Skip to main content

Posts

Showing posts from October, 2019

दोस्त असावा तर असा

राजे तुमचा मान अबाधीत आहे. तुम्ही फडणवीसांप्रतिच्या मैत्रीला जसे जागलात तशीच मैत्री श्रीनिवास पाटील यांनी पवारांप्रति निभावली. मात्र पवार लोकभावाना ओळखणारे जाणतेराजे ठरले. तुमचा रोखठोक बाणा आहे, कदाचित तुम्ही फारसे राजकारण करत नसाल परंतु तुम्ही ज्या पक्षाकडून उभे होता त्यापक्षा विरुद्ध असलेली जनभावना ओळखू शकले नाहीत. असो राजे तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या आणि तुमच्या मित्रत्वाबद्दल जाहिरपणे बोललात तुम्ही तुमची मैत्री जपली वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. I Imege source- google | image by manoramonline.com हारजीत होत असतात, सत्ता येतजात राहते. परंतु माणसाने कायम जमिनीशी नाळ जोडून ठेवायला हवी, हे पवार यांच्या देहबोलीतून समस्त देशवासियांना नेहमीच दिसलेलं. साताऱ्यातून तुमच्या विरुद्ध कोणीच राष्ट्र्वादीकडून उभे राहण्यास तयार नसताना अडचणीच्या काळात पवारांच्या हाकेला श्रीनिवास पाटील धावले. 30 ते 35 वर्षाचा प्रशासकीय अनुभव, दोनदा खासदार, एकदा राज्यपाल अशी पदे भूषविलेले पाटील आरामात आपले जीवन जगू शकले असते पण पवारांच्या मैत्रीच्या हाकेला जागले. 60 वर्षाच्या मैत्रीत उन, वारा, पाऊस संगच ...

भारतातील पहिले हॅप्पी व्हिलेज 'कावलगाव'

भारत हा कृषी प्रधान देश आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. खेडी समृद्ध करण्यासाठी महात्मा गांधी नेहमी खेडयांकडे चला असे सांगत.  2000 वर्षापूर्वी भारत देश हा अध्यात्माचा  विश्वगुरू होता. संपन्न आणि आनंदी देश म्हणून ओळखला जायचा, सद्या आनंदी देशाच्या यादीत भारताचे नाव घसरले आहे. आनंदी गाव  म्हटले की लोकांना नवल वाटतं, ते साहजिक आहे कारण 2000 वर्षापूर्वी विपश्यना विद्या सर्वत्र पसरलेली होती, गावाची चावडी  असो का पाणवठा सर्वत्र विपश्यनेची एकच चर्चा होत असे, विपश्यना  साधनेद्वारे सर्वत्र शांती, एकता, अखंडता, बंधूता जोपासून गावागावात सुख, समृद्धी आनंद नांदत होतं. आता तसे चित्र दिसत नाही.              आनंदी गाव प्रकल्प कशासाठी? लोक अंधारातून प्रकाशाकडे जाण्याऐवजी अंधाराकडून अंधाराकडे चाललीत असे निराशादायी चित्र आहे, ते बदलायचे असेल तर पुन्हा विपश्यनेत सांगितलेल्या सजगता आणि समता यामार्गाचा अवलंब करुन सकारात्मक प्रयत्न करायला हवेत,  त्यासाठी 'आनंदी गाव आनंदी भारत' प्रकल्प सुरू झाला आहे.  आनंदी गा...