Skip to main content

Posts

Showing posts from June, 2020

नाशकात पुन्हा लॉकडाऊन; सायंकाळी सात ते पहाटे पाच कडक निर्बंध

नाशिक|शहरातील वाढती करोनाबाधित रूग्णांची संख्या लक्षात घेता उद्यापासून सायंकाळी ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घोषित केले. नाशिक शहरातील वाढती रुग्ण संख्या व विशेषत: तरुणांचे वाढते मृत्यू या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर ते बोलत होते. कोरोनाचा संसर्ग नाशिक शहरात वाढू लागल्यानंतर सुरूवातीच्या काळात प्रमाण ठराविक ठिकाणी होते तसेच वयस्कर वयोगटांमध्ये होते. परंतु आता या संसर्गाचा फैलाव सर्वदूर होत चाललेला असल्याने व मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण वाढत चाललेले असल्याने अनावश्यक फिरणाऱ्या व्यक्तींवर निर्बंध आणणे गरजेचे झाले आहे अशी बाब, या संदर्भातील सर्व सांखिकी माहिती घेतल्यानंतर समोर आली असे ना. भुजबळ यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात झालेल्या व्यापारी संघटनेच्या बैठकीत देखील व्यवसायिकांनी स्वयंस्फूर्तीने सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत दुकाने उघडी ठेवण्यात येतील व इतर वेळी बंद ठेवण्यात येतील असा पर्याय मांडला होता व त्याचे स्वागत श्री. भुजबळ यां...

डिझेलची दरवाढ ट्रान्सपोर्ट व्यवसायाच्या मूळावर; दरवाढ मागे घ्या अन्यथा आंदोलन: ट्रान्सपोर्ट असोसिएशन

नाशिक|प्रतिनिधी| डिझेलच्या दरात दिवसेंदिवस होत असलेली वाढ अत्यंत चिंताजनक असून अगोदरच अडचणीत सापडलेला ट्रान्सपोर्ट व्यवसाय अधिक अडचणीत सापडला असून डीझेलची दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड व नाशिक गुडस ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष पी.एम.सैनी यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.  फोटो:फाईल तसेच येत्या १ जुलै २०२० डीझलदर वाढीचा निषेध म्हणून एक दिवसीय निषेध म्हणून काळया पट्या बांधून काम करणार येईल जर काही निर्णय होत नसेल आणि भाव वाढ माघे घेतली नाही तर प्रसंगी आंदोलन करू असा इशारा दिला आहे. नाशिक  ट्रान्सपोर्ट व गुडस् ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, देशात आणि राज्यात कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतांना उद्योग, व्यवसाय व सामान्य नागरिकांचे अर्थचक्र  पूर्णपणे कोलमडले आहे. आशा परिस्थितीत गेल्या वीस दिवसाहुन अधिक काळापासून डिझेलच्या दरात सातत्याने दरवाढ होत असून डिझेल दरवाढीने ऐतिहासिक उंची गाठली आहे. याचा सर्वात मोठा परिमाण म्...

कोरोनाची लढाई अद्याप संपलेली नाही; पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सजग रहावे: छगन भुजबळ

नाशिक|प्रतिनिधी|कोरोनाची लढाई अद्याप संपलेली नसून या लढाईशी सामना करतांना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सजग राहून नागरिकांची मदत करावी अशा सूचना देत राष्ट्रवादी अभिप्राय अभियान' मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले. नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि सर्व सेलच्या प्रमुखांची व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अॅड. रवींद्र पगार उपस्थित होते.यावेळी ना.छगन भुजबळ म्हणाले की, कार्यकर्त्यांना नियमित भेटावं अशी इच्छा कायमच असते मात्र सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आज व्हिडिओ द्वारे आपण सर्व जण भेटत आहोत. कोरोनाची ही अत्यंत कठीण अशी लढाई आपण लढत आहोत कारण या आजारावर अजून कुठलाही ठोस इलाज किंवा उपाय सापडलेला नाही अशा गंभीर संकटाचा सामना करत असताना आपली भेट दुरावली असल्याचे त्यांनी म्हटले. ते म्हणाले की, क...

