Skip to main content

Posts

Showing posts from January, 2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जाती अंताची चळवळ बळकट करण्यासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज : रवी मानव

देशवंडी (सिन्नर)| प्रतिनिधी| सामाजिक तथा आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते प्रवीण कर्डक (देशवंडी) यांनी त्यांच्या मातोश्री कलाकथित विमल रतन कर्डक यांच्या शोक सभेच्या निमित्ताने कुठलही धार्मिक कर्मकांड, अंध श्रद्धा, दुखवटा यास फाटा देत आपण आपला सामाजिक बांधिकली व जबाबदारीचा वसा आणखी कसा पुढे नेऊ शकतो याचा विचार करून परिवर्तनवादी विचारवंत अमरावती येथील प्रसिद्ध व्याख्याते रवी मानव यांच्या व्याख्यानाचे आयोजन करून खऱ्या अर्थाने समाज प्रबोधन अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद निर्मूलन  या विषयी मार्गदर्शन केले. द्वेष उच्च नीच, हेवे दावे याला मूठमाती देऊन सुशिक्षित सुज्ञ जबाबदार, कर्तव्यदक्ष समाज कसा निर्माण करता येईल यासाठी काय केले पाहिजे या विषयी रवी मानव यांनी संत गाडगेबाबा छ. शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, शाहू महाराज डॉ आंबेडकर यांचे दाखले देत प्रकाश टाकला. शिक्षणच्या अभावामुळे व अज्ञानामुळे लोकांच कसे शोषण केलं जातं ते अंधश्रद्धेला बळी पडतात, कर्मकांडाच्या भूत प्रेताच्या मागे लागून आणखीन भरकटतात. त्यासाठी आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे म्हणून सर्वांनी सुशिक्षित होऊन कर...

युवकांच्या सामर्थ्यावर देशाची आर्थिक महासत्तेकडे वाटचाल: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नाशिक| भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत काळातील आजची तरुण पिढी नशीबवान आहे. या पिढीला वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. या पिढीला सामर्थ्यवान आणि कौशल्याधारित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या युवकांच्या सामर्थ्यावरच भारताची जगातील आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल सुरू आहे. अमृत काळातील पुढील २५ वर्षांच्या कालावधीत परिश्रम घेत तरुणांनी २०४७ पर्यंत विकसित भारत घडवित इतिहास निर्माण करावा, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा विभाग व राज्य शासनातर्फे नाशिक येथे आजपासून सुरू झालेल्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उदघाटन प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते तपोवन मैदानावर झाले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय माहिती व प्रसारण, युवक कल्याण व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा म...

रेल्वे कर्मचाऱ्यांचे पेन्शनसाठी आंदोलन

नाशिकरोड|प्रतिनिधी| सरकारी कर्मचा-यांना जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे नाशिकरोड रेल्वेस्थानकात चार दिवस आंदोलन करण्यात आले. रेल्वे अधिकारी कुंदन महापात्रा, कर्मचारी सहदेव सोनवणे, कुणाल खरे, अजय डिंगिया, अमोल ठोंबरे, मुकुंद शिंदे, रामकृष्ण चितणार आदी सहभागी झाले होते. रेल्वे स्थानकातील कुलीदेखील या आंदोलनात सहभागी झाले होते. नॅशनल रेल्वे मजदूर यूनियनचे महामंत्री वेणू नायर यांच्या नेतृत्वाखाली देशभरात विविध रेल्वे स्थानकांमध्ये चार दिवस आंदोलन करण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

गोदातिरी रेखाटलेले रामायणातील प्रसंग वेधताय सर्वांचे लक्ष

नाशिक| प्रतिनिधी| गोदातीर विद्युत रोषणाईने उजळला असून ठिकठिकाणी रामायणातील प्रसंगाचे सुंदर रेखाटन करण्यात आले आहे. त्यासाठी २०० चित्रकार, कलाकार ४८ तास राबत होते. त्यामुळे गोदातिरी जणू प्रभूश्रीराम - सीतामाता आणि लक्ष्मण साक्षात अवतरल्याची भावना भाविकांमध्ये होती, सध्या सजलेला गोदाघाट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये आहे. त्याचा नाशिकमध्ये रोडशो झाला. त्याअनुषंगाने नाशिक मधील गोदाघाट आणि तपोवन परिसराची रंगरंगोटी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी रामायणातील प्रसंग रेखाटण्यात आले आहे. २०० चित्रकार,कलाकार ४८ तास राबत होते रामायण आणि महाभारत पंचवटीत काट्या मारुती मंदिर,नागचौक,काळाराम मंदिर रामकुंड, तपोवन येथे अवतरले आहे. योगेश कमोद यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो निमित्ताने शहर सजावट करण्यासाठी मनपा आयुक्त डॉ.अशोक करंजकर  यांनी निवड केली. या ठिकाणी नाशिककरांनी एकदा तरी भेट द्यावी  Photo: nmc pro