नाशिक| आदिवासी दुर्गम भागात राहणारा गणेश सिंगा वळवी डोकारे याची तटरक्षक दलात निवड झाली असून साई कॉम्पिटिशन अकॅडमीचा तो विद्यार्थी आहे, त्याला संचालक प्रा. एन जी वसावे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येऊन सत्कार करण्यात आला. योग्य मार्गदर्शन आणि परिश्रमामुळे १०० टक्के यशाची खात्री असते असे यावेळी प्रा. वसावे यांनी सांगितले. या निवडीमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले छोट्या छोट्या आदिवासी गावातील विद्यार्थी ही स्पर्धा परीक्षांमध्ये मागे नाही. प्रतिकूल परिस्थिती असो किंवा साधन सामग्रीची कमतरता त्याचा त्यांच्या ध्येयावर कधीच परिणाम दिसला नाही, मेहनतीच्या जोरावर त्यांनी गाठलेले लक्ष सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे साई कॉम्पिटिशन अकॅडमी संचालक प्रा. एन जी वसावे यांनी सांगितलं.