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सचे पालन करत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून चालक दिन साजरा करण्यात आला. यावेळी चालक दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील १ हजार चालकांना अल्पोपहार, मास्क, सॅनिटायझरसह आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप करण्यात आले. नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने आज द्वारका, आडगाव ट्रक टर्मिनल, सिन्नर फाटा, ओझर, पिंपळगाव बसवंत या विविध ठिकाणी सोशल डिस्टन्सचे पालन करत चालक दिन साजरा करण्यात आला . दि.१७ सप्टेंबर हा देशभर चालकदिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून गेल्या आठ वर्षांपासून नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने चालकांचा सन्मान करून त्यांच्यासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. यंदाच्या वर्षी मात्र देशात आणि राज्यात कोरोना महामारीमुळे एकत्रित येत चालक दिन साजरा करता येणे शक्य नसल्याने नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने सोशल डिस्टन्सचे पालन करत चालक दिन साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे चालकांच्या आरोग्याचा विचार करून एक हजार चालकांना मास्क, सॅनिटायझर, आर्सेनिक अल्बम ३० गोळ्या व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी नाशिक ट्रान्सपोर्ट अ...

भगूर पंचक्रोशीतील युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास कटिबध्द: प्रेरणा बलकवडे

नाशिक|नाशिक जिल्ह्यातील झेप फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्य मार्फत पुणे येथील जगदंबा ऑटो कोम्पोनंटस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत नाशिक जिल्ह्यातील २५ युवकांस रोजगार उपलब्ध झाला आहे. भगूर पंचक्रोशीतील युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास कटिबध्द असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आणि झेप भरारी फाउंडेशनच्या सौ.प्रेरणा बलकवडे यांनी केले.  झेप भरारी फाउंडेशन समाजातील सर्वच घटकांसाठी काम करत आहे, कोरोना महामारीमुळे आज अनेक युवक बेरोजगारीच्या विळख्यात सापडले आहे.  शिक्षित तरुणांपुढे रोजगाराचा प्रश्न उभा राहिलेला असून अशा कठीण कालावधीत रोजगार मेळावे घेऊन युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याच्या संकल्पनेला राष्ट्रवादी महिला  काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष व झेप फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ.प्रेरणा बलकवडे यांनी मुहूर्तरूप दिले, त्यासाठी वर्चुअल रोजगार मेळावा भरवून त्यांनी पहिल्या टप्प्यात युवकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आधारित नोकरी अश्याप्रकारे  २५ मुलांसाठी नोकरीची व्यवस्था करून दिली. त्यासोबतच त्याच तरुणांची तिथे राहण्याची व जेवण्या...

आरोग्य विद्यापीठात पदवी महाविद्यालय आणि पदव्युत्तर संस्था सुरू करण्यासाठी अहवाल तयार करा: ना.अमित देशमुख

मुबई| महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने विद्यापीठ परिसरात नवीन वैद्यकीय पदवी महाविद्यालय व वैद्यकीय पदव्युत्तर संस्था तसेच आयुर्वेद, होमिओपॅथी आणि भौतिकोपचार पदवी महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा परिपूर्ण अहवाल तयार करून विभागास सादर करावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर यांना आज दिले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कामकाजासंदर्भातील आढावा बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर,  कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, टाटा मेमोरियल सेंटरचे डॉ. कैलास शर्मा, रिलायन्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. गुस्ताद डावर यांच्यासह विद्यापीठाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत विद्यापीठ कामकाजाचे सादरीकरण, तसेच विद्यापीठाचे प्रस्तावित पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय,आयुर्वेदिक, होमियोपॅथी महाविद्यालयांना स्थापनेच्या अनुषंगाने आढावा आणि सादरीकरण तसेच विद्यापीठाने कोविड -19 च्या अनुषंगाने विद्यापीठाने केलेली कामे या...

पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांची मुंबईत बदली, नाशिक आयुक्तपदी दिपक पांडे: राज्यातील ४५ अधिकाऱ्यांच्या बदल्या

पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांची बदली मुंबईत झाली असून नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी दिपक पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नाशिक विशेष पोलिस महानिरीक्षकपदी प्रताप दिघावकर यांची नियुक्ती झाली आहे असून छेरिंग दोरजे यांची मुंबईत आयजी म्हणून बदली करण्यात आहे. गणेशोत्सवानंतर गृहविभागाकडून राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. राज्यात एकूण ४५ जणांच्या बदल्यांच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाली आहे. आज या बदल्याचे आदेश निघाले आहे. मुंबईच्या सहआयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील आणि मिलिंद भारंबे यांची नेमणूक करण्यात आली आहे. नाशिक पोलिस आयुुुक्तपदी दिपक पांडे यांंची वर्णी लागली आहे. पिंपरी चिंचवड आयुक्त म्हणून कृष्णप्रकाश यांची नेमणूक करण्यात आली आहे. नवी मुंबई आयुक्तपदी बिपीन सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कर्णिक यांची पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे. तर लाचलुचपत प्रतिबंधक महासंचालक म्हणून रजनीश सेठ यांची नियुक्ती झाली आहे.

मित्रा पांडुरंग, तुझी आठवण कायम येत राहिल: पत्रकार शरद जाधव

पांडुरंग सोडून गेला यावर अजूनही विश्वास बसत नाही. चांगला सहकारी आणि मूळात उत्तम माणूस...कायम हसणारा, संयमी, कधी कुणाला न दुखावणारा पांडुरंग.. मित्रा मनाला चटका लावून गेलास तू.. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं महानगर असलेल्या पुण्यात पांडुरंगला वाचवण्यासाठी प्रशासन कमी पडलं यापेक्षा दुर्देव काय म्हणता येईल..? पेशंटसाठी ऑक्सिजन बेड न मिळणं, दुसऱ्या रुग्णालयात नेण्यासाठी वेळेवर कार्डियाक ॲम्ब्युलन्सही न मिळणं हे धक्कादायक आहे..  ई.टी.व्ही.मराठी, एबीपी (स्टार)माझा, tv9 मराठी दोन्ही ठिकाणी आम्ही सोबतच काम केले..कायम माती आणि शेतीशी नाळ जोडलेला पत्रकार.. बोलण्यातही गावरानपणा..त्यामुळे एबीपीच्या डेस्कवर आमची चांगलीच गट्टी जमायची.. सातबाराचं बातमीपत्र करत असल्यामुळे पांडुरंग लवकर ऑफिसला यायचा.. त्यामुळे दुपारच्या जेवणासाठी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही सोबतच जायचो.. पांडुरंग नगरला रिपोर्टिंगसाठी गेल्यानंतरही मी असाईन्मेंट असल्यामुळे आमचे दररोज बोलणे व्हायचं.. इकडे आता tv9 ला काम करतानाही आम्ही नेहमी बोलायचो.... सुरुवातीलाच पांडुरंगची 'नेते..शरदराव' म्हणून हाक असायची.. आधी घरी काय याची विच...

पर्यावरणपूरक 'देव द्या, देवपण घ्या!' या उपक्रमाच्या १० व्या वर्षाची यशस्वी सांगता

नाशिक|सोशल डिस्टींक्शनचे नियम पाळत, फेस शिल्ड, फेस मास्क, हातमोजे व सॅनिटायझरचा वापर करत  १० व्या वर्षीचा देव द्या, देवपण घ्या उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गणेश विसर्जनाच्या निमित्ताने चोपडा लाँन्सजवळील गोदापार्क येथे सकाळी ८ वाजेपासून “देव द्या देवपण घ्या” या उपक्रमाचे कार्यकर्ते मूर्ती स्विकारण्यासाठी उपस्थित होते. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्ती संकलित करणाऱ्या कार्यकर्त्यांनी फेस शिल्ड, फेस मास्क, हातमोजे घातले होते. घरगुती गणेशोत्सवातील गणेश मूर्ती  दान करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या हातावर सॅनिटायझर देण्यात येत होते. तसेच गणपती मूर्तीवर देखील सॅनिटायझरची फवारणी केल्यानंतरच ती स्वीकारण्यात येत होती. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधने व निर्माल्यामुळे गोदावरीचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. त्यामुळे विद्यार्थी कृती समिती तर्फे गेल्या १० वर्षांपासून “देव द्या, देवपण घ्या” हा उपक्रम राबविण्यात येतो. गणेशोत्सवातील १० दिवस विद्यार्थी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी जनजागृती करणारे पत्रके घराघरात वाटली होती. त...