Skip to main content

Posts

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...
Recent posts

धैर्यवान, विक्रमवीर सुनीता विल्यम्स!

धैर्यवान, विक्रमवीर सुनीता विल्यम्स  अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ९ महिने अंतराळात राहिल्यावर पृथ्वीवर परतले. १७ तासांचा परतीचा प्रवास हा नासा आणि स्पेसएक्ससाठी जितका आव्हानात्मक होता, इतकाच तो क्रू -९ अंतराळवीरांची परीक्षा बघणारा ठरला. ८ दिवसासाठी अंतराळात गेलेले विल्यम्स आणि विल्मोर स्टारलाईंनर यानातील निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ९ महिने अंतराळात अडकून राहिले. अखेर स्पेसएक्स आणि नासाच्या एकत्रित प्रयत्नाने विल्यम्स आणि विल्मोर यांना बुधवारी पृथ्वीवर सुरक्षित आणले आणि नासासह संपूर्ण जगाने सुटकेचा निःश्वास सोडला. नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर, निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हे चौघे पृथ्वीवर सुरक्षित पोहचले. स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानाच्या मदतीने बुधवारी  दि. १९ मार्च रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे ३: ३० वाजता फ्लोरिडातील टलाहासीच्या किनाऱ्याजवळील पाण्यात यान यशस्वीपणे उतरले. या बहुप्रतिक्षित, यशस्वी पुनरागमनाची वाट नासा आणि जगभरातील लोक उत्सुकतेने पाहत होते. १७ तासांच्या प्रवासानंतर ते पृथ्वीवर दाखल झाले. प्रवास वाटतो इतका...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

शिवजन्मोत्सव समिती शहराध्यक्षपदी पुरुषोत्तम कडलग

त्र्यंबकश्वर|प्रतिनिधी| दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दिव्य शिवजयंती साजरी करण्याच्या उद्देशाने त्र्यंबकेश्वर शिवजन्मोत्सव समितीच्या कार्यकारणीची बैठक नुकतीच झाली. याबैठकीत समितीच्या शहराध्यक्षपदी पुरुषोत्तम कडलग यांची तर तालुकाध्यक्षपदी मनोहर महाले यांची एकमताने निवड घोषीत करण्यात आली.  येथील सुखसागर हॉटेल येथे शनिवारी समितीची बैठक पार पडली. २०२५ छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीची बैठक पुरुषोत्तम कडलग यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थिती झाली. यामध्ये शिवजयंती साजरी करण्याबाबत उहापोह करण्यात आला. त्यात विविध सामाजिक, प्रबोधनात्मक उपक्रमाविषयी चर्चा झाली. शिवजयंती दरम्यान शिवरायांचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी शोभायात्रा काढून यादरम्यान ध्वज पथक, युवा जल्लोष ढोल पथक, भजनी मंडळासह विविध प्रात्यक्षिक पथके, शिवकालीन देखावे तथा सजावटी आदी रूपरेषा मान्यवरांच्या उपस्थितीत ठरवण्यात आली.  तसेच नवीन कार्यकारिणी घोषित केली यामध्ये तालुकाध्यक्ष मनोहर महाले, कार्याध्यक्ष विजय वायकंडे, उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, खजिनदार रवी अण्णा वारुंसे, शहराध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, कार्याध्यक्ष परशुराम पवार, उपाध...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

डीपसीक'एआयचे आव्हान!

'डीपसीक'एआयचे आव्हान! चीनची एआय स्टार्टअप डीपसीकने आरवन (R1) मॉडेल तयार करून टेक कंपन्यांची झोप उडविली आहे. चीनी अभियंते लिआंग वेनफेंग यांनी फक्त ६ मिलियन डॉलरमध्ये ॲप बनविले आहे. कमी खर्चात तयार केलेल्या या चाटबॉटने टेक मार्केट क्षेत्रात खळबळ उडवून दिली. या एआय बॉटने थेट पाश्चिमात्य टेक जायंट कंपन्यांना आव्हान दिले. त्यामुळे २७ जानेवारी रोजी अमेरिकन शेअर बाजार घसरला.  एनविडीया (Nvidia) या एआय कंपनीचे मार्केट व्हॅल्यू ६०० मिलियन डॉलरने घसरले. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे मार्केट पडले. अमेरिकन राष्ट्रपती ट्रम्प यांनीही दखल घेत अमेरिकन टेक कंपन्यांसाठी हा वेकअप कॉल असल्याचे सांगितले. त्यामुळे या कंपन्या खडबडून जाग्या झाल्या आहेत. एनविडियाचे मार्केट व्हॅल्यू ३.५ ट्रिलियन वरुन ते २.९ ट्रिलियन डॉलर इतके घसरले. मायक्रोसॉफ्ट, गूगल यांनाही आर्थिक फटका बसला. त्यामुळे चीन आणि अमेरिकेत टेक स्पर्धा आणखी वाढणार यात शंका नाही. २०२२ पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीचे वारे जगात पसरले. त्यामुळे डेटाचे विश्लेषण आणि मशीन लर्निगद्वारे हव्या त्या माहितीचे दालन वापरकर्त्यांना खुले झा...