Skip to main content

Posts

Showing posts from October, 2020

ऑनलाइन सोने खरेदी-विक्रीद्वारे 10 कोटींची उलाढाल: सराफांसाठी ई-मार्केट ठरतंय फायदेशीर

नाशिक| प्रतिनिधी| सराफी व्यवसायिकांनी ई- मार्केटचा आधार घेत आपली ऑनलाइन सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली. ऑनलाइन द्वारे ग्राहकांकडून सुमारे १० कोटींची उलाढाल झाली आहे, अशी माहिती नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापूरकर यांनी दिली. खास करून खरेदीसाठी २५ ते ४५ वयोगटातील ग्राहकांचा विशेष प्रतिसाद दिसून आला.  फोटो: फाईल चोखंदळ ग्राहक नेहमी सोने खरेदीसाठी आपल्या पसंतीच्या सराफी पेढीत जातो. कारण ती वस्तू खात्रीशीर असणार याचा विश्वास असतो. मात्र महामारीच्या काळात ग्राहकांना प्रत्यक्ष सोने खरेदी टाळावी लागली. लग्नसोहळा आणि महत्वाच्या सणासुदीच्या काळात सोने खरेदीसाठी पडावे की नाही असा सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्न होता. याकाळात  ग्राहकांची सुरक्षा ही महत्वाची बाब होती.  कोरोना संकट काळात सराफ व्यवसायिकांच्या व्यवसायावर देखील आर्थिक संकट आले. ग्राहक बाजारातून गायब झाल्याने व्यवसायावर परिणाम झाला, त्यामुळे सराफी व्यवसायिकांसमोर झालेले आर्थिक नुकसान कसे भरून काढणार असा प्रश्न होताच. तशात सर्वत्र ई- कॉमर्स व्यवसायाने पाय पसरले होते, ग्राहक ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देत असल्याचे ...

खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’च्या टीमला दिल्या सदिच्छा

पुणे|प्रतिनिधी| लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांच्या आगामी बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ या  भव्य ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे निर्माते निर्माते संदीप मोहिते पाटील, धर्मेंद्र बोरा, सौजन्य निकम यांनी नुकतीच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. या प्रसंगी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची पूर्णाकृती मूर्ति उर्विता प्रॉडक्शन्सच्या वतीने भेट देण्यात आली. या भेटीबद्दल आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर खासदार उदयनराजे भोसले यांनी माहिती दिली असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित तयार होत असलेल्या "सरसेनापती हंबीरराव" या बिग बजेट चित्रपटाचे निर्माते संदीप मोहित पाटील, धर्मेंद्र बोरा, सौजन्य निकम यांच्यासह रणजीत ढगे पाटील, डॉ. रणजीत निकम यांनी भेट घेऊन चित्रपटाबद्दलची संपूर्ण माहिती दिली. स्वराज्याचा इतिहास मोठ्या पडद्यावर येत असताना आजच्या पिढीला स्वराज्याच्या शिलेदारांची महती समजत आहे याचा मनस्वी आनंद ...

कांदा साठवण मर्यादा वाढवून द्या: केंद्राकडे खा.डॉ.भारती पवार यांची मागणी

नाशिक| सध्या नाशिक जिल्ह्यात कांदा खरेदी विक्रीची परिस्थिती बघता केंद्राने व्यापारी वर्गाला कांदा साठवणूकीसाठी मर्यादा घालून दिल्याने कांदा व्यापारी चिंतेत असून साठवणूक क्षमता मर्यादित केल्यामुळे अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. साठवणूक मर्यादा वाढवून द्यावी अशी मागणी दिल्ली येथे जाऊन दिंडोरी लोकसभेच्या खा.डॉ.भारती पवार यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब यांची भेट घेत केली आहे. कांद्यावरील मर्यादेमुळे व्यापाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे कांदा खरेदीवर परिणाम होत असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. बऱ्याच ठिकाणी कांदा खरेदी बंद झाल्याने शेतकरीवर्ग कोंडीत सापडला आहे. कांदा व्यापारी व शेतकरी यांचा कांदा खराब होऊ नये म्हणून तातडीने पुढच्या दहा दिवसांची मुदत देऊन विक्रिसाठी त्यांना परवानगी द्यावी. तसेच कांदा साठवणूक क्षमता ही वाढवून देण्याचा सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्याकरिता तातडीने दिल्ली येथे जाऊन दिंडोरी लोकसभेच्या खा.डॉ.भारती पवार यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचेकडे त्यांचे दालनात केली आहे. केन्द्र सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांची...