खा. सुप्रिया सुळे यांचा एक फोन अन् रशियात अडकलेले नाशिकचे ५ विद्यार्थी सुखरूप परतले!

नाशिक|प्रतिनिधी| रशियात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन झाल्याने  वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले नाशिकचे पाच विद्यार्थी अडकून पडले होते, त्यांना भारतात येण्यासाठी तिकीट उपलब्ध होत नसल्याने ते चिंतीत होते. राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांना नाशिकचे रोहित अहिरे यांनी विद्यार्थ्यांची आपबिती  सांगितली, त्यांनी भारतीय दूतावास आणि परराष्ट्रमंत्र्यांशी लगेच संपर्क साधला आणि त्यांच्या शिष्टाईमुळे अडकलेले विद्यार्थी सुखरुप मायदेशी परतले. नाशिकचे विद्यार्थी सुखरुप मायदेशी भारतातून वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी रशियात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जातात. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. नाशिकचे देखील पाच विद्यार्थी रशियातील ओश स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत आहेत. अथर्व अनिल ततार (सटाणा ता. बागलाण), किर्ती चंद्रकांत रेनगाडे (उपेंद्रनगर, नाशिक),  उन्नती योगेश माधरेले (जुने नाशिक), श्रेयश रसाळ आणि विश्वनाथ सपनार अशी विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे विद्यार्थी लाॅकडाऊनमुळे रशियात अडकले होते, भारतात येण्यासाठी वंदे भारत मिशन अंतर्गत जी विमानसेव...

!! 🌹 "वादळ वारा" 🌹 !!

फोटो: जी.पी. खैरनार तळपत असता सूर्य निखारा ! काळे ढग देती नभात पहारा !! आवाज होता कडकडणारा ! विजांचा आवाज नभात सारा !! अंगणात पडती टपोऱ्या गारा ! मोर नाचती फुलवुन पिसारा !! गड गड पाऊस कोसळणारा ! वरुण देव देती आकाशी नारा !! धडाम कोसळे विज निखारा ! भयभीत करीती चरा चरा !! अंगणात पडती टपोऱ्या गारा ! मोर नाचती फुलवुन पिसारा !! छतावर पडती तड तड गारा ! जसा वाजती ढोल नगारा !! जोरात वाहती वादळ वारा ! धरती पडती पाऊस धारा !! अंगणात पडती टपोऱ्या गारा ! मोर नाचती फुलवुन पिसारा !! खळ खळ वाजे नदी किनारा ! हसत खेळत वाहे जलधारा !! जिवंत होती नदी पाणी झरा ! नदी नाले वाहत जाई सागरा !! अंगणात पडती टपोऱ्या गारा ! मोर नाचती फुलवुन पिसारा !! बहुरंगी डोलती फुल नजारा ! वृक्ष वेली करी आनंद साजरा !! स्वच्छंद डोले फुलांचा फुलोरा ! सुवासिक जाई जुई मोगरा !! अंगणात पडती टपोऱ्या गारा ! मोर नाचती फुलवुन पिसारा !! सुगंध दरवळे आसमंतात सारा ! प्रसन्न दिसे मानव हसता चेहरा !! उरी पांघरी हिरवा शालू धरा ! मोरपंखी वस्राशी नटे वसुंधरा !! अंगण...

