Skip to main content

Posts

Showing posts from December, 2024

केंद्र- राज्य शासनाकडून प्रलंबित प्रश्न मार्गी लावू: आयुक्त मनिषा खत्री

नाशिक| केंद्र शासन व राज्य शासनाकडून प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांबाबत देखील पाठपुरावा करुन ते प्रश्न मार्गी लावणेकामी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर मनिषा खत्री यांनी आज सर्व खातेप्रमुखांची बैठक घेतली. त्याप्रसंगी त्याबोलत होत्या. नाशिक शहराच्या विकासाच्या दृष्टीने सुरु असलेले विविध प्रकल्प सकारात्मक दृष्टया सुरु ठेवणार असल्याचे बैठकीत सांगितले. त्याचबरोबर सर्व विभागांची प्राथमिक माहिती घेवून त्यांनी सर्व विभागांना त्यांच्या कामकाजाबाबत सादरीकरण करण्याचे आदेश दिले.  खातेप्रमुखांनी सर्व कामकाजात पारदर्शकता ठेवावी  व प्रत्यक्ष कामात असलेल्या अडचणींबाबत आपल्याशी थेट संपर्क साधावा असे त्यांनी बैठकीत सांगितले.  शहर स्वच्छतेला आपले प्राधान्य रहाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. आगामी कुंभमेळयांच्या नियोजनाच्या दृष्टीने विभागीय आयुक्त डॉ प्रविण गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या पूर्वीच्या अनुभवानुसार शहर विकासाच्या दृष्टीने नवनविन संकल्पना राबवणार असल्याचेही त्यांनी बैठकीत सांग...

शहरातील या भागाचा शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार

नाशिक| मनपाचे मुकणे धरण रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन येथे  महावितरण कंपनीकडील रेमण्ड सबस्टेशन गोंदे येथे विविध दुरुस्तीची कामे करण्यात येणार असून कंपनीकडून शनिवार दि. २८  डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ५ दरम्यान शट डाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे मनपाचे मुकणे डॅम रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन येथून विल्होळी जलशुध्दीकरण केंद्राला होणारा रॉ वॉटरचा पुरवठा या कालावधीत बंद राहणार आहे. त्यामुळे शहरातील नवीन नाशिक, नाशिक पूर्व व नाशिकरोड भागात सकाळी ९ ते ५ या कालावधीत पाणी पुरवठा बंद राहणार आहे, असे मनपाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मनपाचे मुकणे धरण रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन येथे  महावितरण कंपनीकडील रेमण्ड सबस्टेशन गोंदे येथे एक्सप्रेस फिडरवरुन जॅकवेलसाठी 33 के.व्ही. वीजपुरवठा कार्यान्वित आहे. महावितरण कंपनीच्या रेमण्ड सबस्टेशन येथे दिवसभर दुरूस्तीचे काम होणार आहे. त्यामुळे शनिवार दिनांक दि. २८ डिसेंबर रोजी सकाळी ०९.०० ते  ०५.०० दरम्यान विल्होळी जलशुध्दीकरण केंद्र येथून खालील भागात होणारा पाणीपुरवठा बंद राहील, याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे असे आवाहन मनपा अ...

त्र्यंबकेश्वरला ५ जानेवारीपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद

नाशिक| दिअँकर वृत्तसेवा|  नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी दि. ५ जानेवारीपर्यंत राजशिष्टाचारा व्यतिरिक्त अन्य व्हीआयपी दर्शन सेवा बंद राहणार आहे, अशी माहिती त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कर्डक यांनी दिली आहे. ट्रस्टचे चेअरमन यांनी दिलेल्या निवेदनाची माहिती कर्डक यांनी दिली.  त्र्यंबकेश्वर हे अत्यंत महत्वाचे ज्योर्तिलिंग असल्यामुळे येथे भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी असते. निरनिराळ्या माध्यमातून मंदिरात होणाऱ्या गर्दीमुळे, प्रशासनावर मोठा ताण असतो. तसेच निर्माण होणाऱ्या अडचणी व प्रश्न याचा विचार करता नाताळ व  नवर्षाच्या सुट्ट्यांच्या अनुषंगाने श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी केंद्रीय- राज्य स्तरावरून अथवा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्राप्त होणाऱ्या राज् शिष्टाचार संबंधी लेखी पत्रव्यवहारा व्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारचे व्हिआयपी दर्शन दिनांक २२ डिसेंबरपासून दि. ५ जानेवारी २०२५ पर्यंत बंद राहणार आहे.  त्याचप्रमाणे ...

मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

कुणाला कोणते खाते मिळाले ते वाचा  मुंबई| दिअँकर वृत्तसेवा| राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज जाहीर झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाकडे गृह विभाग कायम असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे  अर्थ खाते देण्यात आले. तर उपमुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदे यांना नगर विकास, गृह निर्माण खात्याची जबाबदारी मिळाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे  यांना महसूल तर राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंधारण (गोदावरी व कृष्णा खोरे विकास) खाते मिळाले आहे. तसेच इतर मंत्रिमंडळ खातेवाटप पुढीलप्रमाणे आहे. हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री गिरीश महाजन - जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा गणेश नाईक - वन दादाजी भुसे - शालेय शिक्षण संजय राठोड - माती व पाणी परीक्षण धनंजय मुंडे - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंगलप्रभात लोढा कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा जयकुमार रावल - विपणन, प्रोटोकॉल पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन अतुल सावे...

ईव्हीएम हद्दपार करा, बॅलेट पेपरवर मतदान घ्या! या मागणीसाठी महानुभाव परिषद-वारकरी पंथाचा मोर्चा

नाशिक| दिअँकर वृत्तसेवा|ईव्हीएम मशीन हद्दपार करून बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे या मागणीसाठी शुक्रवारी अखिल भारतीय महानुभव परिषद आणि अखिल भारतीय वारकरी पंथ यांच्यातर्फे गोल्फ क्लब ते जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.  त्यानंतर महंत श्रीकृष्ण राजबाबा मराठे आणि ह भ प जनार्दन बळीराम कांदे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले."मत आमचा अधिकार आहे, तर त्याचा हिशोब मागने हा सुद्धा आमचा अधिकार आहे.." "इव्हीएम मशीन हटवा, लोकशाही वाचवा.."  "ईव्हीएम मशीन हटाव".. "बॅलेट पेपर लाओ, लोकतंत्र बचाव".. अशा वेगवेगळ्या नावाचे फलक हातात घेऊन बहुसंख्य नागरिकांनी मोर्चामध्ये सहभागी झाले.  नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल बघता सामान्य जनतेच्या ईव्हीएम वरील विश्वास आता पूर्णपणे उडाला आहे. सर्वच निकाल हे संशयास्पद असून राज्यांमध्ये एक प्रकारे जो आनंदाचे वातावरण होते. ते वातावरण आता दिसून येत नाहीये राज्यात, देशांमध्ये लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर बॅलेट पेपर वरतीच निवडणूक घेतली पाहिजे असे मत नाशिक जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक...

कै. बबनराव निगळ यांचा शनिवार २१ डिसेंबर रोजी दशक्रिया विधी

नाशिक|सातपूर येथील बबनराव काळूजी निगळ यांचं वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७८ वर्षाचे होते त्यांच्या मागे पत्नी, भाऊ, मुलगा, मुली, नातवंडे असा परिवार आहे. ह.भ.प. निवृती महाराज कापसे यांचे ते सासरे होते. त्यांचा दशक्रिया विधी शनिवार दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८:३० वाजता येथील पपया नर्सरीजवळील सौभाग्य लॉन्स येथे होणार आहे, असे समस्त निगळ परिवार, सातपूर, नाशिक यांनी कळविले आहे.  तसेच दि.१३ डिसेंबरपासून ह.भ.प. आण्णासाहेब महाराज आहेर (हिसवळकर) याचे रोज दुपारी २ ते ३ वा. गरुड पुराण व दशक्रिया विधीच्या दिवशी प्रवचन होईल असे सांगण्यात आले आहे.

श्री कपालेश्वर मंदिर मूल्यांकनाचे काम पूर्ण; ४.७३ लाखाच्या वस्तू

नाशिक|दिअँकर वृत्तसेवा|संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर येथे भाविकांनी केलेल्या धातूच्या वस्तूंचे मूल्यांकन  नुकतेच करण्यात आले त्याबाबतचा अहवाल प्राप्त झाला असून, संस्थानकडे सोन्याच्या वस्तूंचे मूल्यांकन ९८ हजार ८०० रू. तर चांदीच्या वस्तू मूल्यांकन ३ लाख ७२ हजार २१५ इतके आले आहे.  संस्थानचे अधिकृत मूल्यांकनकर्ता चेतन राजापुरकर यांच्यामार्फत करण्यात आले.  राजापुरकर यांनी कपालेश्वर चरणी मानद सेवा दिली. नवीन विश्वस्त मंडळ अस्तित्वात आल्यापासून संस्थानने भाविकांसाठी पारदर्शक कारभार करण्याकडे भर दिलेला आहे. श्रीकपालेश्वर मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदा भाविकांनी दिलेल्या वस्तूंचे मूल्यांकन झाल्याने संस्थानच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. मूल्यांकन करताना  संस्थानचे अध्यक्ष ॲड. अक्षय कलंत्री, खजिनदार सी.ए. श्रीकांत राठी, विश्वस्त मंडलेश्वर काळे, श्रद्धा दुसाने (कोतवाल), रावसाहेब कोशिरे आदी उपस्थित होते. वैशिष्ट्ये पूर्ण दागिन्यांचा समावेश श्री कपालेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट यांच्या ताब्यातील सोने व चांदी दागिन्यांचे मूल्यांकनाचे काम कॅमेऱ्याच्या...