नुकसानग्रस्त शेतीपिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी: खा. पवार यांच्याकडे जिल्हाध्यक्ष अॅड. पगार यांची मागणी

नाशिक| अतिवृष्टीमुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा, मका, सोयाबीन आदी पिकांचे प्रंचड नुकसान झाले असून शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नाशिक जिल्हा दौऱ्यावर आलेले माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार यांच्याकडे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांनी केली.   नाशिक जिल्हा दौऱ्यावर आलेले खा.शरद पवार यांना वरील मागणीचे निवेदनही जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आले आहे. जिल्ह्यात  झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याचे पेरलेले बियाणे खराब झाले आहेत, रोपे वाहून गेली, अती पावसामुळे बियाणे लागवडी नंतर उगवलेच नाहीत. दुबार पेरण्याही वाया गेल्या तर बियाणांचे भावही गगनाला भिडले असल्याने शेतकरी हतबल झाला असून याबाबत पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबतही खा.शरद पवार यांना साकडे घालण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पगार यांनी सांगितले. कांदा उत्पादक जिल्हा असतांनाही केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना फक्त २५ टन (२५० क्विंटल) तर किरकोळ विक्रेत्यांना २ टन (२० क्विंटल) एवढाच माल साठवण्याचे निर्बंध घातल्याने चौकशी व कारवाई...

कांद्याबाबत राज्यासह केंद्राकडून धोरणात्मक निर्णयाची गरज: खा. शरद पवार

नाशिक| महाराष्ट्र नव्हे तर देशात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन नाशिकमध्ये घेतले जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत नाशिकच्या कांद्याला अधिक मागणी असते. त्यामुळे याबाबत काही चुकीचे निर्णय घेतले तर त्याचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्याला बसतो. या प्रश्नांची सोडवणूक करायची असेल तर राज्य शासनासोबतच केंद्राने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार शरदचंद्र पवार हे आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर असतांना त्यांनी नाशिक भुजबळ नॉलेज सिटी आडगाव येथे कांदा उत्पादक शेतकरी व व्यापारी यांच्याशी चर्चा करून त्यांचे प्रश्न समजून घेतले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, माजी आमदार हेमंत टकले, आमदार दिलीप बनकर, आमदार सरोज आहिरे, माजी खासदार समीर भुजबळ, देविदास पिंगळे, माजी आमदार जयवंतराव जाधव, श्रीराम शेटे, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, दिलीप खैरे, नानासाहेब महाले, अर्जुन टिळे, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, हंसराज वडघुले यांच्यासह शेतकरी व व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. ते म्हणाले की,कांद्याच्या या निर्णयाबाबत रा...

दिवाळी सुट्टीत एसटीच्या दररोज १ हजार जादा फेऱ्या: परिवहनमंत्री अनिल परब

मुंबई | दिवाळी सणानिमित्त  प्रवासी गर्दीत वाढ होणे अपेक्षित आहे. त्यानुसार वाढती मागणी लक्षात घेऊन, एसटी महामंडळाने दि. ११ ते २२ नोव्हेंबर  या कालावधीत दररोज सुमारे १ हजार  विशेष जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. या जादा फेऱ्या राज्यभरातील प्रमुख बसस्थानकावरून सुटणार असुन, त्या टप्प्याटप्प्याने आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात येत आहेत.अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी दिली आहे.  आगाऊ आरक्षणासाठी प्रवासी बंधु-भगिणीनी एसटी महामंडळाच्या www.msrtc.maharashtra.gov.in  या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.  एसटी महामंडळामार्फत दिवाळी सणानिमित्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन दरवर्षी नियमित बस फेऱ्या व्यतिरिक्त जादा फेऱ्या सोडण्यात येतात. दरवर्षी प्रमाणे यंदाही एसटी महामंडळाने जादा बस फेऱ्या सुरु करण्याचे नियोजन केले आहे. अर्थात,राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कोविड-१९ चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आवश्यकत्या सर्व सूचना व नियमांचे काटेकोर पालन करीत सुरक्षित प्रवासी वाहतूक करण्याचे निर्देश स्थान...

पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांना पाठवलेल्या नोटीसा परत घ्या; अन्यथा आंदोलन छेडू: पुरुषोत्तम कडलग

नाशिक |प्रतिनिधी| नाशिक जिल्ह्यातील ११००० शेतकऱ्यांना पीएम  किसान योजनेतून प्राप्त झालेला लाभ वसुली व अपात्रतेच्या नोटीस देण्यात आल्या आहे. शेतकऱ्यांना कुठला ही लाभ देतांना अनेक कागद पत्रांची मागणी होऊन त्यात त्यांच्या पात्रतेची शहानिशा केली जाते. त्यांनतर त्या योजनांचा लाभ दिला जातो. लाभ द्यायचा आणि परत घ्यायचा असा प्रकार निंदनीय आहे. शेतकऱ्यांना पाठवलेल्या वसुलीच्या नोटिसा मागे घ्यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी दिला.  पीएम  किसान योजने अंतर्गत प्राप्त होणारा वार्षिक तीन हप्त्यात मिळणारा ६०००/- रूपयांचा लाभ या योजनेचा खुप गाजावाजा करण्यात आला होता. त्यात शेतकरी ७/१२ च्या आधारे लाभार्थी झाले होते.  अशा लाभार्थ्यांना अपात्र ठरवत तहसीलदारांमार्फत नोटिसा देण्यात आल्या आहेत. एकीकडे पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. शेतकरी त्यासंकटातून सावरण्याचा प्रयत्न करत असतांना अशा प्रकारच्या नोटीसा पाठवून शेतकऱ्यांची केंद्र सरकार थट्टा करत आहे असा आरोप कडलग यांनी केला. परस्पर खात्यावर पैसेही जमा होण्यास गेल्या...

खा. शरद पवार यांनी पाटील कुटुंबीयांची भेट घेत केले सांत्वन

नाशिक| राज्याचे माजी मंत्री वनाधिपती विनायक दादा पाटील यांच्या निधनानंतर आज त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे माजी कृषी मंत्री खा. शरदचंद्र पवार यांनी कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी माजी आमदार हेमंत टकले, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार दिलीप बनकर, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, फिरोज मसानी आदी उपस्थित होते.

लासलगाव, पिंपळगाव समितीत कांद्याचे लिलाव बंद; लिलाव सुरू करण्याची शेतकरी संघर्ष संघटनेची मागणी

नाशिक| किरकोळ बाजारात कांद्याने ८० ते १०० रुपये किलो दर गाठला असून कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातबंदीसह आता कांदा साठवणुकीवर ही मर्यादा लागू केली आहे. किरकोळ व्यापाऱ्याला २ टन तर घाऊक व्यापाऱ्यांना २५ टनाची मर्यादा लागू केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना व्यवहारात अडचणीचा सामना करावा लागत असल्याने व्यापाऱ्यांनी लासलगाव, पिंपळगाव बसवंत सह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद ठेवले होते.    फोटो:फाईल लिलाव बंद असल्याने कांद्याची खरेदी बंद होती त्यामुळे शेतकऱ्यांचे ही अर्थिक नुकसान झाले. दरम्यान कांदा लिलाव सुरू करावे अशी मागणी शेतकरी संघर्ष संघटनेने केली आहे. पावसामुळे मुख्य उत्पादक महाराष्ट्रातील कांद्याचे ५० ते ६० टक्के नुकसान झाले आहे. कर्नाटक, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या कांदा उत्पादक राज्यांना अवकाळी आणि परतीच्या पावसाचा मोठा फटाका बसला आहे. त्यामुळे कांद्याच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी  केंद्राने इराण आणि इजिप्तचा कांदा आयात केला आहे. त्यामुळे एकीकडे कांदा दर घसरण्याच्या शक्यतेची टांगती तलवार तर दुसरीकडे लिलाव बंद राहिल्यास का...

