Skip to main content

Posts

Showing posts from March, 2024

नाशिकरोड ते व्दारका रस्त्यावरील वृक्ष हटवण्यास सुरुवात; मात्र अतिक्रमण होणार नाही, दक्षता घ्या..!

नाशिकरोड|प्रतिनिधी ना |ना शिकरोड ते व्दारका रस्त्यावरील प्राचीन वृक्ष हटविण्याचे काम सुरु झाले आहे. दत्तमंदिर, उपनगर नाका, गांधीनगर येथे वाहतुकीला अडथळा ठरणारी २४ झाडे तोडण्यास महापालिकेने राष्ट्रीय महामार्ग विभागाला परवानगी दिली आहे. त्यामुळे वाहतूक वेगाने व सुरक्षित होईल, असा प्रशासनाचा दावा आहे. वाहतूक कोंडी व अपघात टळणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, नंतर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी, तोडण्यात येणा-या जुन्या वृक्षांच्या बदल्यात देशी झाडे लाऊन ती वाढवावीत, अशी मागणी होत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकऱ्यांनी सांगितले की,  व्दारका ते नाशिकरोड या साडेसहा किलोमीटर मार्गाचे रुंदीकरण नव्हे तर मजबूतीकरण होणार आहे. अकरा महिन्यांची मुदत या कामासाठी असली तरी १५ मे पर्यंत काम पूर्ण केले जाणार आहे. एकूण खर्च १९.४२ कोटी खर्च येणार आहे. यामध्ये रस्ता मजबूतीकरण, डांबरीकरण, गतीरोधक टाकणे, झेब्रा क्रॉसिंग, दुभाजकांना रंगरंगोटी व ग्रील दुरुस्ती, धोकादायक झाडांना रेडियम लावणे आदींचा समावेश आहे. या मार्गावरील २४ झांडापैकी १५ तोडली जाणार असून नऊ झाडांचे पुनर्र...

नाशिक-दिंडोरी-धुळे २० मे तर नंदुरबार-जळगाव-रावेर १३ मे रोजी मतदान

नवी दिल्ली| लोकसभेची निवडणूक शनिवारी जाहीर झाली. देशातील ५४३ जागांसाठी ७ टप्प्यात मतदान घेतले जाणार आहे, तर महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, दिंडोरी आणि धुळे या तीन मतदार संघासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. तर नंदुरबार, जळगाव आणि रावेरसाठी १३ मे रोजी मतदान घेतले जाणार आहे.  तर ४ जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे. Photo:ECI महाराष्ट्रातील पाच टप्पे पुढील प्रमाणे  ∆ टप्पा पहिला- 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर ∆ टप्पा दुसरा- 26 एप्रिल -  बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली,  नांदेड, परभणी  ∆टप्पा तिसरा- 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग,  कोल्हापूर, हातकणंगले  ∆टप्पा चौथा- 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड ∆टप्पा पाचवा - 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत‌ दिलेली माहि...

मराठा साम्राज्याचे चलन: एक दिवसीय परिसंवाद

नाशिक|छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्यावर अंगात संचारणारी ऊर्जा वेगळीच असते. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन ३५० वर्षांपूर्वी घडविलेला इतिहास आजही प्रेरणादायी आहे. स्वराज्य निर्माण होत असताना, आणखी एक गोष्ट रूप घेऊ लागली होती आणि ती म्हणजे स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणारे चलन. महाराजांनी स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणारे चलन सुरू करणे ही काही साधारण घटना नव्हती. या घटनेचा आणि छत्रपतींच्या शिवराईसह मराठा साम्राज्यातील चलनांवर छत्रपती शिवाजी महाजरांच्या ३५० व्या राज्यभिषेक वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाच्या दर्शनिका विभाग आणि के. टी. एच. एम. महाविद्यालया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठा साम्राज्याचे चलन’ या विषयावर राज्यस्तरीय एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे. ही कार्यशाळा रविवारी, १७ मार्च रोजी गंगापूररोडवरीलके. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या व्हीएलसी सभागृहात होत आहे. ही कार्यशाळा सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे. या कार्यशाळेत चार वक्ते मराठा साम्राज्यातील चलन या विषयावर व्याख्यान देणार आहेत. १)श्री प्रशांत ठोसर, २) श्री पुरुषोत्तम भार्...