कोविड-19: अर्थचक्र बळकटीचा ध्यास

20 मार्चचा दिवस सराफ बाजार बंद! व्यवसाय पूर्णपणे ठप्प, ऐन लग्नसराईचा काळ आणि 100 कोटी उलाढाल असणारी बाजारपेठ पूर्ण पणे बंद, पण सोने भाववाढ सुरूच होती. दि. 22 मे रोजी अचानक बातमी आली, ग्रीन झोनमधील दुकानं उघडणार नाही, कारागिरांनी ही घरी जाणाचा निश्चय केलेला, एक एक दिवस सरत होता, परिस्थिती बिकट होती तरी काही दिवस ते थांबले अपेक्षा हीच की नाही आता सर्व सुरळीत होईल जून महिन्यात काही लग्नतिथी आहे. त्यामुळे काम सुरू होणार अशी खात्री सर्वानाच होती, आणि झालं ही तसेच, जसं लॉकडाऊन उघडलं तसे काम सुरू झाले, या लॉकडाऊनमुळे झालेलं नुकसान आता  अतिरिक्त काम करुन भरुन काढू असा विचार होता. त्यासाठी सर्व विश्वासाने जोमानं कामाला लागले, पण बाजारपेठेत बिनकामाची गर्दीच अधिक होती, ही गर्दी काही कमी होत नव्हती, छोट्या छोट्या गोष्टीसाठी बाजारपेठेत येणाऱ्यांचे प्रमाण चिंता वाढवणारे आहे. जागतिक स्तरावरील अस्थिर परिस्थितीमुळे आधीच बाजाराची स्थिती नाजूक आहे. असे असले तरी यावर्षी पर्यटनासाठी आणि लग्नासाठी खर्च न केलेला पैसा  यात निश्चितच फायदेशीर गुंतवणूक होईल असा विश्वास होता, त्यात हळूहळू सुध...

बंदी असतांना चक्क हॉटेल सुरू; पर्यटकांची ही रेलचेल..! मग अचानक पडतो पोलिसांचा छापा

शैलेश पुरोहित इगतपुरी| राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हॉटेल उघडण्यावर शासनाची बंदी असून ही बंदी झुंगारुन इगतपुरीतील रेन फॉरेस्ट हॉटेल सर्रासपणे उघडे ठेवल्याने पोलिसांनी आज छापा टाकत हॉटेलला कुलूप ठोकले. याप्रकरणी इगतपुरी पोलिसांनी भा.द.वि कलम १८८  नुसार गुन्हा दाखल केला आहे. संपूर्ण देशात व राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता केंद्र आणि राज्य शासनाने हॉटेल उघडण्यावर बंदी घातली होती, असे असतांना शासकीय आदेशाची पायमल्ली करुन इगतपुरी येथील रेन फॉरेस्टच्या हॉटेल प्रशासनाने आपले हॉटेल हे सर्रासपणे सुरू ठेवले आहे,  इगतपुरी पोलिसाना हॉटेल सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यामाहितीच्या आधारे इगतपुरी पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला असता येथे बरेच पर्यटक वास्तव्यास असल्याचे आढळले. पोलिसांनी येथे आलेल्या वाहनाची कडक तपासणी करुन वाहनांवर दंडात्मक कार्यवाही केली तसेच या हॉटेलवर कलम १८८ नुसार कारवाई केली.

शहीद जवान सचिन मोरे अमर रहे..!

नाशिक| प्रतिनिधी| भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात कर्तव्य बजावत असतांना नाशिकच्या मालेगाव साकुरी येथील सचिन मोरे यांना वीरमरण प्राप्त झाले. शहीद सचिन मोरे यांच्या मूळगावी आज सैन्यदलातर्फे मानवंदना देत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यास आले. याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे, खा. भारती पवार, सुभाष भामरे आदींसह मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.  शाहिद सचिन मोरे यांना अखेरचा निरोप गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याकडून पुलाचे बांधकाम सुरू आहे, या ठिकाणी सचिन मोरे सेवा बजावत होते. याच दरम्यान या भागातील गलवान नदीचे चीनकडून रोखून धरलेले पाणी अचानक सोडण्यात आल्याने पाण्याची पातळी वाढली, त्यात दोन जवान वाहून जात होते. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सचिन मोरे यांनी प्रयत्न केला, त्यात त्यांना वीरमरण प्राप्त झाले. अंत्यदर्शनासाठी ठेवलेले पार्थिव त्यांच्या पार्थिवावर आज मुळगावी साकुरी झाप येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुण्यावरुन त्यांचे पार्थिव आज मूळगावी आणण्यात आले. याप्रसंगी रस्त्याचा दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली, वीरजवान सचिन मोरे अमर ...