कोरोना चाचणीसाठी आता ९८० रुपये दर निश्चित: आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई| राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रती तपासणी सुमारे 200 रुपये कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी 980, 1400 आणि 1800 रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही. 4500 रुपयांवरुन 980 रुपयांपर्यंत इतके कमी दर निश्चित करुन सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. फोटो:फाईल कोरोना चाचण्यांचे दर निश्चित करताना तीन टप्पे करण्यात आले असून प्रयोगशाळेत तपासणी केल्यावर 980 रुपये दर आकारण्यात येईल. कोविड सेंटर, रुग्णालये, क्वारंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळा येथून सॅम्पल गोळा करुन तपासणी करण्यासाठी 1400 रुपये तर रुग्णाच्या घरी जाऊन सॅम्पल घेऊन तपासणी करण्यासाठी 1800 रुपये असा कमाल दर आता निश्चित करण्यात आला आहे. सामान्य माणूस केंद्र स्थानी ठेवून राज्य शासनाने सातत्याने दरामध्ये घट करुन रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगित...

उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांना कोरोनाची लागण; सावधतेचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल: अजितदादा

मुंबई| विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांना ही कोरोनाची लागण झाली आहे. त्याबाबतची माहिती त्यांनी सोशल माध्यमातून दिली आहे. फोटो:फाईल ते म्हणाले की, माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून  प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन असे सांगितले.  तसेच राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी  उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार कोरोना  पॉझिटिव्ह असल्याने, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. दादा लढवय्ये आहेत.महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छा यांच्या बळावर कोरोना आजाराला पराभूत करुन ते लवकरच सर्वांच्या सोबत येतील.दादा, लवकर बरे व्हा असे सांगितले आहे.

नेहमी स्वता:शी स्पर्धा करा, मोठे ध्येय ठेवा: विशेष पो. महानिरीक्षक प्रताप दिघावकर

नाशिक| नेहमी स्वता:शी स्पर्धा करा, मोठे ध्येय ठेवा, शिवाजी महाराजांसारखेच चारित्र्य ठेवा. त्यांनी स्वराज्याचे जे स्वप्न पाहिले त्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच परिश्रम जर विद्यार्थिनीने घेतले तर नक्कीच त्यांचे ध्येयपुर्ण होईल. असे सांगून विद्यार्थिनीना गुणवंत व्हा, यशवंत व्हा! अशा शुभेच्छा ही मुख्य अतिथी नाशिकचे विशेष पोलिस  महानिरीक्षक  श्री. प्रताप दिघावकर  यांनी  दिले. तसेच आपल्या प्रेरणादायी भाषणात विद्यार्थिनीना मार्गदर्शन करुन.  विजया दशमीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भोसला मिल्ट्री स्कूल गर्ल्सची नेहमी प्रगती होवो अशी मंगल कामना केली. विजया दशमीचा कार्यक्रम मुख्य अतिथी विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्यासह  मोजक्या पदाधिकारी व शिक्षकवृंदाच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. मुख्य अतिथी नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक  प्रताप दिघावकर व मान्यवर अतिथींच्या हस्ते विद्यालयाचे संस्थापक डॉ.  बा. शी. मूंजे यांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करण्यात आले.  प्रारंभी विद्यालयातील सर्व अश्वांचे पुजन क...

