Skip to main content

Posts

Showing posts from January, 2023

दिड कोटींचे बनावट हॉलमार्क केलेले सोने जप्त; 'बीएसआय'चे महाराष्ट्रात छापे

मुंबई|भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस ब्युरो) सोन्याच्या दागिन्यांवरील बीआयएस चिन्हाचा गैरवापर रोखण्यासाठी शुक्रवारी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये विशेष छापे टाकून कारवाई केली. या छाप्यात दीड कोटींचे बनावट हॉलमार्क केलेले सोने जप्त करण्यात आले.  'बीएसआयने केलेल्या या कारवाई मुळे बनावट हॉलमार्क बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला.  यावेळी मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या मुख्य शहरांसह महाराष्ट्रातील 6 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. मुंबईतील झवेरी बाजार येथे सोन्याच्या दागिन्यांवर बनावट हॉलमार्किंग करणाऱ्या दोन आस्थापनांवर छापे टाकून कारवाई केली, त्यात सुमारे 1.5 कोटी रुपयांचे 2.75 किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आली. मेसर्स श्रीशंकेश्‍वर ॲसेइंग अँड टंच, झवेरी बाजार, मुंबई, मे. जय वैष्णव हॉलमार्किंग सेंटर, झवेरी बाजार, मुंबई, मे. विशाल हॉलमार्किंग सेंटर, जांभळी नाका, ठाणे,मेसर्स श्रीशंकेश्‍वर ॲसेइंग अँड हॉलमार्किंग सेंटर, अंधेरी, मुंबई, मे. जोगेश्वरी ॲसेइंग अँड हॉलमार्किंग सेंटर, रविवार पेठ, पुणे आणि मे. रिद्धी सिद्धी हॉलमार्क, इतवारी, नागपूर या ठिकाणी  छापा टाकून जप्तीची कारवा...

मुंबई क्षेत्रात द्रोण उडवताय, मग मुंबई पोलिसांच्या कारवाईला सामोरे जा! नेमकी काय आहे बातमी वाचा

मुंबई| दहशतवादी राष्ट्रविरोधी घटक ड्रोन ,  रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट ,  पॅराग्लायडरच्या विघातक वापराने सार्वजनिक जीवन धोक्यात आणू शकतात. संभाव्य धोका टाळण्यासाठी ११ फेब्रुवारी पर्यंत ड्रोन आणि तत्सम वस्तूंच्या उड्डाण क्रियांना बंदीचे आदेश पोलीस उपआयुक्त विशाल ठाकूर यांनी दिले आहेत. अति महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा ,  सार्वजनिक मालमत्तेची सुरक्षा आणि सार्वजनिक जीवनाच्या सुरक्षिततेसाठी मुंबई क्षेत्रात ड्रोन ,  रिमोट कंट्रोल मायक्रो-लाइट एअर क्राफ्ट ,  पॅराग्लायडर ,  पॅरा मोटर्स ,  हॅण्ड ग्लायडर्स हॉट एअर बलून इत्यादींच्या उड्डाण क्रियांना ११ फेब्रुवारी पर्यंत बंदी आहे. मुंबई पोलीसांकडून हवाई पाळत ठेवणे किंवा पोलीस उप-आयुक्त यांच्या लेखी परवानगीने करण्यात येणारी कारवाई अपवाद राहील. या आदेशाचे पालन न केल्यास कलम १४४ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त (अभियान), बृहन्मुंबई यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

