Skip to main content

Posts

Showing posts from December, 2021

नाशिकमधून विमानसेवा सुरू करण्यास इंडिगो सकारात्मक

नाशिक| नाशिकमधून देशात व परदेशात इंडिगो एअरलाइन्सतर्फे विमान सेवा सुरू करण्यात यावी याविषयावर  महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष श्री. सुधाकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पद्मश्री बाबुभाई राठी सभागृहात इंडिगो एअरलाइन्सचे सेल्स मॅनेजर गौरव जाजू व मॅनेजर कार्पोरेट सेल्स श्री. शशांक लठू यांच्यासमवेत बैठक झाली.  इंडिगो एअरलाइन्सचे  मॅनेजर सेल्स श्री. गौरव जाजू व कार्पोरेट सेल्स मॅनेजर शशांक लठू यांनी नाशिकमधून विमानसेवा सुरु करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सुरवातीला महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष श्री. सुधाकर देशमुख यांनी स्वागत केले व महाराष्ट्र चेंबरच्या कार्याची माहिती दिली.  नाशिकमधून इंडिगोने देशभर विमानसेवा सुरु करावी. विमानसेवा सुरू करण्यासाठी सर्वसुविधा व पोषक वातावरण असून इंडिगोला चांगला प्रतिसाद मिळेल असे सांगितले. उपस्थित सदस्यांनी नाशिक व उत्तर महाराष्ट्राच्या व्यापार, उद्योग व कृषी क्षेत्राची माहिती दिली. इंडिगो लवकच नाशिकमधून विविध शहरात विमानसेवा सुरु करेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रसंगी सौ. सुनीता फाल्गुने, श्री. संजय सोनवणे, श्री. संजय राठी, श्री. ...

समाज आणि देशासाठी आपण काय करु शकतो हे चिंतन करण्याची गरज: कुलगुरू डॉ. कानिटकर

नाशिक| समाज व देशासाठी आपण काय करु शकतो हे चिंतन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) अ.वि.से.प., वि.से.प. यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष व सुशासन दिन निमित्ताने विद्यापीठातर्फे आयोजित कार्यक्रमात केला. याप्रसंगी मा. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, ओरिजिन फाउंडेशनचे संस्थापक डॉ. संदिप माने आदी मान्यवर उपस्थित होते . लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) अ.वि.से.प., वि.से.प. मा. कुलगुरु यांनी सांगितले की, आपण ज्या समाजात राहतो त्यासाठी, आपण ज्या संस्थेत काम करतो त्यासाठी आणि आपल्या देशासाठी आपण काय करु शकतो यांचे चिंतन करण्याचा सुशासन दिन हा दिवस आहे. या निमित्ताने विविध संकल्प करुन समाजाच्या सकारात्मक वाटचालीकरीता प्रयत्न करणे गरजेचे आहे.  सुशासन दिनाच्या निमित्ताने संकल्प करुया की, नवनवीन गोष्टी आत्मसाद करुन स्वतःमध्ये बदल घडवू. स्वतःला बदलले की समाज बदलेल व देशाची भरभराट होईल. आरोग्य आणि तणाव यांचे संतुलन राखण गरजेचे आहे, यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे असे त्यांनी सांगितले. ओरिजिन फाउंडेशनचे संस्थापक डॉ. संदिप माने य...

'सुविचार गौरव' पुरस्कार जाहीर: अभिनेत्री पुजा सावंत व अभिनेता चिन्मय उदगीरकर यांचा समावेश