हिरे अँड सन्स कंपनीच्या भव्यदिव्य दालनाचा माजी मंत्री प्रशांतदादा हिरे यांच्या हस्ते शुभारंभ

नाशिक| पंचवटी मार्केट यार्ड येथील हिरे  अँड सन्स कंपनीच्या  भव्यदिव्य दालनाचे उद्घाटन माजी  मंत्री समाजश्री डॉ प्रशांतदादा हिरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.  फोटो: संदीप पवार कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी सन १९३७ मध्ये स्थापना केलेल्या हिरे अँड सन्स कंपनीच्या दालनाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आदिवासी सेवा समितीच्या कोषाध्यक्ष सौ. स्मिताताई हिरे, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी खा. देविदास पिंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा आ डॉ अपूर्वभाऊ हिरे, मधुरा ट्रस्टच्या सरचिटणीस संपदादिदी हिरे, महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे  सहसचिव डॉ व्ही एस मोरे, आदिवासी सेवा समितीचे सहसचिव राजेशजी शिंदे,युवा नेते दीपक भाऊ सोनवणे,पृथ्वीराज हिरे,नगरसेविका प्रियांका माने, मा नगरसेवक अमोल जाधव, माजी प्राचार्य डॉ हरिष आडके, प्राचार्य डॉ. सी जी दिघावकर,राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अनिताताई भामरे, रतन चावला,सुनील आहिरे,भिवा महाले लक्ष्मण वाघेरे,शंकर पाटील,रामदास  महाले,सुदाम निकम,बाळा निगळ, ऍड.जगदीश काजळे, निवृत्ती अरिंगळे,योगेश दिवे, शाम पाटील,दिलीप तुपे,...

एमएचटी-सीईटी २०२० ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी मुदतवाढ

मुंबई|  एमएचटी–सीईटी २०२० ऑनलाईन प्रवेश परीक्षेकरिता ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाऊनलोड केले होते, परंतु कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव आणि अतिवृष्टीमुळे परीक्षेस उपस्थित राहिले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच प्रवेश नोंदणीसाठी आता दिनांक २६ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच सदरील उमेदवारांची परीक्षा पुढील १५ दिवसात घेण्याच्या सुचनाही विभागास दिल्या आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व महाविद्यालयात पदविका व पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांकरिता राज्यातील आजी/ माजी सैनिकांच्या पाल्यांना प्रवेशासाठी आता ५ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. या पूर्वीची जास्तीत जास्त ५ जागेची अट रद्द करण्यात येत आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत केली. श्री. सामंत म्हणाले, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये समाविष्ट प्रत्येक अभ्याक्रमाकरिता ५ टक्के समांतर आरक्षण विहित करण्यात आले असून या प्रवेशाकरिता प्रत्येक संस्थेमध्ये असलेली जास्तीत जास्त ५ जागांची प्रचलित...

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई|विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्याबाबतची माहिती त्यांनी सोशल माध्यमातून दिली आहे. ते म्हणाले की, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी.  फोटो:फाईल माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी घेतली खा.डॉ.भारती पवार यांचेकडून नाशिक जिल्ह्याची माहिती

नाशिक| केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे खा.डॉ.भारती पवार यांनी भेट घेतली प्रसंगी नाशिक जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेत विकास कामासंदर्भात माहिती घेतली. त्याचबरोबर आत्मनिर्भर भारत पॅकेज बाबत सविस्तर चर्चा करत जिल्ह्यासह दिंडोरी लोकसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने त्यांना बळकटी देण्यासाठी चांगली तरतूद केली आहे. कांदा असेल द्राक्ष असेल यासह आदी महत्त्वाच्या शेत पिकांची नितीन गडकरी यांनी खा.डॉ.भारती पवार यांचेशी सविस्तर चर्चा करून माहिती घेतली. त्याचप्रमाणे नाशिक मधील खादी ग्रामोद्योग देखील उत्कृष्ट आहे. कृषी बिलाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असून यामुळे शेतकरी सक्षम होऊन त्याचा आर्थिक दर्जा सुधारण्यास मदत होणार असल्याचे देखील गडकरी यांनी खा.डॉ. भारती पवार यांचेशी चर्चे दरम्यान सांगितले. खा.डॉ.भारती पवार यांनी क्लस्टरला भेट दिली समवेत डॉ.सुभाष भामरे, खा.हेमंत गोडसे उपस्थित होते.

