Skip to main content

Posts

Showing posts from January, 2022

सार्वजनिक समारंभ आणि शाळा 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी द्यावी: ललित गांधी

नाशिक| महाराष्ट्रात राज्य सरकारने लागू केलेल्या कोरणा प्रतिबंधक नियमांमध्ये काही सुधारणा करून लग्न व अन्य सार्वजनिक समारंभामध्ये 50 टक्के क्षमतेने उपस्थिती साठी तसेच शाळा व शैक्षणिक संस्था 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या वतीने अध्यक्ष ललित गांधी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्र चेंबर तर्फे आज माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह संबंधित विभागांच्या सचिवांना चेंबर तर्फे निवेदन देऊन यासंदर्भात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात भूमिका मांडताना ललित गांधी यांनी म्हटले आहे की, लग्नसमारंभ, सभा, सामाजिक कार्यक्रम, सेमीनार्स इ. साठी 50 जणांची मर्यादा निश्‍चित केली आहे. अशा प्रकारच्या आयोजनांवर इव्हेन्ट ऑर्गनायझर्स, कॅटरर्स, टेन्ट कॉन्ट्रॅक्टर्स, डेकोरेटर्स, बँडवाले इत्यादी अनेक छोट...

इगतपुरी रेशन दुकानदारांच्या प्रश्नांसंदर्भात तहसीलदारांना निवेदन

नाशिक| नाशिक जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेच्या वतीने  इगतपुरी तालुका रास्त भाव दुकानदार संघटनेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी बैठक घेण्यात आली. इगतपुरी तालुक्यात लायसन नुतनीकरनाचा प्रश्न 2019 पासुन प्रलंबित असल्याने व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 पर्यन्तचे पैसे देण्यात यावे व लायसन नूतनीकरण करून  देण्यात यावे असे निवेदन तहसीलदार परमेश्वर कासोळे यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे प्रमुख श्री गणपतराव डोळसे पाटील, निवृत्ती कापसे, दिलीप नवले, गोपी मोरे हे संघटनेच्या वतीने उपस्थित होते इगतपुरी तालुका अध्यक्ष शशी उभाळे, उपाध्यक्ष अरुण बागडे ,संजय गोवर्धने, प्रकाश नाठे, देवरामशेठ मराठे, रघुनाथ तोकडे हे प्रमुख दुकानदार उपस्थित होते.

पंचवटी विभागात राष्ट्रवादी काँग्रेस राबवणार परिवार संवाद अभियान: दिलीप खैरे

नाशिक| आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रणशिंग फुंकले असून पंचवटी विभागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 'राष्ट्रवादी परिवार संवाद अभियान' राबविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पंचवटी विभागाची बैठक आज पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.  नाशिक महानगरपालिका पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा घेत निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यानुसार विभागवार अध्यक्षांच्या नेमणूका देखील करण्यात आलेल्या आहे. त्यानुसार आज प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव गोवर्धने, माजी महानगरपालिका विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, पंचवटी विभागीय अध्यक्ष शंकर मोकळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचवटी विभागाची बैठक पार पडली. यावेळी मोतीराम पिंगळे, सुरेश आव्हा...

रायुकाचा सिटीलिंक प्रशासनाला इशारा: बसेस दिलेल्या जागेत पार्क करा, अन्यथा पोलिसात तक्रार

नाशिक| तपोवन रोड येथील बसस्थानकाजवळ सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून मुख्य रस्त्यावर सिटीलिंकच्या बस पार्क करण्यात येतात. याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे व त्यांच्या शिष्टमंडळाने नाशिक सिटी लिंकचे महाव्यवस्थापक मिलिंद बंड यांना निवेदन देत कारवाई न केल्यास पोलिसात तक्रार करून आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी १५ दिवसांच्या आत बस आगर नाशिकरोड येथे स्थलांतरीत करणार असल्याचे  महाव्यवस्थापक मिलिंद बंड यांनी शहराध्यक्ष अंबादास खैरे यांना  सांगितले.