'आयबीटी’च्या उपक्रमाला आंतरराष्ट्रीय गुणवत्तेच्या ‘ब्रायडल लुक’ची झळाळी

नाशिक|दुबईस्थित मॉडेलद्वारा सादर करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचा ‘ब्रायडल लुक’ आणि कोड असलेल्या स्कीनवरील नववारी लुक.. आयबीटीला जाहीर झालेली सिड्यास्को संस्थेची अधिस्वीकृती.. सुमारे तीनशे सौंदर्यवतींचा उत्स्फूर्त सहभाग आणि उपस्थितांना लाभलेले सौंदर्यशास्त्रातील करियर मार्गदर्शन हा चतु:ष्कोन आयबीटीद्वारा नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमाचे वेगळेपण अधोरेखित करून गेला. आयबीटी संस्थेच्या वतीने हॉटेल सेलेब्रिटा येथे सदर सेमिनाररुपी कार्याक्रमाचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी दुबईस्थित मॉडेल क्रिस्टीना हिने आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचा ‘ब्रायडल लुक’ सादर केला. उपस्थित  सौंदर्यवतींच्या अपेक्षेला साद घालत केलेल्या या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद मिळाली. याव्यतिरिक्त दुसऱ्या एका मॉडेलने प्रथमच कोड असलेल्या स्कीनवरील नववारी लुक सादर करून सौंदर्यवतींची वाहवा मिळवली. या दोन्ही सादरीकरणातील मॉडेल्सचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील मेकअप आर्टिस्ट भाग्यश्री धर्माधिकारी यांनी केलेला मेकअप देखील कौतुकाचा विषय ठरला. कारण दोन्ही मेकअप लाईव्ह पद्धतीने दाखवण्यात आले. याप्रसंगी सिड्यास्को संस्थेच्या प...

गांधीनगर मुद्रणालयाचा कायापालट होणार; २३२ कोटींचा आराखडा तयार

नाशिकरोड|प्रतिनिधी|  गेल्या अनेक वर्षांपासून गांधीनगरच्या सरकारी मुद्रणालयाला उतरती कळा लागलेली आहे. काळानुरुप येथील व्यवस्था आणि साधन सामुग्रीत प्रशासनाने बदल न केल्याने मुद्रणालय जीर्ण झाले आहे. गांधीनगर मुद्रणालयाचे अत्याधुनिकरण झाल्यास गांधीनगरला पुन्हा एकदा नव्याने झळाळी मिळेल या जिद्दीपोटी गेल्या काही वर्षांपासून खासदार हेमंत गोडसे यांच्या सुरु असलेल्या प्रयत्नांना यश येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गांधीनगर येथील जुनाट आणि जिर्ण झालेल्या मशिनरी बदलण्यासाठी आणि मोडकळीस झालेल्या इमारतींच्या पुर्न:विकासाठी केंद्राच्या मुद्रण संचालनालयाकडून २३२ कोटीचा आराखडा तयार करण्यात आला असून कामगारांची संख्या १२० वरून ३१५ पर्यंत वाढवण्यात येणार आहे. लवकरच गांधीनगर प्रेसच्या ११० एकर जागेमधील प्रेस कारखान्यासह प्रेस कॉलनीमधील सोसायट्यांचा पुर्नविकास होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.   अनेक वर्षांपासून शासनाने गांधीनगर प्रेसमधील मुद्रणालय आणि इमारतींकडे दुर्लक्ष केले आहे. येथील इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. सेवानिवृत्त झालेल्यांच्या जागांवर नोकरभरती न केल्याने...