नाशिकचा आधारवड हरपला, मान्यवरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली

नाशिक|प्रतिनिधी|नाशिकचे वैभव बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी वनाधिपती माजी मंत्री विनायकदादा पाटील (८०) यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले. एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर नाशिक अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. साहित्य, संस्कृती, सामाजिक, सहकार, उद्योग, वनशेती आदी क्षेत्रांची चांगली जाण असणारे तसेच महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणी म्हणून ते महाराष्ट्रभर परिचीत होते. नाशिकमधील सामान्य माणूस असो की त्या त्या क्षेत्रातील मोठी व्यक्ती मार्गदर्शनासाठी अशा सर्वांचाच राबता त्यांच्याकडे असे मदतीसाठी त्यांची दारं सदैव उघडी होती. प्रश्न कोणताही असो त्यांचेकडे गेल्यावर तो सुटलाच समजा, वनमंत्री म्हणून किंवा विविध संस्थांमध्ये काम करतांना आपल्या कार्यकुशलता ठसा त्यांनी उमटवला. नाशिकचे एक पितृतुल्य व्यक्तिमत्व होते, नाशिकचा आधारवड आपल्यात नाही यांची कल्पना करवत नाही, त्यांच्या जाण्याने नाशिकचे वैभव हरपल्याची भावना नाशिककरांमध्ये आहे.  नाशिकचा आधारवड हरपला अशा शब्दात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण क...

अतिवृष्टी-पूरग्रस्तांसाठी, पायाभूत सुविधांच्या पुनर्उभारणीसाठी १० हजार कोटींच्या मदतीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

मुंबई| राज्यात जून ते ऑक्टोबर २०२० या काळात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तसेच पायाभूत सुविधांच्या पुनउर्भारणीसाठी १० हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आज मुख्यमंत्र्यांनी आपदग्रस्त भागात झालेल्या नुकसानीची आढावा बैठक घेतली. वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अनिल परब हे दूरदृश्य प्रणालीद्वारे तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, मुख्य सचिव संजय कुमार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. शेती आणि फळपिकासाठी केंद्राच्या निकषापेक्षा अधिक मदत या बैठकीनंतर माध्यमप्रतिनिधींशी बोलतांना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, नुकसानग्रस्त शेती आणि फळपिकासाठी राज्य शासनाने एनडीआरएफच्या निकषापेक्षा पुढे जाऊन मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपये याप्रमाणे २ हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येईल. ...

पुणे पदवीधर मतदार नोंदणीतील त्रुटी दूर करा; भाजपा प्रदेशाध्यक्ष यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

पुणे| पुणे विधानपरिषद पदवीधर मतदार संघातील मतदारांची यादी तयार करण्याच्या ऑनलाईन प्रक्रियेतील त्रुटी दूर करा, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. या संदर्भात पाटील यांनी गुरुवारी मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या निवेदनात मा.पाटील यांनी म्हटले आहे की, पदवीधर मतदारसंघाच्या मतदार ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत अनेक त्रुटी आहेत. या त्रुटी दूर न करताच  निवडणूक घेण्याची तयारी सुरू आहे. याबाबीकडे राज्य निवडणूक आयोगाचे लक्ष यापूर्वीच वेधण्यात आले होते.ऑनलाईन भरलेले अर्ज नाकारले जाणे अशा अनेक तक्रारी मतदारांनी केल्या आहेत.त्याबरोबर सर्व्हर यंत्रणा काम करत नसल्यानेही या प्रक्रियेत अनेक अडचणी येत असल्याने ऑफलाईन अर्ज भरण्याची परवानगी देण्यात यावी. अशी मागणी ही करण्यात आली. याप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती पाटील उपस्थित होते.