!!🌹🌲"जिल्हा परिषद"🌲🌹!!

अध्यक्षाला म्हणती सारे नामदार ! जिल्हा परिषदेचे असे ते सरकार !! मिनी मंत्रालय योजनांचा कारभार ! जिल्हा परिषद राबवती जिल्हाभर !! जिल्हा परिषदेची ऐका विकास गाथा ! साऱ्या गावं शिवाच्या सोडवी व्यथा !! जिल्हा परिषदेचे प्रथम असे मानकरी ! अध्यक्ष असती नामदार पदाधिकारी !! भारतीय प्रशासन सेवेचे अधिकारी ! असती अधिकारी मुख्य कार्यकारी !! जिल्हा परिषदेची ऐका विकास गाथा ! साऱ्या गावं शिवाच्या सोडवी व्यथा !! जिल्हा परिषदेचे चालवण्या कारभार ! शासन प्रशासन मनोमन करी निर्धार !! ग्रामीण सेवा देण्याचा करती विचार ! शासन योजना पोहोचवती घरोघर !! जिल्हा परिषदेची ऐका विकास गाथा ! साऱ्या गावं शिवाच्या सोडवी व्यथा !! प्राचीन मंदिरांची पौराणिक कथा ! देव मंदिरांना लोक टेकवती माथा !! ग्रामीण जनतेच्या जपती जुन्या प्रथा ! बळ देती तीर्थक्षेत्र विकासाच्या रथा !! जिल्हा परिषदेची ऐका विकास गाथा ! साऱ्या गावं शिवाच्या सोडवी व्यथा !! ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण करी ! जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा खरी !! ग्रामीण पिडीत घटकांना मिळे उभारी ! ग्रामीण महिला उद्...

एसटीतील 27 हजार कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करा: एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी

मुंबई|एसटी महामंडळाच्या एकूण अर्थसंकल्पात सर्वात जास्त खर्च डिझेल व वेतनावर होत असून एकूण 1लाख 2000 कर्मचाऱ्यांपैकी जेष्ठ 27 हजार कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करावी तसेच कंत्राटी पद्धतीवरील 1600 कर्मचाऱ्यांच्या जागी एसटी मधील कायम कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी त्यामुळे खर्चात मोठी बचत होऊन उध्वरीत कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळेल, भविष्यात वेतनवाढ सुद्धा करता येईल अशा मागणीचे पत्र महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेने, परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ना.अनिल परब यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून दिले आहे.  लॉकडाऊन काळात एसटी महामंडळाचे दररोज 22 कोटी रुपये इतके उत्पन्न बुडत आहे. एसटी महामंडळ आर्थिक संकटात सापडल्याने कर्मचाऱ्यांना वेळेवर तसेच पूर्ण वेतन मिळत नाही.गेले तीन महिने वेतन उशिरा व कमी मिळत असल्याने व अगोदरच वेतन तुटपुंजे असल्याने कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण होऊन बसले आहे.भाड्याच्या घरात राहणाऱ्या तसेच शाळा कॉलेजमध्यें शिक्षणासाठी मूले असलेल्या कर्मचाऱ्यांना तर भयंकर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहें.त्यामुळे डीजल तसेच वे...

