Skip to main content

Posts

Showing posts from July, 2024

घोटी टोलनाक्यावर रायुका शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

नाशिक| नाशिक-मुंबई महामार्गावर कसारा ते पिंपळगाव बसवंत या दरम्यान रस्त्याची  दुरावस्था झाली आहे, महामार्गावर ठिकठीकाणी मोठ-मोठे खड्डे झाले असून या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोटी टोलनाक्यावर आंदोलन केले. यावेळी घोषणा बाजी करुन कार्यकर्त्यांनी रस्ता दुरुस्ती होईपर्यंत वाहनांकडून टोल वसूली करू नये अशी मागणी केली, तसेच राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले.   निवेदनात म्हटले की, घोटी टोलनाक्या अंतर्गत असलेल्या कसारा ते पिंपळगाव बसवंत या मार्गावर मोठे- मोठे खड्डे झाले असून नाशिक ते मुंबई हा प्रवास ७-८ तासांवर जाऊन पोहचला आहे, तसेच महामार्गाचे जे काम चालू आहे ते निकृष्टदर्जाचे आहे. जो पर्यंत महामार्गाची दुरुस्ती होत नाही व महामार्गाचे कामपूर्ण होत नाही तोपर्यंत घोटी टोलनाक्यावरुन सर्व वाहनांना टोलमुक्ती देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी घोषणाबाजी करून वाहनांना टोल न आकारता सोडण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँगेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या नेतृत्वात, जिल्हाध्यक्ष...

प्रेस कामगारांच्या 50 वारसांना मिळाली नोकरी

नाशिकरोड| आयएसपी- सीएनपी प्रेसमधील मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांच्या फाईल मंजुरीसाठी प्रेस महामंडळाच्या दिल्लीतील मुख्यालयात पाठविण्यात आल्या होत्या. प्रेसमध्ये सेवेत घेण्याची ऑर्डर निघण्याची प्रतिक्षा दोन्ही प्रेसमधील कामगार बांधवांना आणि वारसांना होती. आज ही प्रतिक्षा संपून ५० वारसांना ऑर्डर मिळाल्या. त्यामुळे प्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आयएसपी-सीएनपीमधील ५० वारसांना नोकरीवर घेण्यास परवानगी देणा-या ऑर्डर प्रेस महामंडळाच्या संयुक्त महाव्यवस्थापक अभिषेक श्रीवास्तव यांच्या सहीने आज सायंकाळी आयएसपी मजूर संघाला मिळाल्या. त्यानंतर मयत कामगारांच्या वारसांनी, दोन्ही प्रेसमधील कामगारांनी मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, कामगार पॅनलचे राजू जगताप, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, खजीनदार अशोक पेखळे, सहसचिव अविनाश देवरूखकर, संतोष कटाळे आदींचे आभार मानले. या वेळी आनंदोत्सव साजरा करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. आयएसपीमध्ये २६ व सीएनपीमध्ये २४ मयत कामगारांचे वारस आयएसपी-सीएनपीमधील नोकरीवर रुजू करण्याची आवश्यक वैद्यकीय व अन्य का...

गुरुपौर्णिमानिम्मित 21 जुलैला ग्लोबल विपश्यना पॅगोडा बोरिवली येथे एक दिवसीय मेगा शिबीर

नाशिक| रविवार दि. 21 जुलै 2024 रोजी गुरुपौर्णिमानिमित्त ग्लोबल पॅगोडा (बोरिवली) येथे एक दिवशीय मेगा शिबीर आयोजित केले असून नाशिक येथून AC बस सेवा कार्यरत असून प्रति सीट मात्र 615 रुपये आहे. ज्या कोणी साधकांना बस सेवेसाठी तिकीट बुकिंग करायची आहे, त्यांनी 17 जुलैपर्यंत खालील धम्मसेवकांना कॉल करून  तिकीट बुक करू शकता तसेच ऑनलाईन पद्धतीने पण बुक करू शकता. बस बद्दल काही नियम तसेच सुविधा 1) ज्या साधकांचं कमीत कमी एक 10 दिवसीय शिबीर झाले आहे, त्या लोकांनाच शिबीरामध्ये सहभागी होता येईल.  2)AC बसचे तिकीट 615 रु. असून यात साधकला सकाळचा नास्ता दुपारचे जेवण तसेच रात्रीचे जेवण मिळेल. 3) बस  ही सकाळी 4 वाजता सुटेल. 4)बसचे स्टॉप पुढीलप्रमाणे - शिवाजीनगर(जेलरॊड), बिटको पॉईंट, अंधशाला स्टॉप, उपनगर, आंबेडकरनगर, द्वारका, मुंबई नाका, पाथर्डीफाटा, इगतपुरी या ठिकाणावरून साधक बसमध्ये बसू शकता. आपण लवकरात लवकर आप ली शीट बुक करावी ही विनंती... तसेच जास्तीत जास्त लोकांना याची माहिती देऊन आपली पारमी वाढवू शकता... खालील धम्मसेवकांना आपण कॉल करून आपली तिकीट बुक करा... सुभाष राऊत -9022708118 भूषण उगले...

