मोखाडा|प्रतिनिधी|संकट आलं की मदतीला धावणाऱ्या जिजाऊ बद्दल नेहमीच कळाले, अशा संस्थांची महाराष्ट्राला नेहमीच गरज आहे. आम्ही सर्व सदैव जिजाऊ सोबत आहोत. संकटातील आधार म्हणजे जिजाऊ एक आधारवड अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि कर्जत जामखडचे आमदार रोहीत पवार यांनी जिजाऊ संस्थेचे कौतुक केले आहे. चिपळूण दौऱ्यावर असताना आ. रोहीत पवार यांनी जिजाऊ संस्थेची रुग्णवाहिका पाहिली व ते आपुलकीने जवळ आले आणि रुग्णवाहिका व जिजाऊच्या टीम सोबत त्यांनी फोटो काढला. जेथे जेथे संकट येते तेथे तेथे मदतीला धावुन येणारी जिजाऊ. कुपोषणग्रस्त, वादळग्रस्त, कोरोनाकाळ असो भूकंप असो प्रत्येक संकटात कोकणाला आधार देते ती जिजाऊ संस्था. अशी जिजाऊची महाराष्ट्र भर ओळख निर्माण झाली आहे. कोकण विभागात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गावच्या गावे ओसाड झाली तर अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले या अशा संकटात जिजाऊ संस्था पुढे येऊन कोकणवासीयांना जीवनावश्यक वस्तु देत आधार दिला आहे.