नाशिक| समाजासाठी विविध क्षेत्रात अविरतपणे झटणाऱ्या मान्यवरांची “सुविचार गौरव” पुरस्कारासाठी नावे जाहीर करण्यात आली असून यात अभिनेत्री पुजा सावंत व अभिनेता चिन्मय उदगीरकर यांचा समावेश आहे.  विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तिंचे कार्य समाजापुढे आणून त्यांचा गौरव करण्यासाठी ‘सुविचार मंच’ या सामाजिक संस्थेच्या वतीने प्रस्तावही मागविण्यात आले होते. सुविचार गौरव पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलेल्या पुरस्कारार्थींची नावे संस्थेच्या वतीने आज जाहीर करण्यात आली. यामध्ये कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल चित्रपट अभिनेत्री पुजा सावंत यांची निवड करण्यात आली आहे. तर अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल अभिनेते चिन्मय उदगीरकर यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हेमंत राठी यांना “जीवन गौरव” पुरस्काराने तसेच कोरोना काळातील रुग्ण सेवेसाठी डॉ.अतुल वडगांवकर (वैद्यकीय), निवृत्त प्राचार्य मधुकर कडलग (शैक्षणिक), जेष्ठ साहित्यिक प्रा.शं.क.कापडणीस (साहित्य), नितीन महाजन (प्रशासन), महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातील खेळाडु ईश्वरी सावकार (क्रीडा), किशोर खैरनार (कृषी) यांना सुविचार...

राष्ट्रवादी युवक शहराध्यक्षाने स्वखर्चाने बसविले सी.सी.टीव्ही कॅमेरे

नाशिक| राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी पंचवटी गणेशवाडी परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सी.सी.टीव्ही कॅमेरे व डीव्हीआर बसविले. सोनसाखळी चोरी, दुचाकी चोरी, खून, हाणामारी यासारखे गुन्हे घडल्यावर तातडीने गुन्हेगारांना पकडण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमरे असणे अत्यंत महत्वाचे बनले आहे. गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमऱ्याच्या फुटेजची मदत पोलिसांना होत असते. तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमरे असल्यास गुन्हेगार ही गुन्हा करण्यास घाबरत असतो.  गुन्हेगारांवर वचक ठेवून पोलिसाच्या मदतीकरिता व स्थानिक नागरिकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेले सी.सी.टीव्ही कॅमेरे व डीव्हीआर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी स्वखर्चाने बसविले. उपक्रमाचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले आहे. यावेळी रमेश गिते,  कैलास शिरसाठ, नारायण बेंडकुळे, अशोक अभंग, शरद अभंग, अजय सोनवणे,  गोविंद गरकळ, मयुर बेंडकुळे, विकास गिते, दशरथ मोकळ, किरण शेवरे, विकी आनंदराव, संदीप पगार, मोहन वायकांडे यांच्यासह परिसरातील नागरिक मो...

रेशनिंग संघटनेचे जिल्हा पुरवठा अधिकऱ्याना विविध मागण्यांचे निवेदन

नाशिक| नाशिक जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने रेशनिंग दुकानदारांच्या विविध अडीअडचणी संदर्भात सोमवारी जिल्हा पुरवठा आधिकारी डॉ अरविंद नरसिकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा संघटनेचे प्रमुख गणपतराव डोळसे पाटील, निवृत्ती महाराज कापसे, दिलीप नवले, सुरगाणा तालुका अध्यक्ष येवाजी भोये, सुरगाणा संघटक भास्कर चौधरी, इगतपुरी तालुका उपाध्यक्ष अरुण बागडे आदी उपस्थित होते. जिल्हा पुरवठा विभागाला दिलेल्या निवेदनात रेशनिंग संघटनेने केलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. प्रधानमंत्री कल्याण योजनेचे नोव्हेंबर, डिसेंबरचे धान्य इतर उर्वरित तालुक्यांना लवकर प्राप्त करून द्यावे, शासकीय यंत्रणेकडून धान्य दुकानदारांच्या ई-पॉस मशीनवर लवकर अपलोड करावे, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे परवाना नूतनीकरण प्रस्ताव आपल्याकडे प्राप्त झाले आहे ते पडताळणी करून तत्काळ मंजूर करून नूतनीकरण करावे, वारस नोंदी लवकरात लवकर करावी, कोरोना काळात मृत्यू झालेल्या दुकानदारांच्या वारसांना आर्थिक मदत द्यावी, तसेच जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 दरम्यानच्या पीएमपीकेएवाय योजनेचे पैसे रास्त दुकानदारांच्या खात्यावर जमा करावे अशा ...