दादागिरी नको, अन्यथा पोलिस कारवाई: ना. भुजबळ यांचा इशारा

नाशिक| शहरातील काही भागात नेते मंडळी जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास भाग पाडत असल्याची तक्रार व्यापारी संघटनांनी बैठकीत केली आहे, त्यामुळे दुकाने जबरदस्तीने बंद करण्यास भाग पाडणाऱ्या व्यक्तींवर पोलीस प्रशासन कडक कारवाई करणार असल्याचे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले. तसेच ज्या व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडणाऱ्या व्यक्तींची तात्काळ तक्रार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केली. नाशिक मधील विविध व्यापारी संघटनांनी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, मनपा अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, मनपा उपायुक्त मनोज घोडे पाटील,  माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयंत जाधव, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, किराणा घाऊक व किरकोळ व्यापार संघटना अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांसह विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी जिल्ह्यातील विविध व्यापारी संघटनांच्या मागण्या यावेळी ...

कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

औरंगाबाद|औरंगाबाद जिल्ह्यातील  कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्वतोपरी उपाययोजना तत्काळ कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद प्रशासनास दिले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे श्री.ठाकरे यांनी औरंगाबाद येथील लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्याशी  संवाद साधला. यावेळी उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, सर्वश्री खासदार डॉ. भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाठ, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार अतुल सावे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची उपस्थिती होती. तसेच मुंबईहून मुख्य सचिव अजोय मेहता, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, डॉ. शशांक जोशी आदी उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.  औरंगाबादेत कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी प्रशासनाला आवश्यक असणाऱ्या सर्व त्या उपाययोजना करा, शासन खंबीरपणे प्रशासनाच्या पाठीशी आहे, असे श्री. ठाकरे यावेळी म्हणाले. पालकमंत्री श्री. देसाई यांनी औरंगाबादेत करण्या...

शेतकऱ्यांसाठी बिडकीन फूडपार्क उत्तम पर्याय

औरंगाबाद|बिडकीन येथे 500 एकर जागेवर फूड पार्क उभारण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 6 महिन्यापुर्वी केली. त्यानुसार ऑरिक सिटी प्रशासनाने फूड पार्कच्या कामाचा आराखडा तयार करून प्रत्यक्ष जागा विकसित करण्यास सुरूवात केली, ही समाधानकारक बाब असून शेतकऱ्यांसाठी हा फुड पार्क उत्तम पर्याय ठरेल, त्यादृष्टीने गतीमानतेने येथील कामे उत्कृष्टरित्या पूर्ण करावीत, अशा सूचना राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात बिडकीन येथील फूडपार्क कामाबाबत आढावा बैठक पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली, यावेळी त्यांनी संबंधितांना निर्देश दिले. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी उदय चौधरी, यांच्यासह व्हिडिओ कॉन्फरन्सींगव्दारे राज्याचे उद्योग सचिव वेणूगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगण, एमआयडीसीचे  सहमुख्य  कार्यकारी अधिकारी, तथा ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव, एमआयडीसीचे उपमुख्य  कार्यकारी अधिकारी तथा ऑरिकचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय काटकर तसेच इतर अधिकारी या...

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा दि. 30 जून रोजी पुरवणी दीक्षांत

नाशिक| महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून विविध विद्याशाखेतील सुमारे 11 हजार 500 विद्यार्थ्यांना मंगळवार, दि. 30 जून 2020 रोजी पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठाचा पुरवणी दीक्षांत विद्यार्थ्यांच्या अनुपस्थित साजरा करण्यात येतो. फोटो: फाईल विद्यापीठाचा पुरवणी दीक्षांतास मा. कुलपती तथा मा. राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी नुकतीच मान्यता प्रदान केली आहे. सन 2018 च्या हिवाळी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व दि. 29 जून 2020 पर्यंत इंटर्नशिप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी दीक्षांत मध्ये पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठ अधिनियमात निर्देशित केल्याप्रमाणे दरवर्षी दोन वेळेस पदवी प्रदानाचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक मान्यवरांच्या हस्ते जाहिरपणे पदवी प्रदान करण्यात येते तर पुरवणी दीक्षांत किंवा मिनी कॉन्व्होकेशन मध्ये विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत त्यांना पदवी प्रदान करण्यात येते. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या पुरवणी दीक्षांत उपक्रमात सन 2019 च्या हिवाळी सत्रात उत्तीर...

