जगात एक महत्वाची घटना घडली आहे, आपल्याकडे याविषयी फारशी चर्चा नसली तरी जगभरातील पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांनी मात्र लक्ष वेधले आहे. भारतापासून हजारो कि.मी दूर आफ्रिका खंड आणि अटलांटिक महासागराच्या पलीकडे दक्षिण अमेरिकी प्रदेशात ॲमेझॉन उष्णकटीबंधीय वर्षावन आहे. त्याचे क्षेत्रफळ 5,500,000 कि.मी. इतके आहे. ॲमेझॉनचा सर्वात मोठा भाग ब्राझीलमध्ये असून एकूण वनक्षेत्र 60% आहे, त्यानंतर पेरू 13%, कोलंबिया 10% तसेच इक्वाडोर, वेनेझुएला, बोलेविया, गयाना, फ्रेंच गयाना, सूरीनाम आदी भाग जंगलांनी व्यापलेला आहे. ब्राझील येथील जंगलं सतत तीन आठोडयापासून जळत आहे. जागतिक पर्यावरण संतुलन राखण्याच्या दृष्टीने ती वनसंपदा महत्वाची आहे. Image sourse google | image by copro de bomberos de mato grass via AP/ buzzfeednews.com) सातत्याने जळणाऱ्या जंगलामुळे मोठया प्रमाणात कार्बनचे उत्सर्जन होऊन पर्यावरणावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता पर्यावरणवादी संघटनांनी व्यक्त केली. छोट्या पातळीवर आग नेहमीच लागते मात्र यंदाची आग मोठी आ...