महात्मा फुले समता परिषदेचा “नो रिजर्व्हेशन, नो इलेक्शन” नारा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक| ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिकासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्यात येऊ नये अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने करण्यात आलेली आहे. याबाबत आज राज्यभरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने “नो रिजर्व्हेशन, नो इलेक्शन” आंदोलन करण्यात आले. नाशिक जिल्ह्यात देखील सर्व तालुक्यात सबंधित यंत्रणेला तालुकावार निवेदन सादर करण्यात आले असून नाशिक येथे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुणे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, दिलीप तुपे, प्रा.ज्ञानेश्वर दराडे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मा.सर्वोच्च न्यायालयाने स्थ...

रिपब्लिक डे परेडसाठी आरोग्य विद्यापीठाच्या एनएसएसमधील दोन विद्यार्थ्यांची निवड

नाशिक| प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या पथसंचलनाकरीता आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककातील दोन स्वंयसेवकांची निवड झाली आहे. विद्यापीठाचे इगतपुरी येथील एस.एम.बी.टी. आयुर्वेद महाविद्यालयाचा पिल्लई फ्रॅन्को प्रिन्स व नाशिक येथील मोतिवाला होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयाची कु. सना शेख विद्यार्थ्यांची राजपथ नवी दिल्ली येथे होणाऱ्या पथसंचलनाकरीता निवड झाली आहे.  केंद्र सरकारच्या युवा व खेल मंत्रालय आणि राज्य शासन यांनी आदेशित केल्याप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक 26 जानेवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पथसंचलन पथकात सहभागी होतात.   या अनुषंगाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे दि. 12 ते 21 ऑक्टोबर 2021 कालावधीत पूर्व प्रजासत्ताक पथसंचलन शिबीर घेण्यात आले. या शिबीरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहभागी स्वयंमसेवकातून उत्कृष्ट संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण करणाÚया राज्यातील आठ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. यामध्ये चार विद्यार्थी व चार विद्यार्थींनींचा समावेश असतो. विद्यापीठाच्या...

बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा रायुकाँतर्फे कर्नाटक सरकारचा निषेध

नाशिक| बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ कर्नाटक सरकारचा  नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शिवस्मारकाला दुग्धाभिषेक करून जाहीर निषेध करण्यात आला. शिवछत्रपती हे महाराष्ट्रासाठी दैवत आहे, त्यांचे नाव आदराने घेतले जाते. परंतु त्यांच्या अस्मितेला धक्का लागेल असे कृत्य देशात कुठे घडल्यास आम्ही ते कदापी सहन करणार नाही. प्राताध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीटद्वारे केलेल्या आवाहनानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आ पापल्या भागातील छत्रपतींच्या पुतळ्यांचा दुग्धाभिषेक करून कर्नाटकातील घटनेचा निषेध नोंदविला.   त्यात चांदवड येथे तालुका युवक अध्यक्ष दत्ता वाघचौरे तसेच नाशिक तालुका अध्यक्ष  गणेश गायधनी यांनी कार्यकर्त्यांसह घोषणा देत दुग्धाभिषेक केला. अशी माहीती राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी दिली.

टीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही: शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

मुंबई| टीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जर कोणी खेळ करत असेल तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही. जो कुणी दोषी आढळेल त्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असे शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले. टीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणाबाबतच्या कायदेशीर कार्यवाहीसंदर्भात शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकरणाचा आढावा घेतला. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून या समितीद्वारे संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर केला जाईल. या अनुषंगाने कायदेशीर प्रक्रियेत शालेय शिक्षण विभागाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे प्रा.गायकवाड यांनी म्हटले आहे.