हृदय रुग्णांना मुंबईला जाण्याची गरज नाही, नाशकात उपचार होणार: डॉ. चिन्मय कुलकर्णी

नाशिक रोड | शास्त्रज्ञ डॉ. अलन किबर यांच्या संशोधनातून  शस्त्रक्रिया न करता हृदयाच्या झडपा रोपण करण्याच्या नवीन संशोधनामुळे अनेक रुग्णांना फायदा झाला आहे. आता ही सुविधा नाशिक येथेही उपलब्ध आहे असल्याने रुग्णांना मुंबई ,  पुण्याला जाण्याची गरज नाही, असे प्रतिपादन     हृदयरोग  तज्ञ डॉ. चिन्मय कुलकर्णी यांनी केले . नाशिक रोड येथे     मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे निरंतर शैक्षणिक कार्यशाळा झाली. त्या   प्रसंगी हृदयरोगातील झडपांशी संबंधित उपचारांविषयी ते बोलत होते. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रकाश पुंड , निमाच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा वाघ ,   सचिव डॉ. संगीत लोंढे यांच्याहस्ते धन्वंतरी पूजन झाले.    डॉ. अनघा चव्हाण, डॉ. सुनयना भुजबळ ,   डॉ. समीर लासुरे ,  डॉ. अशोक निरगुडे ,  डॉ. दिनकर  लोहट ,  डॉ. लियाकत नामोले ,  डॉ. संतोष धात्रक ,  डॉ. सुरेश आहेर ,   डॉ. वंदना  आहेर ,  डॉ. कुलकर्णी ,  डॉ. उत्तमकुमार जोशी ,  डॉ. उमेश   नगरकर ,   डॉ. योगेश घोटेकर ,   डॉ. पद्म...

महापरिनिर्वाण दिनासाठी अमरावती- मुंबई अनारक्षित गाडी

नाशिक| प्रतिनिधी| भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईला जाणा-या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे अमरावती-मुंबई अनारक्षित विशेष गाडी  चालविणार आहे. ही विशेष गाडी (क्र. ०१२१८) ५ डिसेंबरला अमरावती येथून १७.४५ वाजता सुटेल आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुस-या दिवशी ०५. २५ वाजता  पोहोचेल.  मुंबई-अमरावती विशेष गाडी (१२१७) ७ डिसेंबरला मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००:४०  वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी १२.५०  वाजता पोहोचेल. बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, दादर, मुंबई येथे ती थांबेल. गाडीला १४ सामान्य व्दितीय श्रेणीचे डबे आहेत. रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने या आधीच मुंबई-नागपूर विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचे जाहीर केले आहे.

देवाभाऊ रिटर्न्स!

 देवाभाऊ रिटर्न्स! लोकसभेला महाविकास आघाडीची हवा होती, विधानसभेत ही आपलीच सत्ता येईल असा विश्वास त्यांना होता, मात्र चार महिन्यात वारे फिरले आणि महायुतीने काँग्रस प्रणित आघाडीचा सुपडा साफ करून महाराष्ट्राची सत्ता राखली. भाजपने १३२ जागा जिंकून युतीतील सर्वात मोठा पक्ष म्हणून मुख्यमंत्री पदावर दावा मजबूत केला. २०१९ विधानसभा निवडणूकीत १०५ जागा आणि सर्वाधिक ३७ टक्के मते भाजपाला होती, यंदा १३२ जागा मिळाल्या असल्या तरी वोटिंग परसेंटटेज २६ टक्क्यांवर घसरले तरी यंदा एवढे मोठे यश मिळाले हे महत्वाचे आहे. निवडणुकी आधी भाजपने युतीतील आपल्या सहकारी पक्षांना सर्वात जास्त ज्याच्या जागा त्यांचा मुख्यमंत्री होईल हे स्पष्ट केलेले होते. त्यामुळे भाजपने त्यादृष्टीने रणनीती आखली अन् ती यशस्वी करुन दाखवली. त्यासाठी लोकसभेतील प्रचारात सहभागी न झालेल्या संघाची मनधरणी केली. त्याचा परिणाम निवडणुकीत बघायला मिळाला. लाडकी बहिण आणि एक हैं तो सेफ हैं या घोषणांचा भाजपने खुबीने वापर करून धुळे येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदाची इच्छा पूर्ण करण्यासाठी महायुतीला विजयी करण्...