ओमिक्रॉनला रोखण्यासाठी राज्यात नवे निर्बंध

मुंबई| ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे कोविड– 19 च्या प्रसाराची भीती राज्य मनात निर्माण झाली आहे, याची दखल घिऊन महाराष्ट्र शासनाने या विषाणूला रोखण्यासाठी काही तातडीची पावले उचलण्याचे ठरविले आहे. त्यानुसार खाली दिलेले निर्बंध व नियम 10 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून लागू होतील, असे राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.    क्षेत्रप्रस्तावित निर्बंधनागरीकांचे बाहेर फिरणे1. पाच किंवा त्याहून जास्त लोकांच्या समूहाला बाहेर फिरण्यासाठी पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत बंदी. 2. पाच किंवा त्याहून जास्त लोकांच्या समूहाला अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरण्यासाठी रात्री 11 पर्यंत ते पहाटे 5 वाजेपर्यंत बंदी. शासकीय कार्यालये 1.     महत्त्वाच्या कामासाठी कार्यालय प्रमुखाच्या लेखी परवानगीविना आगंतुकांवर बंदी. 2.     कार्यालय प्रमुखांनी नागरीकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधेची व्यवस्था करावी. 3.     बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीची व्यवस्था 4.     कार्यालय प्रमुखांच्या गरजेनुसार वर्क फ्र...

महिला हक्क संरक्षण समितीच्या माजी अध्यक्षा साधनाताई तोरणे यांचे निधन

नाशिक| महिला हक्क संरक्षण समितीच्या माजी अध्यक्षा सौ. साधना सुधाकर तोरणे वय 81 यांचे  वृद्धापकाकाळाने शुक्रवारी रात्री दुःखद निधन झाले.  त्या डबल एमए, बीएड, ज्योतिष शास्त्री, डेफ अँड डंबची पदवी अशा उच्च विद्या विभूषित होत्या. मुंबई, पुण्यात अनेक वर्ष मराठीच्या प्राध्यापिका होत्या. पुणे, नाशिक येथील विविध समाजसेवी संस्थामध्ये त्या पदाधिकारी होत्या. तेजस्विनी महिला संस्थेच्या त्या संस्थापक अध्यक्ष होत्या. महिला हक्क संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी असताना संस्थेला  अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा समाजकार्यासाठी असलेला पुरस्कार  मिळाला होता.  महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयचे निवृत्त संचालक सुधाकर तोरणे यांच्या त्या पत्नी तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांच्या त्या मातोश्री होत्या. सातत्याने वृत्तपत्रीय लेखन, बालनाट्याच्या दिग्दर्शिका, महिला सबलीकरणासाठी अनेक विविध उपक्रम त्यांनी राबवले होते. 

पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे| ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर ठोसर पागा स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी स्वर्गीय सिंधुताई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख , अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे , पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनीही स्वर्गीय सिंधुताई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली. स्वर्गीय सिंधुताई यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, पुणे शहर तहसीलदार राधिका बारटक्के यांच्यासह कला, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक व विविध क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय: मंत्री किंवा नेत्यांनी गर्दी होईल असे कार्यक्रम घेऊ नये- नवाब मलिक

मुंबई| या महिन्यात पक्षाचे होणारे नियोजित शिबीर व इतर सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पक्षाच्या मंत्र्यांची व नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी माहिती दिली.  या बैठकीमध्ये आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून त्या निवडणुकीत ओबीसींचे आरक्षण अबाधित राहिले पाहिजे ही पक्षाची भूमिका असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.  ओबीसी आरक्षण न्यायालयीन लढाई जबाबदारी मंत्री भुजबळांवर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत न्यायालयीन लढा लढण्याची जबाबदारी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देण्यात आल्याचेही बैठकीत ठरल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले* ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणूका नकोत ही पक्षाची सुरुवातीपासून भूमिका आहे आणि तीच कायम राहील असेही बैठकीत चर्चा झाल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.  राज्यात कोरोनाचे ...

हे घर माझे माहेर...सिंधुताई घरी आल्या होत्या तेव्हा..

अनाथांच्या डोक्यावर छत्र उभा करणाऱ्या सिंधुताई सातत्याने महाराष्ट्रभर फिरून आपल्या पिलांसाठी निधी जमवायच्या. सांगली जिल्ह्याचे त्यांचे येणे जाणे अनेकदा व्हायचे. त्या निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक घरे त्यांनी जोडली. 94-95 साल असावं... ताई आमच्या घरी आल्या होत्या. पाहुण्यांचे आगत-स्वागत हा तर आमच्या मातोश्रींचा आवडता छंद. महाराष्ट्रातील खूप मोठ्या, भल्या माणसांनी तिने बनवलेल्या उत्तम भोजनाचा आस्वाद घेतला आहे. त्यात सिंधुताईंचाही समावेश होता. पप्पानी त्यांना निमंत्रित केले होते. त्यामुळे त्या दिवसभर आमच्या घरीच होत्या. आम्हा सर्व मुलांशी, आई, आजी बरोबर गप्पा झाल्या. अनेक लोकांनी आमच्या घरी येऊन त्यांना मदत देऊ केली. ताईना पुढे जायचे होते, जाताना निरोप घेता घेता आजीने पुन्हा येण्यास सांगितले. .... तशा त्या म्हणाल्या, हे घर पण आता माझे माहेर झाले. आप्पासाहेब काटकर नावाचा मला एक भाऊ मिळाला...कधीही येईन..... सोबतचा फोटो पप्पा आणि सिंधुताई यांचा असा सहजफोटो निघण्याचे कारण म्हणजे, छायाचित्रकार नाना धामणीकर यांना ताईंचे फोटो घ्यायचे होते. त्यासाठी ते आले होते. ताई बोलत होत्या, पुढे बसलेलो लोक ऐ...

