Skip to main content

Posts

Showing posts from May, 2023

जगदीश पवार यांच्यातर्फे बिटकोला दंत उपचार यंत्र

नाशिकरोड|प्रतिनिधी| राष्ट्रवादी  काँग्रेसचे पदाधिकारी व  माजी नगरसेवक जगदिश पवार यांनी स्वखर्चाने महापालिकेच्या नाशिकरोड येथील बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयास दंत वैद्यकीय उपचारासाठी यु. व्ही. चेंबर मशिन दिले. यावेळी वैद्यकीय अधिकारी    डॉ. शिल्पा काळे, डॉ. जितेंद्र धनेश्‍वर ,  डॉ. किशोरी बाणखेले ,  डॉ. मयुरी गलांडे ,    डॉ. अभिषेक देशमुख ,  डॉ. विशाल जाधव ,  डॉ. नागमोती ,  राजेंद्र आहेर ,  एस. के. आडके आदी उपस्थित होते. सुरक्षित युव्ही चेंबर ऑटोक्लेव्ह किंवा निर्जंतुकीकरण यंत्राव्दारे दातांचे निर्जंतुकीकरण केले जाते. या यंत्रामुळे प्रगत तंत्रज्ञानासह अल्ट्राव्हायोलेट चेंबर्सव्दारे निर्जंतुकीकरण राखण्यासाठी मदत होते. बिटको रुग्णालयात नाशिकरोड आणि पंचक्रोशीतील ४५ खेडेगावातून नागरिक उपचारासाठी येत असतात. दाताच्या उपचारासाठी दररोज सुमारे शंभर रुग्ण येतात. दंत तज्ञ डॉ. विशाल जाधव आणि त्यांचे सहकारी दातांचे उपचार, जबड्याची शस्त्रक्रिया करतात. मात्र, आधुनिक मशिनरी नसल्याने उपचारात अडथळे येत होते. जगदीश पवार यांना हे समजताच त्यांनी स...

भुसावळ - पुणे रेल्वे ऐन उन्हाळ सुट्टीत रद्द: प्रवाश्यांची गैरसोय

नाशिकरोड|प्रतिनिधी| भुसावळ- पुणे-भुसावळ (ट्रेन क्र.  11025/11026 )  ही प्रवासी रेल्वेगाडी २० मे पासून १९ जूनपर्यंत उन्हाळ्याच्या सुटीतच रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुटीसाठी अगोदरच नियोजन करून रिझर्व्हेशन केलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यांना आता पुण्याला किंवा भुसावळाला जाण्यासाठी खासगी वाहने, एसटीचा आधार घ्यावा लागणार आहे.  File:photo  रेल्वेच्या तुलनेत रस्ता प्रवास अधिक खार्चिक व ताणतणावाचा आहे. भुसावळ-पुणे-भुसावळ एक्सप्रेस ही इगतपुरी-पुणे-इगतपुरी दरम्यान अंशतः रद्द करून प्रवाशांच्या सोयासाठी   भुसावळ- इगतपुरी- भुसावळ दरम्यान मेमू रेल्वेगाडी (रेक क्रमांक  11119 - 11120 )  चालवली जाणार आहे. मात्र, पुण्याला थेट जाणारी रेल्वेगाडी नसल्याने तीचा फारसा उपयोग नाही. 

कै.रामचंद्र बोराडे प्रथम स्मृतिदिन: दि.२२ मे रोजी हभप. रवींद्र महाराज वाजे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम

नाशिक|कै. रामचंद्र माधवराव बोराडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त सोमवार दि. २२ मे २०२३ रोजी सकाळी ९ ते १२ दरम्यान वर्षश्राद्ध कार्यक्रम असून हा धार्मिक कार्यक्रम लक्ष्मी नारायण मंदिर , पंचक , जेलरोड , नाशिकरोड येथे होणार आहे. याठिकाणी कीर्तनकार ह.भ.प रवींद्र महाराज वाजे यांचे सकाळी १० ते १२ कीर्तन होईल (भजनी मंडळ, कोमलवाडी)असे बोराडे परिवारातर्फे कळविण्यात आले आहे.  शोकाकुल  गं.भा.विमल रामचंद्र बोराडे, नितिन रामचंद्र बोराडे,  योगेश रामचंद्र बोराडे, सौ. जया संदीप पाटील तसेच शोकाकुल समस्त बोराडे परिवार व पंचक ग्रामस्थ 

पत्रकार रतनकुमार साळवे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान

औरंगाबाद|प्रतिनिधी| सिद्धार्थ मित्र मंडळाच्या वतीने निळे प्रतीक या वृत्तपत्राचे संपादक,तथा एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनचे अध्यक्ष रतनकुमार साळवे यांना सिद्धार्थ मित्र मंडळाच्या वतीने दिलेला,प्रतिष्टेचा समजला जाणारा, समाजभूषण पुरस्कार देऊन मान्यवराच्या हस्ते गौरविण्यात आले.  रतनकुमार साळवे यांच्या कार्याची  वेळोवेळी समाजाने दखल घेतली आहे.आतापर्यंत त्यांना विविध संस्था, संघटनाच्या वतीने ३५ पुरस्कार मिळालेले आहे. तें गेल्या २० वर्षापासून पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत. सामाजिक क्षेत्रात त्यांच्या कामाची चुनक आपल्याला बघायला मिळते. तें पत्रकारांचे प्रश्नही हिरीरीने सोडवत असतात. त्यांना राज्यस्तरिय सुध्दा पाच पुरस्कार मिळालेले आहे. सामाजिक कार्यात आपल्या कार्यकर्तृत्वाचा त्यांनी ठसा उमटवलेला आहे. समाज सेवाभान जपत निळे प्रतीक बहूउद्देशीय सेवाभावी संस्थेची अंतर्गत तें विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करत असतात. त्यांचे आतापर्यंतचे कार्य हे उल्लेखनीय असेच आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रो. शरद बाविस्कर ( jnu दिल्ली ) यांच्या हस्ते रविवारी औरंगाबाद मध्ये समाजभूषण पुरस...

१७ ते २४ मे दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

नाशिक| प्रतिनिधी| श्रीक्षेत्र रेडेश्वर महाराज समाधी मंदिर आळे ता. जुन्नर जिल्हा, पुणे येथे संतभूमी उपासना व पारायण मंडळ यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन दि. १७ ते २४ मे २०२३ दरम्यान करण्यात आले आहे. ज्या महाराष्ट्रभूमीत ज्या रेडेश्वराला माऊली संत ज्ञानेश्वर महाराज याचा संघ झाला व पशु वेद बोलला त्या रेडेश्वराला संतत्व प्राप्त झाले. अश्या संतरेडेश्वर महाराजांच्या भूमीत जेथे माऊलीने त्यांना समाधी दिली, तेथे काकडा आरती .भजन तसेच. ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम ( छोटे माऊली ) यांचे रोज सायंकाळी . ४ .ते. ६ श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र होईल, तसेच रोज ६ .ते ८ . कीर्तने अनुक्रमे रोज .  १) ह.भ. भ .जयेश महाराज भाग्यवंत भिवंडी. २ ) ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शिंदे .( निफाड )  ३ ) ह . भ .प. केशव महाराज नामदास .( पंढरपूर )  ४ ) ह . भ .प. एकनाथ महाराज सदगीर . ठाणे  ५ ) ह .भ.प. दिनकर महाराज अंचवले .( शेवगाव . धाकटी पंढरी आत्मा. ६ ) ह . भ .प. पोपट महाराज पाटील ( कासारखेडे . ७ ) ह .भ .प. ज्ञानेश्वर मावली कदम ( छोटे माऊली .आळंदी  ) यांचे जागराचे व काल्याचे किर्तन होईल  ....