गोदावरी उत्सवाला वारसाफेरीने सुरूवात

नाशिक| स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी नासिक, राज्य पुरातत्त्व विभाग व नासिक इतिहास संशोधन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गोदावरी उत्सव १५ ते २१ डिसेंबरदरम्यान साजरा केला जात आहे. या उत्सवाची सुरूवात बुधवारी सकाळी गोदाकाठावर देवमामलेदार महाराज मंदिरासमोरून वारसा फेरीच्या माध्यमातून झाली. यावेळी पूजा निलेश यांचा सुलेखन प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम झाला. तर चित्रकार रमेश जाधव यांनी गोदावरी व नदी संदर्भातील चित्रांचे सादरीकरण केले होते. याला नाशिककरांनी उत्तम प्रतिसाद दिला.  गोदावरी उत्सव व वारसाफेरीचे उद्घाटन जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सौ. मयुरा मांढरे,  पोलिस आयुक्त दिपक पांडे, पुरातत्त्व विभागाच्या उपसंचालिका आरती आळे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, नासिक इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष योगेश कासारपाटील, आनंद बोरा, डॉ. अजय कापडणीस, महेश शिरसाट उपस्थित होते. पंचवटी वरिष्ठ पोलिस निरिक्षक डॉ. सीताराम कोल्हे, सरकारवाडा पोलिस निरिक्षक राजन सोनवणे यावेळी उपस्थित होते.  सकाळी साडेसात वाजता सुलेखनकार पुजा निलेश यांनी नदी सूक्त हा विषय घेत....

राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये रॅपिड आरटीपीसीआर चाचणीसाठी 1975 रुपये दर निश्चित: टोपे

मुंबई| कोविड विषाणूच्या संसर्गाची चाचणी करण्यासाठी राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात  येणाऱ्या रॅपिड आरटीपीसीआर चाचणीसाठी 1975 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. मंत्री श्री.टोपे यांनी सांगितले की, पारंपरिक आरटीपीसीआर चाचणी पेक्षा रॅपिड आरटीपीसीआर चाचणीचे निदान लवकर म्हणजे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात मिळतो. यामुळे या चाचण्या विमानतळ, तातडीचा रेल्वे प्रवास किंवा इतर वैद्यकीय आपत्ती दरम्यान करण्यात येतो. मात्र रॅपिड आरटीपीसीआर चाचणीचे शुल्क जास्त असते. मात्र आता तपासणीसाठी आवश्यक रिएजंटस, व्हिटीएम किट्स, पीपीई किट आणि अरेंज एक्स्ट्रैक्शन किट्स माफक दरात उपलब्ध झाले आहेत. त्याचबरोबर प्रयोगशाळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या बाबी लक्षात घेऊन दर निश्चित करण्यासाठी नियुक्त समितीने अहवाल सादर केला. त्यानुसार राज्यातील कोणत्याही ठिकाणी कार्यरत असणाऱ्या प्रयोगशाळेत रॅपिड आरटीपीसीआर चाचणीसाठी १९७५ रूपये दर निश्चित करण्यात आला आहे. Abbot ID/ Thermo fisher Accula...

टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा: गणेशगांव प्रिमिअर लीगमध्ये चांदशी संघ विजयी

प्रतिनिधी । नाशिक कोरोनाचे संकट कमी होत असल्याने गत वर्षभरापासून रखडून असलेली गणेशगांव प्रिमिअर लीग ही भव्य टेनिसबॅल क्रिकेट स्पर्धा अखेर डिसेंबर महिन्यात उत्साहात पार पडली. चांदशी संघाने न्यू-स्टार हरसूल संघाला पराभूत करत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घातली. तब्बल १० दिवस रंगलेल्या या क्रिकेट स्पर्धेत  महिरावणी-गणेशगाव पंचक्रोशीतील ७४ संघांनी सहभाग नोंदविला होता.  ५ डिसेंबर रोजी स्पर्धेला सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणावर संघांनी सहभाग नोंदविल्याने लॉट पध्दतीने सामने खेळविण्यात  आले. स्पर्धेत तब्बल ८ बक्षीसे ठेवण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या आठ संघांना मंगळवारी अंतिम सामना पार पडताच  आयोजक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघ यांच्या उपस्थिती विविध मान्यवरांचे हस्ते रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  गंगा गोदावरी संघ गणेशगाव,  किसन लिलके, मनोज पालखेडे, प्रशांत लिलके, एकनाथ नामिडे  यांनी स्पर्धा आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळ...

