Brixlelant फाउंडेशन सेवाभावी सामाजिक संघटना आहे.ही संस्था अमेरिकेतील अनिवासी तरुणांच्या प्रोत्साहन आणि प्रयत्नातून उदयास आली आहे. तिचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. संस्थेने सामाजिक बांधीलकी जोपासण्याच्या हेतूने विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना डिजिटल ई-शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी क्यूजली ( Qeasily ) नावाचे ऍप आणले आहे. ऑनलाइन शिक्षणावर भर देत स्मार्ट विद्यार्थी आणि स्मार्ट शाळा घडवण्याच्या मार्ग दाखवण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे त्यासाठी ब्रिक्सेलेंट Qeasily .com या कंपनीचे सहकार्य घेतले आहे, संस्थेने घोषणा केली आहे की डिजिटल शिक्षणाचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी आगामी काळात 1 मिलियन डॉलरची गुंतवणूक केली जाणार आहे. ब्रिक्सेलेंट अभ्यासक्रमावर आधारित सर्वसामग्री ही शाळा आणि विद्यार्थ्यांना पूर्णपणे विनामूल्य , डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देेत आहे. त्यातून विद्यार्थी शाळा, शिक्षक यांना एक व्यासपीठ आणि आवश्यक अभ्यासक्रमाचे समाधान प्राप्त करता येणार आहे, त्याला विद्यार्थी, शिक्षक व शाळेच्या विश्वस्तांकडून चां...