गलवान व्हॅली सीमेवर मालेगावच्या भूमिपुत्राला वीरमरण

मुंबई|मालेगाव| भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात कर्तव्य बजावत असतांना नाशिकच्या भूमिपुत्रास वीरमरण प्राप्त झाले. सचिन मोरे असे शहीद जवानाचे नाव असून तो मूळचा मालेगाव साकुरी झाप येथील आहे.  अगदी सामान्य परिस्थिती असलेलं त्याचं कुटुंब मालेगाव साकुरे येथे राहतं, वडील,आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा आणि दोन भाऊ असा परिवार आहे. सुरुवातीपासूनच त्याला देशसेवेची आवड होती,त्यामुळे सचिन याने देशसेवेचे व्रत अखेरपर्यंत जोपासले, त्याच्या देशाप्रती सेवाभावीवृत्तीचा घरच्यांसह गावकऱ्यांना ही मोठा अभिमान वाटे. गलवान खोऱ्यात पुलाचे काम सुरू आहे. यादरम्यान चीनने रोखून धरलेलं नदीचं पाणी अचानक सोडल्याने याठिकाणी  पाण्यात अडकून पडलेल्या सैनिकांच्या मदतीला तो पाण्यात उतरला होता. मात्र त्यात त्याला  वीरगती प्राप्त झाली, हे वृत गावी पसरताच गावावर शोककळा पसरली. देशसेवेचं कर्तव्य बजावणारा शहीद जवान सचिन विक्रम मोरे यांच्या हौतात्माबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. महाराष्ट्राच्या मालेगाव तालुक्यातील साकुरी येथील भारतीय लष्कराचे जवान सचिन विक्रम मोरे यांना भारत-चीनच्या...

आ. पडळकर माफी मांगा अन्यथा नाशिक जिल्ह्यात फिरू देणार नाही: पुरुषोत्तम कडलग

नाशिक|प्रतिनिधी| राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या पडळकरांविरूद्ध राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष वाढत असून जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी तीव्र शब्दात पडळकर यांचा निषेध करुन आदरणीय पवार साहेबांची माफी मागावी अन्यथा जिल्ह्यात फिरकू दिले जाणार नाही असा इशारा दिला आहे. पुरुषोत्तम कडलग, जिल्हाध्यक्ष रा.यु. कॉ. पवार साहेब महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, असं वक्तव्य करून आमदार पडळकर यांनी नवा वाद उपस्थित केला आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा रोष व्यक्त होत आहे. कडलग म्हणाले की, एकीकडे देशाचे पंतप्रधान यांच्यासह सर्वच राजकिय पक्ष एकत्र येऊन या महामारी विरुद्ध लढा देत आहे. अशा परिस्थितीत असे वक्तव्य करणे बालिशपणाचे लक्षण आहे. आम्ही पालकमंत्री ना. छगन भुजबळ, ना अजितदादा पवार, ना. जयंत पाटील साहेब यांच्या तालमीत तयार झालेलो कार्यकर्ते आहोत. आम्ही आमची संस्कृती जपतो मात्र वेळ पडली तर ठोशास ठोसा देणेही जाणतो, त्यामुळे आपली पातळी ओळखा आण...