राहुल गांधी त्र्यंबकराजाच्या चरणी लीन; अन् परिवाराची वंशावळही बघितली

नाशिक| काँग्रेस नेते राहुल गांधीं यांनी आज त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते रुद्राभिषेक आणि आरती करण्यात आली. याप्रसंगी देवस्थानचे विश्वस्त उपस्थित होते. यावेळी गांधी यांनी परिवाराची वंशावळ ही बघीतली. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी हे नाशिक दौऱ्यावर होते. त्यांनी गुरवारी सायंकाळी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन त्र्यंबकराजाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी देवस्थानचे विश्वस्त कैलास घुले, पुरुषोत्तम कडलग, रुपाली भूतडा, स्वप्निल शेलार आदी उपस्थित होते. यावेळी देवस्थान ट्रस्ट मार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मनोज थेटे यांनी राहुल गांधी यांना वंशावळ दाखविली, त्यात मोतीलाल नेहरु यांनी त्र्यंबकेश्वरला भेट दिल्याचा व गांधी घराण्याचा उल्लेख असल्याचे दाखविले. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, राजाराम पानगव्हाणे, आ. हिरामण खोसकर, संपत सकाळे, कैलास मोरे, किरण भुसारे, रतिश टरले, नितीन जीवने आदी उपस्थित होते. पौरोहित्य मनोज थेटे यांनी केले *

'वन नेशन, वन इलेक्शन' कोविंद समितीचा अहवाल राष्ट्रपतींना सादर

नवी दिल्ली| एकाच वेळी निवडणुका आयोजित करण्याबाबत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन आपला अहवाल सादर केला. हा अहवाल 18,626 पानांचा असून 2 सप्टेंबर 2023 रोजी उच्चस्तरीय समितीची  स्थापना झाल्यापासून हितधारक, तज्ञ यांच्यासोबत केलेले व्यापक विचारमंथन आणि 191 दिवसांच्या संशोधन कार्याचा परिपाक आहे. विविध हितधारकांची मते समजून घेण्यासाठी समितीने व्यापक सल्लामसलत केली.  47 राजकीय पक्षांनी त्यांचा दृष्टीकोन आणि सूचना सादर केल्या, त्यापैकी 32 पक्षांनी एकाच वेळी निवडणुका घेण्याचे समर्थन केले. अनेक राजकीय पक्षांनी या विषयावर उच्च स्तरीय समितीशी व्यापक चर्चा केली. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या सार्वजनिक सूचनेला प्रतिसाद म्हणून , भारतभरातील नागरिकांकडून 21,558 प्रतिसाद प्राप्त झाले. 80 टक्के प्रतिसादकर्त्यांनी एकाच वेळी निवडणुकांना पाठिंबा दर्शवला. भारताचे चार माजी मुख्य न्यायाधीश आणि प्रमुख उच्च न्यायालयांचे बारा माजी मुख्य न्यायाधीश, भारत...

भाजपा सरकारला शेतकऱ्यांबद्दल अनास्था: शरद पवार यांची टीका

चांदवड|द्राक्ष, कांदा, कापूस या शेतमालाला भाव मिळत नाही अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले पाहिजेत अशी भूमिका घेतली पाहिजे. आज शेतकरी संकटात आहे त्याला भाजपाचे सरकार जबाबदार आहे. अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. चांदवड येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. युपीएचे सरकार असताना शेतकऱ्यांची ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करुन शेतकऱ्यांच्या खांद्यावरचे ओझे उतरवले होते. सध्याच्या भाजपा सरकारची शेतकऱ्यांबद्दल अनास्था असल्यामुळे शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला.