सामाजिक कार्यकर्त्या कलावती साळवे यांचे निधन; दि. १९ डिसेंबरला जलदान विधी

नाशिक| प्रतिनिधी| आंबेडकरी चळवळीत सक्रिय सहभाग असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती कलावती मुरलीधर साळवे (वय६५) यांचे सोमवारी पहाटे ५:३० वा. अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगी, दोन मुले सूना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर अमरधाम येथे दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक मनोज संसारे यांच्या त्या मावशी व ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते भास्कर बर्वे यांच्या भगिनी होत. आंबेडकरी चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. स्वाभिमानी रिपब्लीकन पक्षाच्या महाराष्ट्र् महिला आघाडीच्या त्या २० वर्षे प्रमुख  होत्या. सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांनी शिवणकाम, नक्षीकाम, बालवाडी कोर्स आदीच्या माध्यमातून अनेक मुलींना स्वावलंबनाचा मार्ग दाखवून सर्वोतोपरी मदत केली. तसेच महिला बचतगट व विविध व्यवसायाला प्रोत्साहन देऊन त्यांनी महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला.  अत्यंत मनमिळावू स्वभावामुळे त्याच्या अंतिम यात्रेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. ...

वसतिगृह प्रवेश, परदेश शिष्यवृत्ती प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीने राबविणार: धनंजय मुंडे

मुंबई| भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना, राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती, सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील प्रवेश पूर्णपणे संगणकीकृत करून ऑनलाईन पद्धतीने राबविण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. मंत्रालयात संगणकीकृत ऑनलाईन प्रणालीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस अपर मुख्य सचिव श्रीमती जयश्री मुखर्जी, बार्टीचे महासंचालक डॉ.धम्मज्योति गजभिये, समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, सहसचिव दिनेश डिंगळे आदी बैठकीस उपस्थित होते. यापुढे विद्यार्थी व निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या लोकप्रतिनिधींना पासपोर्टच्या धर्तीवर जात प्रमाणपत्र पडताळणी करून मिळावी यासाठी ही प्रक्रिया सुद्धा पूर्णपणे ऑनलाईन केली जावी, यात असलेल्या सर्व त्रुटी दूर करून पासपोर्टच्या धर्तीवर सुटसुटीत व अद्ययावत प्रणाली तातडीने विकसित करून कार्यान्वित केली जावी असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये 42 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात, ...

१५ ते २१ डिसेंबर दरम्यान 'नदी महोत्सवा'चे आयोजन

नाशिक|जिल्हाधिकारी कार्यालय नासिक, राज्य पुरातत्त्व विभाग व नासिक इतिहास संशोधन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नासिक सराफ बाजार येथील सरकारवाडा येथील दरबार हॉलमध्ये १५ ते २१ डिसेंबरदरम्यान नदी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात वारसा फेरी व व्याख्याने होणार आहेत.  महोत्सवातील कार्यक्रमांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे;  बुधवार, १५ डिसेंबर २०२१, सकाळी : ७.३० वाजता.  गोदेची वारसा फेरी :  संयोजन व मार्गदर्शन : श्री. देवांग जानी व रमेश पडवळ प्रमुख उपस्थिती : श्री. सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नासिक  ठिकाण : देवमामलेदार महाराज मंदिर, रामकुंडासमोर, गोदाघाट गुरुवार, १६ डिसेंबर २०२१, सायं : ५.३० ते ७.०० व्याख्यान: नदी संस्कृती : डॉ. प्राजक्ता बस्ते, नदीच्या अभ्यासक व तज्ज्ञ ठिकाण : दरबार हॉल, सरकारवाडा, सराफ बाजार, नासिक शुक्रवार, १७ डिसेंबर २०२१, सायं : ५.३० ते ७.०० व्याख्यान : गोदाघाटावरचे नाशिक : डॉ. कैलास कमोद. ठिकाण : दरबार हॉल, सरकारवाडा, सराफ बाजार, नासिक शनिवार, १८ डिसेंबर २०२१ सकाळी : ७.०० वाजता : गोदाकाठचे पक्षी जीवन :  संयोजन व मार्गदर्शन : प्रा. आनंद बोरा ठिक...