कमिशन वाढ, ईपॉस मशीच्या अडचणी दूर करू: फेडरेशनच्या शिष्टमंडळाला उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई| महाराष्ट्रातील रेशनिंग दुकानदाराच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात फेडरेशनच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री, पुरवठा मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी दुकानदारांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ करावी आणि धान्य वितरणात ईपॉस मशिनमध्ये येणाऱ्या अडचणी दूरकरण्याविषयी मुंबईत चर्चा झाली. दुकानदारांच्या मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले, अशी माहीती महाराष्ट्र शॉप किपर्स फेडरेशनचे अध्यक्ष गणपतराव डोळसे पाटील यांनी दिली. रेशनिंग धान्य दुकानदार प्रश्नांबाबत दोन दिवस महाराष्ट्र फेडरेशनच्या शिष्टमंडळाने पाठपुरावा केला. बुधवारी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री अजितदादा पवार, पुरवठा मंत्री  छगनराव भुजबळ, विधानसभा उपाध्यक्षा नरहरी झिरवाळ यांची मुंबईत भेट घेतली. यादरम्यान २०१७ ते २०२४ असा गेल्या सहा, सात वर्षापासून कमिशनमध्ये वाढ केलेली नसल्याचे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. कमीशन वाढ लवकर करण्यात यावी, ईपॉस मशीन वारंवार बंद पडणे, मशीनचे सिमकार्ड काम करत नाही, कॅश मेमो लवकर निघत नाही, नेटवर्क मिळत नाही या सर्व अडचणी तात्काळ ...

शनिवारी शहराला पाणीपूरवठा नाही; मनपातर्फे जलवाहिन्या दुरुस्तीचे काम हाती

नाशिक| मनपाच्या सार्वजनिक आरोग्य व पाणीपुरवठा विभागातर्फे  मुख्य जलवाहिन्याच्या देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली असून शहरातील पाणी पूरवठा शनिवारी दि. १३ जुलै रोजी पूर्ण दिवस आणि रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. File:photo विभागातील विविध ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या तसेच उप वितरण वाहिन्यांची दुरुस्ती तसेच व्हॉलची दुरुस्ती, व्हॉल बदलणे आदी देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे, तसेच गंगापूर धरण पंपीग स्टेशन येथील सिव्च यार्ड चेंज ओव्हर स्ट्रक्ररची कामे केली जाणार आहे.   पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी दुरूस्तीचे कामे हाती घेणे आवश्यक आहे. त्यामुळे गंगापूर धरण पंपिंग स्टेशन व मुकणे पंपिंग स्टेशन येथील पंपिंग बंद ठेवावे लागणार आहे, त्यामुळे संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा शनिवार दि. १३ जुलै रोजी सकाळी ९.००  वाजेपासुन पूर्ण दिवस होऊ शकणार नाही. तसेच रविवार दि. १४ रोजी सकाळचा संपूर्ण नाशिक मनपा क्षेत्रातील पाणी कमी दाबाने होईल, याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करा...

संस्कृत भाषेमुळे विद्यार्थ्यांना भविष्यात चांगल्या संधी

नाशिक| भविष्यात संस्कृत भाषेमुळे विद्यार्थ्यांना अनेक चांगल्या संधी निर्माण होतील असा सूर संस्कृत विषयात गुणवंत विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण समारंभात उमटला. सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचालित, विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्रजी शाळेत इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या प्रत्येक तुकडीतील संस्कृत विषयात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या अशा एकूण २७ विद्यार्थ्यांना शंकराचार्य न्यास संकुल, नाशिक यांच्यातर्फे सन्मानपत्र व रोख रक्कमेचा धनादेश असे पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शंकराचार्य न्यास संकुल, नाशिकचे विश्वस्त ॲड. मनीष चिंधडे सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी संस्कृत भाषेचे महत्व तसेच संस्कृत भाषेत भविष्यात उपलब्ध असलेल्या संधी विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक चे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या अध्यक्षा आसावरी धर्माधिकारी, मुख्याध्यापक राजन चेट्टियार, पर्यवेक्षिका प्रियंका भट यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्...

आदिवासी शाळांना शालेय, क्रीडा साहित्य वाटप

नाशिकरोड| पहिलं पाऊल नाशिक व   मुंबईतील   अथेना ग्लोबल लॉजिस्टिक्सच्या कर्मचा-यांनी दरवर्षी प्रमाणे   प्रोजेक्ट स्टेशनरी उपक्रम राबवविला. त्र्यंबकेश्वर येथील कळमुस्ते,   जावळ्याचीवाडी ,   दुगारवाडी ,   हर्षेवाडी ,  जांभूळवाडी ,  उभ्रांडे   या   आदिवासी पाड्यांवर पहिली ते पाचवीच्या सहा शाळांमधील १६० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना वर्षेभराच्या वही ,  पेन्सिल ,  कंपास व चित्रकलेचे साहित्य तसेच प्रत्येक शाळेस क्रिकेटचा सेट ,  फुट  बॉ ल ,  व्हॉली बॉल  व नेट ,  बॅडमिंटन रॅकेट ,  स्किपिंग रोप देखील देण्यात आले.   अथेना कंपनीचे प्रमोद सकट ,  संजय सिंग ,  गिरिष ठक्कर ,   अलका सारंग ,  निश्मन विसपुते ,  अखिल म्हात्रे ,  पेठराज मेहता ,  अस्मिता    सारंग ,  गोविंदभाई चंदे,   विश्वनाथ मालाणी ,  अतुल मालाणी ,   योगेश कुलकर्णी ,  राजू कटारे ,   युगश्री राजवाडकर आदी उपस्थित ह...