शेतकऱ्यांना जीएसटीतून वगळणार, पीक वीमा योजनेची पुनर्रचना करणार: राहुल गांधी

चांदवड|प्रतिनिधी|आपल्यामागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर व रामलीला मैदानावर आंदोलन करत आहेत. हमी भावाचा कायदा करावा ही शेतकऱ्यांची मागणी आहे पण मोदी सरकार त्यांची दखल घेत नाही. मोदी सरकारने २२ अरबपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ केले परंतु शेतकऱ्यांचे एक रुपयाचेही कर्ज माफ केले नाही. ज्यांना शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव नाही, त्यांचे दुःख समजत नाही तो शेतकऱ्यांना मदत काय करणार? असा सवाल उपस्थित करत काँग्रेस सरकारचे व आपले दरवाजे सदैव शेतकरी व सर्वसामान्यांसाठी खुले असतील व इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांना जीएसटीमधून वगळणार, पीक वीमा योजनेची पुनर्रचना करणार असे खासदार राहुल गांधी यांनी सांगितले.  भारत जोडो यात्रेदरम्यान चांदवड येथे शेतकरी मेळाव्याला राहुल गांधी संबोधित करत होते. राहुल गांधी पुढे म्हणाले की, देशात आज शेतकरी समस्या, बेरोजगारी, महागाई, भागिदारी हे मुळे मुद्दे आहेत पण जनतेच्या या मुद्द्यांपासून लक्ष दुसरीकडे वळवले जात आहे. पिक विमा योजनेचा फायदा केवळ कंपन्यांना होतो, शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर त्यांना मदत मिळत नाही हे चित्र बदलण्याची गरज आहे, काँग्रेसचे सरकार आल्यानंत...

गादी बनविण्यासाठी बिबट्यालाच मारले ठार; पाच जण ताब्यात

इगतपुरी|प्रतिनिधी| गादी बनविण्यासाठी बिबट्याची कातडी विक्रीसाठी आलेल्या पाच संशयितांना इगतपुरी पोलिसांनी सापळा रचून रंगे हाथ ताब्यात घेतले. कथित बाबाच्या सांगण्यावरून संशयितांनी बिबट्याला ठार केल्याचा प्रकार समोर आला आहे.  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार घोटी पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळगाव मोर शिवारातील मोराच्या डोंगराच्या पायथ्याची काही संशयित इसम वन्यप्राणी बिबट्याची कातडी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बुधवारी सापळा रचून संशयित नामदेव दामु पिंगळे, वय ३०, रा. पिंपळगाव मोर, ता. इगतपुरी, संतोष सोमा जाखेरे, वय ४०, रा. मोगरे, ता. इगतपुरी, रविंद्र मंगळु आघाण, वय २७, रा. खैरगाव, ता. इगतपुरी, बहिरू उर्फ भाऊसाहेब चिमा बेंडकोळी, वय ५०, रा. पिंपळगाव मोर, वाघ्याची वाडी, ता. इगतपुरी,  बाळु भगवान धोंडगे, वय ३०, रा. धोंडगेवाडी, ता. इगतपुरी यांना ताब्यात घेवुन त्यांच्या कब्जातील गोणपाटातून बिबट्याची कातडी व एक लोखंडी कोयता जप्त केला आहे.  सदरची कातडी ही ...

सामाजिक कार्यकर्ते भास्कर बर्वे यांचा समाज भूषण पुरस्काराने गौरव

नाशिक|इगतपुरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ज्ञान प्रसारक विकास मंडळ, सुगत विहारचे अध्यक्ष भास्कर बर्वे यांना महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित आले. मुंबई येथे एका दिमाखदार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. इगतपुरी शहरातील शैक्षणिक व सामाजिक कार्यात बर्वे यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे, मोफत आरोग्य शिबिर आयोजित करणे, मागासवर्गीयांना मदत करणे. त्यांच्या या समाजकार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. 

मध्य रेल्वे महसूली उत्पन्नात अव्वल

नाशिकरोड|प्रतिनिधी| मध्य रेल्वेने सर्व क्षेत्रिय रेल्वेंमध्ये प्रवासी संख्या आणि भाडे व्यतिरिक्त महसूलामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. मुंबई, नाशिक, जळगाव आदी जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मध्य रेल्वेने कार्यक्षम व्यवस्थापनामुळे उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मध्य रेल्वेने २०२३-२४ या आर्थिक वर्षात (एप्रिल-२०२३ ते फेब्रुवारी- २०२४)    उल्लेखनीय कामगिरी करत १४४९.५३ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली आहे ,  जी मागील वर्षीच्या याच कालावधीतील १३३३.५७ दशलक्षच्या तुलनेत ८.७० टक्क्यांनी वाढली आहे. प्रवासी वाहतूकीतून मध्य रेल्वेला ६७००.८० कोटी रुपये मिळाले, जे मागील वर्षी याच कालावधीतील ५८५५.८१ कोटीच्या तुलनेत १४.४३ टक्के अधिक आहे.    भाडे व्यतिरिक्त महसूलात मध्य रेल्वेने विविध मार्गाने ११०.९९ कोटी उत्पन्न मिळविले. मागील वर्षाच्या याच कालावधीतील ७८.८६ कोटी रुपयांच्या उत्पन्न तुलनेमध्ये हे ४०.७४ टक्के जास्त आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ,  लोकमान्य टिळक टर्मिनस ,  दादर आणि पनवेल स्थानकांवर ५८.९९ लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या आणि बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांच्या करारासह फेब्रु...

