धैर्यवान, विक्रमवीर सुनीता विल्यम्स अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ९ महिने अंतराळात राहिल्यावर पृथ्वीवर परतले. १७ तासांचा परतीचा प्रवास हा नासा आणि स्पेसएक्ससाठी जितका आव्हानात्मक होता, इतकाच तो क्रू -९ अंतराळवीरांची परीक्षा बघणारा ठरला. ८ दिवसासाठी अंतराळात गेलेले विल्यम्स आणि विल्मोर स्टारलाईंनर यानातील निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ९ महिने अंतराळात अडकून राहिले. अखेर स्पेसएक्स आणि नासाच्या एकत्रित प्रयत्नाने विल्यम्स आणि विल्मोर यांना बुधवारी पृथ्वीवर सुरक्षित आणले आणि नासासह संपूर्ण जगाने सुटकेचा निःश्वास सोडला. नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर, निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हे चौघे पृथ्वीवर सुरक्षित पोहचले. स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानाच्या मदतीने बुधवारी दि. १९ मार्च रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे ३: ३० वाजता फ्लोरिडातील टलाहासीच्या किनाऱ्याजवळील पाण्यात यान यशस्वीपणे उतरले. या बहुप्रतिक्षित, यशस्वी पुनरागमनाची वाट नासा आणि जगभरातील लोक उत्सुकतेने पाहत होते. १७ तासांच्या प्रवासानंतर ते पृथ्वीवर दाखल झाले. प्रवास वाटतो इतका...