कोविड-१९: राष्ट्रीय मृत्यू दर १% पेक्षाही कमी आणण्याचे केंद्राचे राज्यांना उद्दिष्ट

नवी दिल्ली| चाचण्या ,  शोध आणि उपचार या त्रिसूत्रीच्या यशस्वी अंमलबजावणी बरोबरच वेळीच आणि योग्य उपचार यामुळे देशात मृत्यू दर सातत्याने घटत आहे. आज राष्ट्रीय मृत्यू दर  1.51%  आहे. राष्ट्रीय मृत्यू दर  1%  पेक्षाही कमी आणण्याचे उद्दिष्ट ठेवावे असे केंद्र सरकारने ,  राज्ये/ केंद्र शासित प्रदेशांना सांगितले आहे.  फोटो:फाईल सध्या  14  राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात मृत्यू दर  1%  पेक्षा कमी आहे. भारतात बरे झालेल्यांची एकूण संख्या आज  67,95,103  आहे. बरे होणाऱ्यांच्या दररोजच्या मोठ्या संख्येमुळे बरे होण्या संदर्भातल्या राष्ट्रीय   दरात सातत्याने वाढ होत असून हा दर वेगाने  89%  जवळ पोहोचला आहे. ( 88.81%). बरे झालेल्यांपैकी  77%  संख्या  10  राज्ये/ केंद्रशासित प्रदेशातली आहे. नुकत्याच बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येत कर्नाटकने   महाराष्ट्राला मागे टाकले असून कर्नाटकमध्ये  8,500  जण बरे झाले आहेत तर महाराष्ट्र आणि केरळ या   दोन्ही राज्यामध्ये ही संख्या  7,000  पेक्षा ...

भुजबळ म्हणाले,नाथाभाऊंच्या येण्याने राष्ट्रवादीचे बळ वाढेल

नाशिक|भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाचे अन्न,नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्वागत केले आहे. फोटो:फाईल एकनाथ खडसे हे मोठे अनुभवी नेते आहेत त्यांनी भाजपा या पक्षाला महाराष्ट्रात मोठे केले,विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे, राज्यात अनेक वर्ष ते मंत्री होते असे व्यक्तिमत्त्व जर पक्षात आले तर निश्चित पणे पक्षाची ताकद वाढेल असा विश्वास देखील श्री भुजबळ यांनी व्यक्त केला. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार साहेब यांच्यावर अनेक वेळा आरोप केले असले तरी त्या वेळेस एकनाथ खडसे हे विरोधी पक्षात होते आणि टीका करणे हे विरोधी पक्षाचे काम आहे आणि ही गोष्ट शरद पवार साहेबांना कळते त्यामुळे आम्ही सर्व जण नाथाभाऊंचे स्वागतच करतो असे मत श्री.भुजबळ यांनी व्यक्त केले. एकनाथ खडसे यांनी जर त्यांच्या भूमिकेत बदल केला असेल किंवा राष्ट्रवादी पक्षाची भूमिका त्यांना पटली असेल तर त्यांचे स्वागतच करावे लागेल त्यांच्यामुळे पक्षाला अधिक फायदा होणार असल्याचेही छगन भुजबळ यांनी सांगितले.

नाथाभाऊंचे ठरले, शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित!

नाशिक| स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून गेली तीन दशके भाजपचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा त्याग केला आहे. त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. म्हणून येत्या २३ ऑक्टोबर रोजी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी माहिती दिली. एकनाथ खडसे यांच्या रुपाने एक अभ्यासू नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळाले आहेत. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला नक्कीच फायदा होईल. मागील काही वर्षांपासून भाजपमध्ये खडसे साहेबांवर अन्याय होत होता. त्याला आता वाचा फुटली आहे.  अनेकांना आता विश्वास बसू लागला आहे की भाजप राज्याचा, देशाचा विकास करू शकत नाही. अनेक माजी आजी आमदार, नेते आमच्या संपर्कात आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये येण्यास इच्छुक आहेत. योग्य वेळी नावे जाहीर केली जातील. त्यांचे पक्षप्रवेश रात्रीच्या अंधारात न होता दिवसाढवळ्या होतील, असे ना. पाटील म्हणाले.