समाज कल्याण कर्मचाऱ्यांकडून माणूसकीचे दर्शन; कोरोनामुळे निधन झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटूंबास १ लाखांची मदत
नाशिक| कोरोनामुळे आकस्मिक निधन झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटूंबाच्या पाठीमागे उभे राहून माणूसकी कुठेतरी जिवंत असल्याचं उदाहरण समाज कल्याण कर्मचाऱ्यांनी समाजापुढे ठेवले आहे. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नंदुरबार कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक जितेंद्र साळुंखे (वय 47) यांचे 5 एप्रिल रोजी कोरोनामुळे निधन झाले. घरातील कर्ता पुरूष अचानक सोडून गेल्यामुळे त्यांच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. तेव्हा या कुटूंबाच्या पाठीमागे उभे राहत समाज कल्याण कर्मचाऱ्यांनी त्यांना मानसिक आधार तर दिला ; परंतु 1 लाखांचा निधी तात्काळ जमा करून कुटूंबाच्या स्वाधीन केला. जितेंद्र साळुंखे यांचं संपूर्ण कुटूंब कोरोना पॉझिटिव्ह होते. आई, पत्नी , मुलगा व स्वत:जितेंद्र साळुंखे यांच्यावर धुळे येथे उपचार सुरू होते. या उपचारात त्यांची आई बरी होऊन घरीच विलीगीकरणात राहत होती. उपचार सुरू असतांना जितेंद्र यांचा मृत्यु झाला. मुलाच्या मृत्युचा धक्का सहन न झाल्यामुळे त्यांच्या आईचा मृत्यु झाला. मुलगा व पत्नीं यांचे उपचार चालू असल्यामुळै त्यांना जितेंद्र यांच्या मृत्युची कल्पना देण्यात आली नाही. मुलगा व पत...