अनाथांची माय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ काळाच्या पडद्याआड

पुणे| अनाथांची माय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ  (७५) यांचे हृदयविकराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले. त्यांच्यावर येथील गॅलेक्सी हॉस्पिटमध्ये उपचार सुरू असतांना त्यांची प्राणज्योत मालवली असे सूत्रांनी सांगितले. त्यांच्यावर बुधवारी दुपारी १२ वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नुकताच त्यांना पद्मश्री पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले होते . अनाथ मुलांच्या आश्रयदात्या म्हणून त्यांना २०१२ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारही मिळाला होता. तसेच नुकतच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आपल्या संपूर्ण आयुष्यभरात ७५२ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार ही त्यांच्या कार्याची पोचपावती होती. त्यांच्या निधनाने अनाथनाचा आधारवड हरपला असून एका संघर्ष पर्वाचा अंत झाला आहे.  अनाथांचा आधार हरपला: भुजबळ अनाथांचा आधार असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी ह्दयविकाराच्या झटक्याने दुःखद  निधन झाले. अतिशय दुःख झाले. सिंधुताई सपकाळ यांच्या आकस्मित निधनाने अनाथांचा आधार हरपला असल्याच...

गुणवत्ता आणि संशोधन वाढीसाठी मूल्यमापन गरजेचे: कुलगुरु डॉ. माधुरी कानिटकर

नाशिक| शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ता व संशोधन वाढीसाठी महाविद्यालयांनी मूल्यमापनासाठी निर्देशित केलेल्या कार्यपध्दतीची अवलंब करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल  डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) अ.वि.से.प., वि.से.प. यांनी केले.  वैद्यकीय विद्याशाखेकरीता विद्यापीठातर्फे ’सिम्पोसियम ऑन असेसमेंट ऑफ हेल्थ सायन्स कॉलेज ऑन द बेसिक ऑफ नॅक पॅरामिटरर्स’ विषयावरील कार्यशाळेत अध्यक्षस्थानी मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) समवेत कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, वैद्यकीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंब्रे, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे सल्लागार डॉ. वाय.एम. जयराज, लोणी येथील प्रवरा इन्स्टीटयुट ऑफ मेडिकल सायन्सेसचे समन्वयक, एम्स नागपूरचे मा. सदस्य डॉ. सिध्दार्थ दुभाषी, तुतीकोरीनचे व्हि.ओ. चिदंबरनार कॉलेजचे प्राध्यापक डॉ. राजा डी. पेचुमिथू आदी मान्यवर ऑनलाईन कार्यशाळेस उपस्थित होते. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंबी विद्यापीठाचे मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) अ.वि.से.प., वि.से.प. यांनी सांगितले की, शैक्षणिक क्षेत्रात गु...

नायलॉन मांजावर युवक राष्ट्रवादीची करडी नजर; विभागवार पथकाची नेमणूक

नाशिक| नायलॉन मांजा विक्रेत्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संकल्पनेतून नाशिक शहरात विभागवार युवक पदाधिकाऱ्यांचे पथक नेमण्यात आले आहे. पतंग उडविताना नायलॉन मांजाच्या वापरामुळे अनेक अपघात होवून नागरिक तसेच पक्षी जखमी होतात यात काहीना तर आपला जीव देखील गमवावा लागतो. नायलॉन मांजाच्या वापरावर सर्वोच्च न्यायालयानेच बंद लावली असून सूद्धा शहरात छुप्या पद्धतीने याची विक्री केली जात आहे. याचे दुष्परिणाम सामान्य माणासांप्रमाणेच पशुपक्षांनाही भोगावे लागत आहेत. पतंग उडविताना नायलॉन मांजाच्या वापरामुळे अनेक अपघात होतात यामध्ये अनेकांना जीव देखील गमवावा लागला आहे.  त्याचबरोबर पक्षांना देखील याचा मोठा त्रास होतो अनेक पक्षी यात जखमी होतात तसेच त्यात त्यांचे प्राण देखील जातात. बाजारात नायलॉन मांजा विरोधात धाड सत्र राबविले जाते परंतु छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाची विक्री होते. या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संकल्पनेतून नाशिक शहरात विभागवार युवक पदाधिकाऱ्यांचे पथकांची...