आरोग्य विद्यापीठातर्फे १६ जुलैला अंतिम वर्षांच्या लेखी परीक्षा

नाशिक| महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या उन्हाळी सत्रातील अंतीम वर्ष अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा दि. 16 जुलै 2020 पासून घेण्यात येणार आहे. यासंदर्भात विद्यापीठाकडून तात्पुरत्या स्वरुपाचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे मात्र कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता त्या-त्या परिस्थितीनुसार व शासनाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार अंतिम निश्चित वेळापत्रक हे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.  फोटो: फाईल याबाबत परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, शासनाच्या धोरणास अनुसरुन व वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या आदेशास अधिन राहून विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून सूचीत करण्यात येत आहे. कोव्हीड-19 आजाराचा प्रादुर्भाव व टाळेबंदीच्या सध्याच्या परिस्थितीच्या अनुषंगाने परीक्षार्थींनी सध्याचे वास्तव्याचे ठिकाण सोडू नये तसेच अनावश्यक प्रवास टाळावा. ते पुढे म्हणाले की, सध्याच्या सोयीच्या वास्तव्याच्या ठिकाणीच शांतपणे परीक्षेची तयारी करावी. परीक्षा सदंर्भात परीक्षासंदर्भात आवश्यक सूचना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द...

!! 🌹🌳"माहेरची वाट"🌳🌹 !!

_*!! 🌹🌳"माहेरची वाट"🌳🌹 !!*_  **************************** फोटो:फाईल _काळ्या वावर मातीत !_                     _जंगल दाट झाडीत !!_   _दाट काट्या कुपटीत !_                   _जाऊया वाट काढीत !!_   _काटेरी राना वनात !_                     _माहेरी वाट शोधीत !!_   _माहेर असे खळ्यात !_                _आई बापाच्या मळ्यात !!_   _कोपी बांधली रानात !_                     _बाप राहतो कोपीत !!_   _झोप लागते सुखात !_                      _बाप राबतो शेतात !!_   _घाम गाळतो उन्हात !_                      _मुलं ठेवी सावलीत !!_   ...

ही तर पक्षासाठी आमदारकीच्या बदल्यातील बेताल निष्ठा:मा.खा. समीर भुजबळ यांची पडळकरांवर टीका

नाशिक|महाराष्ट्राच्या जडणघडणीत ५० वर्षे योगदान असलेल्या पवार साहेबांबद्दल गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य हा प्रसिद्धीच्या हव्यासापोटी निव्वळ बालिशपणा असून पक्षाने दिलेल्या आमदारकीच्या बदल्यात बेताल निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न आणि समाजासाठी आपण काहीतरी करतो आहे हे दाखवण्याची धडपड म्हणजे पडळकरांचे आजचे बालिश वक्तव्य असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली. फोटो: मा.खा. समीर भुजबळ खासदार शरदचंद्रजी पवार यांनी आजवर कुठल्याही जाती धर्मात तेढ निर्माण न करता बहुजन समाजाच्या बाजूने उभं राहतं न्याय मिळवून देण्यासाठी आपलं उभं आयुष्य वेचलं आहे. आपल्या आयुष्यातील ५० वर्ष देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जडणघडनीत दिलेले आहे. अशा महान व्यक्तीबद्दल स्वतःला कथित समाजाचे नेते म्हणून घेणाऱ्या पडळकर यांचे बेताल वक्तव्य अत्यंत निषेधार्थ आहे. निवडणूक लाढवतांना भाजपने धनगर आरक्षणाचे खोटे आश्वासन दिले.केंद्रात आणि राज्यात सत्ता असतांना देखील भाजपने धनगर आरक्षणासाठी पाच वर्षे खेळवत केवळ वेळकाढुपणा केला. सरकारचा कालावधी पूर्ण होण्याच्या वेळी धनगर समाजाला गाजर दा...

राष्ट्रवादीतर्फे पडळकर यांच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आक्रमक झाली असून जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पडळकर यांचा निषेध करुन जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार यांच्या नेतृत्वाखाली प्रतिमेस जोडेमारो आंदोलन झाले . राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतप्त भावना आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते नाना महाले, कोंडाजी मामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्यने सहभागी झाले होते. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, असं वक्तव्य करून आमदार पडळकर यांनी नवा वाद उपस्थित केला आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात मोठा रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला जोडे मारत घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. तसेच त्यांच...