धान्य दुकानदार संघटनेचे पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक| प्रतिनिधी| शहरासह जिल्ह्यातील  दुकानदाराच्या विविध मागण्यांबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशनतर्फे निवेदन देण्यात आले. प्रत्येक महिन्याला कमिशन वेळेवर मिळावे मागील भरलेले पैसे परत मिळावे तसेच धान्य मोजून मिळावे इपॉस मशीनला नेटवर्क नसते त्याची व्यवस्था करावी,  तसेच काही तालुक्यामध्ये सुतळीसाठी पैशाची मागणी केली जाते सुतळी शासनाने उपलब्ध करुन दयावी.  काही तालुक्यात दुकानदारांकडून हमालीची मागणी केली जाते, शासननिर्णयानुसार वाहतूक व हमाली मुक्त आहे, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. यावेळी गणपत डोळसे पाटील, निवृत्ती महाराज कापसे, योगेश बत्तासे, फारूक शेख, दिलीप नवले,  चेतन घोलप, अरुणाताई चव्हाण, रमेश मुळे, संतोष सोनवणे व पदाधिकारी उपस्थित होते.

भाषा हेच संवादाचे आणि शिक्षणाचे माध्यम: कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर

नाशिक|प्रतिनिधी|भाषा हे खरं तर संवादाचे आणि शिक्षणाचे माध्यम आहे त्याचा उपयोग बौद्धिक, मानसिक, वाचिक क्षमता वाढविण्यासाठी करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे मा. कुलगुरु निवृत्त लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ’कुसुमाग्रज स्मरण यात्रा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कानिटकर बोलत होत्या. यावेळी त्यांच्या समवेत मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करण्याची माझी मोठी इच्छा आहे आणि सुदैवाने मी कुसुमाग्रजांच्या कर्मभूमीत राहत आहे याचा मला अभिमान वाटतो. आपण मराठी साहित्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. विज्ञान कितीही पुढे गेले तरी समाजाला एकत्र ठेवणारी संस्कृतीच असते असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, प्रत्येक ...

युवकांनी नोकरी सोबतच व्यवसायातही उतरावे: ना. चंद्रकांत पाटील

नाशिकरोड|प्रतिनिधी| देशातील तरुणांच्या हाताला काम मिळावे, असा प्रयत्न दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा होता. त्यासाठी युवकांनी नोकरीच्या बरोबरीने व्यवसायात उतरले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. युवकांचा कौशल्य विकास, त्यांच्या संस्थेसाठी कर्ज आणि संस्थेत निर्माण होणा-या वस्तूला बाजारपेठ असा वाजपेयींचा दृष्टीकोन होता. त्यातूनच १९९८ साली राष्ट्रीय स्तरावर एनवायसीएस संस्था सुरु झाली. या संस्थेला सर्व ती मदत करू, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले. नवी दिल्लीतील नॅशनल युवा को-ऑपरेटीव्ह सोसायटीची (एनवायसीएस) देशातील ३४ वी शाखा जेलरोड येथे सुरु झाली. तिचे उदघाटन केल्यानंतर ते बोलत होते. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रवक्ते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष प्रशांत जाधव,  आमदार राहुल ढिकले, देवयानी फरांदे,  माजी आमदार बाळासाहेब सानप,  नाशिक रोड व्यापारी बॅंकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, व्ही. एन. नाईकचे सरचिटणीस हेमंत धात्रक,  उध्दव निमसे, विजय साने, महेश दाबक, सुनिल आडके, शांताराम घंटे, महाव्यस्थापक  आर. डी. कुलकर्णी, प्रत...