पँथर मनोजभाई संसारे काळाच्या पडद्याआड

नाशिक| आंबेडकरी चळवळीचे झुंजार, लढाऊ नेते, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष-युथ रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष  पॅंथर मनोजभाई संसारे यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी अल्पशा आजाराने शुक्रवारी निधन झाले, त्यांच्यावर दादर चैत्यभूमी येथे रविवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. मुंबई महापालिकेतील अपक्षाचे गटनेते म्हणून ही त्यांनी काम केले. मुंबईतील वडाळा प्रभागाचे ते नगरसेवक असतांना स्थानिकांचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवले. त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले. 

कमिशन वाढवून देण्यावर अन्न प्रशासन सकारात्मक: महाराष्ट्र शॉप किपर्स फेडरेशन

नाशिक|प्रतिनिधी| मुंबई येथे ऑल महाराष्ट्र शॉप किपर्स फेडरेशन पुणे यांची अन्न नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव यांच्या समवेत बैठक झाली. धान्य दुकानदारांच्या विविध प्रश्नाकडे फेडरेशनचे अध्यक्ष गणपत डोळसे पाटील यांनी लक्ष वेधले. त्यात दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यावर सकारात्मक चर्चा झाली आहे, असे निवृत्ती कापसे यांनी कळविले आहे. यावेळी राज्यातील प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.  तसेच विविध मागण्या पुढीलप्रमाणे: अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत सर्व दुकानदारांना माल लवकर मिळावा व मशीनमध्ये लवकर टाकण्यात यावा, दर महिन्याला मशीन डाटा लवकर टाकण्यात यावा, नेटवर्क उपलब्ध करून दयावे, कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी, धान्य वजन करून मिळावे, 'पीएमजेके'चे प्राधान्य कमिशन त्वरीत मिळावे, कमिशन मंत्रालयातूनच टाकण्यात यावे, तसेच सर्व व्यवहार ऑनलाइन झाले आहे. प्रत्येक कार्ड धारकाचा थम असल्यामुळे सर्व ऑनलाईन दिसत असल्यामुळे आता ग्राम दक्षता समितीच्या इतिवृत्ताची  आवश्यकता नाही हडोळसे पाटील यांनी अन्न सचिव यांच्या निदर्शनास आणून दिले.  त्यामुळे दुकानदाराची अडवणुक होत असून या सर्व गोष्टी प्रधान सचिव या...

राजेश आढाव लोकाभिमुख आणि संवेदनशिल व्यक्तिमत्व: राजेश पांडे

नाशिकरोड| बालाजी सीएनजीचे संचालक भाजपाचे शहर चिटणीस राजेश आढाव या भागातील लोकाभिमुख आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहे, त्यांचे सामाजिक, राजकीय, सहकार, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात चांगले काम असून भविष्यात त्यांच्या हातून आणखी चांगली कामे घडावे अशा शब्दात भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांनी राजेश आढाव यांना शुभेच्छा दिल्या.  दसक भागातील बालाजी सीएनजी येथे भाजपाचे शहर चिटणीस राजेश आढाव यांचा वाढदिवस उत्साहात पार पडला. याप्रसंगी आढाव यांचे अभिष्टचिंतन करतांना ते बोलत होते. राजेश आढाव हे शांत, संयमी मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून परिसरात परिचित आहे. परिसरातील नागरिकांच्या अडीअडचणीत मदतीला धावून जाणे त्यांचा स्थायीभाव आहे. कुठल्या ही कार्यात त्यांचा उत्साह वाखण्याजोगा असतो म्हणून ते कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत आहेत. त्याअनुषंगाने शुभेछा देण्यासाठी कार्यकर्त्यांचा आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची येथील उपस्थिती सर्व काही सांगून जाते.  यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांच्यासह भाजपाचे सुनील आडके, कैलास आढाव, प्रकाश बोराडे, ज्ञानेश्वर बोराडे, संजय कीर्तने,...