..अखेर ड्रग इन्स्पेक्टर पद भरतीत अनुभवाची अट शिथील; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रयत्नांना यश

मुंबई| राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने शासनाकडे केलेल्या मागणीला अखेर यश मिळाले असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ड्रग इन्स्पेक्टर पदाच्या जाहिरातीत वयाची अट ३वर्ष शिथील केली आहे.  प्रकाशित केलेल्या दिवसापासून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस औषध निर्माण शास्त्र विभागाने प्रदेशाध्यक सुनिलदादा गव्हाणे यांच्या नेतृत्वात मोहीम सुरु केली होती. या अनुषंगाने जाहिरातीत दिलेल्या ३ वर्ष अनुभवाची अट शिथिल करणे संदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल पाटील आणि सर्व विभागीय उपाध्यक्ष यांनी महाराष्ट्र स्तरावर हा मुद्दा उचलून धरला होता. ही अट शिथिल करावी यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री मा. राजेंद्र शिंगणे, सामान्य प्रशासन विभाग मंत्री मा. दत्तात्रय मामा भरणे यांचेकडे निवेदनामार्फत साकडे घातले होते. राज्यातील औषध निर्माण शास्त्र विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन, ऑफलाईन मिटिंग सुद्धा घेण्यात आल्या. या सर्व प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून आयोगाने ही जाहिरात सद्य स्थितीत स्थगित करण्या चे अधिकृत पत्र काढले आहे. या अभूतपूर्व कामगिरीबद्दल सम्पूर्ण राज्यातून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्र...

'सराफ बाजार' नाशिकचा अलंकर

नासिक हे हजारो वर्षांची पौराणिक आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेले नगर आहे. सुमारे २५ लाख लोकसंख्या असलेले हे शहर प्रगतीत महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकावर आहे तर देशातील सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या शहरांमध्येही अव्वल स्थानावर आहे. नासिकच्या व्यापार उद्योगाचा इतिहासही प्राचीन आहे. अन्य व्यवसायांबरोबरच सोने-चांदी व रत्ने यांचाही व्यवसाय येथे शतकानुशतके चालू असून पेशवाईत  नासिकला उपराजधानीचा दर्जा मिळाल्याने इ.स.१७२५ नंतर नासिकची भरभराट झाली. याच काळात सराफी व्यवसायही जोमाने वाढला. परंपरागत सोने दागिण्याबरोबर चांदीच्या भांडीमाल व इतर वस्तुंचे उत्पादनही येथे होऊ लागले. हळूहळू नासिक हे शुद्ध चांदीची बाजारपेठे म्हणून देशभर प्रख्यात झाले आणि नावारूपाला आले. आजमितीला नासिक महानगरपालिका क्षेत्रात लहान मोठी हजाराच्यावर सराफी दुकाने आहेत. सराफ व सुवर्णकारांचे उत्तम सहचर्य हे नासिकच्या सराफ बाजाराचे वैशिष्ट्य आहे. नासिकमधील सर्व स्थानिक सराफ सुवर्णकार व्यावसायिकांचे केंद्र म्हणजे नासिकचा जुना सराफ बाजार होय. बदलत्या युगातही भविष्यकाळातील बदलत्या गरजा ओळखून सुवर्ण व्यावसायिक भावी आव्हानांना तोंड देण्य...

परिवहन मंत्री म्हणाले, सोमवारपर्यंत कर्तव्यावर हजार झाल्यास निलंबन रद्द करू

औरंगाबाद|  विलिनीकरणाच्या  मागणीसाठी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सेवेत रूजू व्हावे. रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पूर्वलक्षीप्रभावाने कोणतीही कारवाई केली जाणार नाही.‍ तथापि, संपकाळात ज्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे, असे आवाहन करीत कर्मचारी सोमवारपर्यंत कर्तव्यावर हजर झाल्यास त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्यात येईल, असे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी निलंबित कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. एसटी महामंडळचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. गेल्या एक महिन्यांहून अधिक काळ संप सुरु आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष, ॲड. अनिल परब यांनी  राज्यभरातील आगारातील गाड्यांचा तसेच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेतला. परिवहन मंत्री ॲड. परब म्हणाले, दि. २० डिसेंबर रोजी उच्च न्यायालयात संपाबाबत सुनावणी होणार आहे. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने नेमलेली समिती प्राथमिक अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. विलिनीकरणास...