गांधीनगर प्रेस सोसायटी निवडणुकीत परिवर्तन पॅनल विजयी

नाशिकरोड| दि. गवर्नमेंट ऑफ इंडिया प्रेस एम्प्लॉइज गांधीनगर सोसायटीची  पंचवार्षिक निवडणूक (२०२२,२३ -- २०२६, २७) पार पडून त्यात परिवर्तन पॅनल विजयी ठरले. विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले. गांधीनगर प्रेस सोसायटी निवडणुक आज घेण्यात येऊन त्यात प्रतिस्पर्धी कामगार पॅनलला हरवून परिवर्तन पॅनल विजयी ठरले.  एकूण १५ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. ११६ सभासदांनी मतदान केले. ११० मते वैध ठरविण्यात आली. दोन्ही पॅनलचे एकूण २९ उमेदवार रिंगणात होते. सर्वसाधारण गटातून प्रमोद पवार, संदीप गायकवाड, शेखर साळुंखे, प्रवीण पवार, गणेश रोकडे, कुंदन गायकवाड, कैलास आवारे, गोकुळ बोराडे, चेतन दाणी, बाळू भांगरे विजयी झाले.       महिला राखीव गटातून गीतांजली कोरडे, निता शिरसाठ, ईतर मागासवर्ग प्रवर्ग गटातून दिलीप बोराडे, भटक्या विमुक्त जाती/जमाती व विमाप्र गटातून सुधीर जोशी, अनुसूचित जाती/जमाती गटातून दीपक घोलप विजयी झाले.  गांधीनगर येथील वेल्फेअर क्लब हॉल येथे मतमोजणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तालुका उपनिबंधक कार्यालयातील कैलास आढाव व सहकाऱ्यांनी विजयी उमेदवारांचे नावे घोषित...

साईभक्तांच्या बसला अपघात; १० जणांचा मृत्यू

नाशिक| नाशिक- शिर्डी महामार्गावर आज पहाटे वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बस आणि ट्रॅक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात १० प्रवाशांचा मृत्यू  झाला असून ३४ जण जखमी झाले आहे. जखमींवर नाशिक व शिर्डी येथे उपचार सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.  अपघाताच्या चौकशीचे निर्देश ही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

राज्य कृषिसेवा महासंघाच्या अध्यक्षपदी कैलास मोते. सरचिटणीसपदी अभिजित जमधडे यांची निवड

नाशिक| शासनाच्या कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची संघटना असलेल्या राज्य कृषिसेवा महासंघांच्या पुनर्गठनासाठी सोमवारी पुण्यात बैठक झाली. या बैठकीत महासंघाच्या अध्यक्षपदी कृषी संचालक कैलास मोते तर सरचिटणीसपदी तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  तांत्रिक, अतांत्रिक अधिकारी कर्मचाऱ्यांचे एकत्रित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कृषी विभागातील सर्व वर्गांतील संघटनांचा मिळून एकसंघ अशा महासंघाची पुनर्बांधणी करण्यात आली. तसेच कोषाध्यक्ष-संदीप केवटे, कार्याध्यक्ष- बालाजी ताटे, संजय पाटील व जितेंद्र पानपाटील, राज्य उपाध्यक्ष- विक्रांत परमार, प्रीती हिराळकर, बंडा कुंभार, शिवाजी राठोड, झाकीर हुसेन मुलाणी यांची ही निवड करण्यात आली. कृषी सेवा महासंघ कृषी विभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्या खालील एकसमान प्रश्नावर काम करणार आहे.  1)आकृतीबंध- कृषी विभागाचा आकृतीबंध महसूल,ग्रामविकास,जलसंपदा या विभागाच्या धर्तीवर बळकट करतानाच, पदोन्नतीच्या संधी देणारा व कार्यालये बळकटीकरण करणारा  करतानाच,समय मर्यादित पणे मान्य होण्यासाठी कार्य करणे. 2.)समकक्षता- केंद्रीय कृषी मंत्...

बिहार प्रमाणे राज्यातील ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा: समता परिषदेची मागणी

नाशिक| बिहार प्रमाणे राज्यातील इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिकचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश गोसावी, शहराध्यक्ष कविता कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला शहराध्यक्ष आशा बंदुरे, नाना पवार, प्रा.ज्ञानेश्वर महाजन, श्रीराम मंडळ,सचिन जगझाप, रवींद्र शिंदे, महेश शेळके, सुनील घुगे, संतोष पुंड, विलास वाघ, अमोल नाईक, भारत जाधव, भालचंद्र भुजबळ, कृष्णा काळे, हरिष महाजन, दिपक गांगुर्डे, पोपट जेजुरकर, दिपक गांगुर्डे , योगेश दिवे,गणेश खोडे,यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नुकतीच बिहार मध्ये  स्वतंत्रपणे जातनिहाय जनगणना सुरु झाली आहे. तामिळनाडू, छत्तीसगड आणि इतर अनेक राज्यांनी सुद्धा ओबीसी जनगणना केल्या असून त्यांच्या राज्याच्या विकासासाठी त्यांचा उपयोग झालेला आहे. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याबाबतची अखिल भारतीय महात्मा फुले स...

