औरंगाबाद| प्रतिनिधी| देवगिरी बँकेचा बारावा वर्धापन दिन मयूरपार्क शाखेत उत्साहात पार पडला. यावेळी सर्वप्रथम भारतमातेच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. देवगिरी बँकेचे उपाध्यक्ष संजय गायकवाड, संचालक राजेश जैन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रुपेंद्र कोयाळकर,बँक व्यवस्थापक सुबोध राऊत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राजेश जैन यांनी बँकेच्या सेवा सुविधा विषयी माहिती दिली. यूपीआय पेमेंटसेवा देखील बँकेने आता सुरू केली असून ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी केले. रुपेंद्र कोयाळकर म्हणाले की खातेदाराच्या काही अडीअडचणी असतील तर त्यांनी माझ्यासमोर मांडाव्या.आपल्याला सेवा देन्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.उत्कृष्ट सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ग्राहकाचे समाधान हेच आमचे ध्येय असे ते म्हणाले.देवगिरी बँकेने आतापर्यंत दोन हजार कोटीचा टप्पा पार करून तीन हजार कोटीकडे बँकेची वाटचाल सुरू आहे. अर्थातच ग्राहकांच्या सहकार्य आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे ही यशस्वी वाटचाल आम्ही करु शकलो.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता सिंपले यांनी केले तर आभार हरिबा भुईंगड यांन...