इतिहास नेहमी काही तरी सांगत असतो. इतिहासाची ती हाक तो आवाज आपण ऐकला पाहिजे तर आपले भविष्य चांगले होऊ शकेल.म्हणजेच इतिहास संशोधनाचा एक दुवा असलेल्या एक स्तंभाचे आपण प्रेमी आहोत. नाण्यांतून इतिहासाचे धागे गवसतात.सातवहान कालीन नाण्यांतून व शिलालेखात जसा इतिहास समोर येतो व पर्यावरन सवर्धनाचा आपल्याला संदेशच देत आहेत. तसेच ही नाणी आपल्याला निसर्गाकडेही घेऊन जातात. प्राचीन नाणी व लेणीवरील शिलालेख जणू मानव निसर्गपूजक होता याची साक्ष देतात. नाण्यातून व शिलालेखात दिसणारा त्यावेळचा निसर्ग हा माझ्या विषयाचा हेतू आहे. निसर्ग हा वैविध्याने भरलेला आहे. इतिहास,भूगोल, निसर्ग, पर्यावरण, समाज, साहित्य,संस्कृती असे अनंत विषय या निसर्गाच्या पोटात दडलेले असतात. सृष्टीतील या अनंत गुपितांचा शोध घेण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रयत्नशील असतो. हा शोध फक्त निसर्गावर प्रेम असणारे मंडळीच घेतात अथवा संशोधक निसर्गाचा शोध घेत आहेत, असे नाही तर अगदी दोन हजार वर्षांपूर्वी सत्तास्थानावर अधिराज्य करणाऱ्या राजामहाराजांना निसर्गाने भूरळ घातली होती. सुरूवातीच्या काळात याचे प्रतिबिंब राजेमहाराजांच्या नाण...