पत्रकार भास्कर निकाळजे यांना राजश्री शाहू महाराज समाजसेवा पुरस्कार जाहीर

औरंगाबाद| नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीसच्या वतीने देण्यात येणारा राजर्षी शाहू महाराज समाजसेवा पुरस्कार पत्रकार भास्कर निकाळजे यांना नुकताच जाहीर झाला आहे. हा पुरस्कार ७ जानेवारी राेजी साेलापूर येथे ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत, विद्यापीठ अनुदान अायाेगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डाॅ. सुखदेव थाेरात यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या यशाबद्दल सरपंच दिपक निकाळजे, दिलीप निकाळजे, गजू निकाळजे, आकाश निकाळजे, लक्ष्मण निकाळजे, अनिल निकाळजे, आनंद अंभोरे, सचिन अंभाेरे, राहूल वरशिळ, विशाल पोपळघट आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

आधुनिक सुविधायुक्त हॉस्पिटल्ससह सीजीएचएस वेलनेस सेंटरच्या विस्तारीकरणावर भर देणार: डॉ. भारती पवार

मुंबई| नाशिक| एम्स राज्यात नागपूर येथे आहे, एका राज्यात एकच एम्स असल्याने त्यामुळे येथे ते देता येत नसले तरी सीजीएचएस वेलनेस सेंटरच्या माध्यमातून आधुनिक सुविधा युक्त हॉस्पिटल्स तयार करून त्याच्या विस्तारीकरणासाठी पुढील काळात प्रयत्न केले जातील अशी ग्वाही केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांनी आज येथे दिली.  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांच्या हस्ते आज केंद्र सरकारच्या आरोग्य योजने अंतर्गत गांधीनगर नाशिक येथील नवीन अॅलोपॅथिक निरामय स्वास्थ्य केंद्राचे उद्घाटन झाले. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना त्याबोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर महापौर सतीश कुलकर्णी, खा. हेमंत गोडसे, आ. देवयानी फरांदे, ज्येष्ठ भाजप नेते लक्ष्मण सावजी, भाजप शहराध्यक्ष गिरीष पालवे, आ. सीमा हिरे, आ. सरोज अहिरे, विजय साने, नगरसेवक अनिल ताजनपुरे, राहुल दिवे, नगरसेविका सुषमा पगारे, कुणाल वाघ,  दिल्ली येथील सीजीएचएसचे संचालक निखिलेश चंद्र आणि मुंबई येथील सीजीएचएसच्या अवर संचालक डॉ.डी.एम.देसाई, प्रेस कामगार युनियनचे अध्यक्ष राम हरक, ...

केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते उद्या गांधीनगर 'सीजीएचएस' केंद्राचे उद्घाटन; 'नाशिक' महाराष्ट्रातील चौथे शहर

मुंबई| नाशिक| केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांच्या हस्ते उद्या सोमवार 3 जानेवारी रोजी सकाळी 11:00 वाजता नाशिक येथील केंद्र सरकार आरोग्य योजनाअंतर्गत नवीन अॅलोपॅथिक निरामय स्वास्थ्य केंद्राचे (CGHS) उद्घाटन होणार आहे. यानिमित्त आयोजित बैठकीलाही त्या संबोधित करणार आहेत. याप्रसंगी  नाशिकचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ, नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी, खासदार डॉ सुभाष भामरे, खासदार हेमंत गोडसे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. केंद्र सरकार आरोग्य योजनेत अधिक शहरांचा समावेश करण्याच्या आणि सीजीएचएस सेवांची सुलभता सुधारण्याच्या प्रयत्न म्हणून, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 10 जून 2021 रोजी नाशिकमध्ये नवीन अॅलोपॅथिक निरामय स्वास्थ्य केंद्र सुरु करायला मंजुरी दिली आहे. सीजीएचएस निरामय स्वास्थ्य केंद्र उघडणारे नाशिक हे मुंबई, पुणे आणि नागपूरनंतर महाराष्ट्रातील चौथे शहर असेल. नाशिकमधील हे सीजीएचएस निरामय स्वास्थ्य केंद्र हे गांधीनगर भागात असून सरकारी कार्यालये आणि निवासस्थाने या दोन्हीपासून सोयीच्या अंतरावर  आहे. केंद्र सरकारी ...