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रांमध्ये इन्क्युबेशन सेंटरची निर्मिती करा: सुभाष देसाई

औरंगाबाद|प्रशिक्षणार्थींना नवनवीन कल्पना घेऊन उद्योग विकसित करावयाचा असतो. उद्योग, व्यवसायासाठी त्यांना मार्गदर्शन आवश्यक असते. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रांमध्ये अशा प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित करण्यात येते. त्यांचे प्रशिक्षण पार पडल्यानंतर प्रशिक्षणार्थींसमोर काही अडचणी असतात. त्या सोडविण्याचे व उद्योग उभारण्याचे मार्गदर्शन इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून होण्यास मदत होते.  त्यामुळे प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणीच जिल्हानिहाय इन्क्युबेशन सेंटरची निर्मिती करावी, अशा सूचना उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी उद्योग विभागाला केल्या.    महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या उद्योजक निवास येथे बांधण्यात आलेल्या विस्तारीत वस्तीगृह आणि डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन मंत्री देसाई यांच्याहस्ते झाले. त्यानंतर मंत्री देसाई यांनी इमारतीची पाहणी केली. कार्यक्रमास खासदार इम्तियाज जलील, सर्वश्री आमदार अंबादास दानवे, प्रदीप आमदार जैस्वाल,  अतुल सावे,  उद्योग विभागाचे विकास आयुक्त तथा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ.हर्ष...

ओबीसी आरक्षण: सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र शासनाची बाजू मांडू : मंत्री भुजबळ

नवी दिल्ली| राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होणाऱ्‍या निवडणुका ओबीसी प्रवर्ग सोडून होऊ नयेत यासाठी राज्य शासनाच्यावतीने इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात येणार असल्याची, माहिती  राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली. आज कस्तुरबा गांधीमार्ग स्थित महाराष्ट्र सदन येथे श्री. भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. श्री. भुजबळ यांनी सांगितले, ओबीसी प्रवर्गाला सोडून निवडणूक न व्हावी, यासाठी राज्य शासनाच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी 13 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात न्यामुर्ती ए.एम. खानविलकर यांच्या खंड पिठापुढे बाजु मांडणार आहेत. ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने 4 मार्च 2021 ला निर्णय दिला होता. मात्र, तरीही देशातील इतर राज्यांमध्ये झालेल्या न‍िवडणुकीमध्ये संबंधित राज्यांनी ओबीसी प्रवर्गाला आरक्षण दिले होते. महाराष्ट्र राज्यानेही अध्यादेश काढून अन्य प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता ओबीसींना 27 टक्के आरक्षण दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक संस्थांच्या ओबीसी प्रवर्गातील उमेदवारा...

सीडीएस प्रमुख बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन

मुंबई| भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांचे आज एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले.   या अपघातात त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचेसह एकूण १३ लष्करी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे या निधन झाले. भारताचे पहिले सीडीएस (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) बनण्याचा मान ही त्यांना मिळाला. या काळात सैन्याच्या आधुनिकरणावर त्यांचा विशेष भर होता.  ते आपल्यात नाहीत हे मनाला पटतच नाही. या अतिशय दुर्दैवी दुर्घटनेची माहिती कळल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे. ते यातून वाचतील असे सारखे वाटत होते पण शेवटी ती दुर्दैवी बातमी आलीच. अनेक आघाड्यांवर शौर्याने आणि धडाडीने नेतृत्व करणाऱ्या संरक्षण दलाच्या प्रमुखांचा त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत असा मृत्यू होणं नियतीलाही मान्य असणार नाही. मी जनरल रावत आणि त्यांची पत्नी तसेच अन्य लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूमुळं खूप व्यथित झालो आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करून, त्यांच्या कुटुंबियांप्रतिही मुख्यमंत्र्यांनी सहवेदना प्रकट केली आहे. ही दुर्घटना अत्यंत विषण्ण करणारी, दुर्दैवी असल्...