नाशिक| सोशल मिडीयावर पोस्ट टाकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते खा. शरदचंद्र पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपाच्या तुषार भोसले यांच्या विरोधात जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली असून जिल्हयात त्याचे पडसाद उमटले आहे. भोसले विरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली आहे, असे रायुकाचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विषयी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी बुधवारी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या घरी गेले असता ते पळून गेले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग याच्या मार्गदर्शनाखाली सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली असुन वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर गुन्हा दाखल न केल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. ...