त्र्यंबकेश्वर येथे रेशनिंग दुकानदारांची आढावा बैठक; विविध प्रश्नांवर उहापोह

त्र्यंबकेश्वर| रेशनिंग दुकानदारांचे विविध प्रश्न  सोडवण्याच्या दृष्टीने  त्र्यंबकेश्वर येथील श्री चंद्र गार्डन लॉन्स येथे फेडरेशनची आढावा बैठक झाली. या बैठकीत राज्य अध्यक्ष गणपतराव डोळसे पाटील व जिल्हाध्यक्ष निवृत्ती महाराज कापसे, खजिनदार ढवळू फसाळे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.   यावेळी बैठकीला सर्व तालुक्याचे अध्यक्ष उपस्थित होते. बैठकीत दुकानदारांच्या अडीअडचणी समजून घेतल्या तसेच त्र्यंबकेश्वरचे पुरवठा नाय तहसीलदार यांची भेट घेऊन दुकानदारांच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली. त्यात दुकानदारांचे दोन थम त्यांच्या कुटुंबातले ठेवावे अशी मागणी करण्यात आली आणि कमिशन बाबत चर्चा झाली. शासनाला अहवाल पाठवू असे यावेळी तहसीलदार यांनी सांगितले. यावेळी निफाड तालुका अध्यक्ष संतोष सोनवणे अध्यक्ष, वाल्मीक लांडगोळे, गणपत नेवगे सेक्रेटरी, नारायण ठुबे 2) इगतपुरी तालुका अरुण बागडे उपाध्यक्ष, गुलाब वाजे, सीमा जाधव, अपर्णा पाटील 3)पेठ तालुका धर्मराज चौधरी अध्यक्ष, दिलीप भोये, प्रकाश शेवरे, 4) सुरगाणा तालुका ऐवाजी भोई अध्यक्ष, हरी महाले सेक्रेटरी, भास्कर चौधरी उपाध्यक्ष, मिथुन चौधरी 5) बागलाण...

स्वातंत्र्य सैनिक पत्नी धनुबाई एकनाथ देसाई यांचे निधन

नाशिक| अभोणा येथील स्वातंत्र्य सैनिक स्व. एकनाथ बाळा देसाई यांच्या पत्नी धनुबाई एकनाथ देसाई (९६) यांचे आभोणा येथील राहत्या घरी मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात सात मुले, मुलगी, नातू,पणतू असा परिवार आहे. जिल्हा परिषद नाशिकचे क. प्रशासन अधिकारी रविंद्र देसाई यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्यावर कळवण तालुक्यातील अभोणा येथील गिरणाकाठी बुधवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संपर्क प्रमुख शिक्षक नेते व संताजी मंडळाचे संचालक श्री हरिश्चंद्र देसाई, श्रीगृप फाउंडेशनचे उपाध्यक्ष बीएसएनएलचे अधिकारी सुधाकर देसाई, प्रा.डॉक्टर अशोक देसाई, एबीबीचे देविदास देसाई, शेतकरी विजय देसाई, जिल्हा परिषद नाशिकचे क. प्रशासन अधिकारी रविंद्र देसाई, व आरटीओ नाशिक मालेगावचे कार्यालयीन अधीक्षक श्री जितेंद्र देसाई यांच्या त्या मातोश्री होत्या. अंत्यदर्शनासाठी मविप्र संचालक रविंद्र देवरे, कळवण पंचायत समितीचे माजी सभापती विजय क्षिरसाठ, समाजकल्याण सभापती उषाताई बच्छाव, शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष काळूजी बोरसे, सुभाष अहिरे, धनराज वाणी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ...

तरुणांनी स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करण्यावर भर द्यावा: विनायक पांडे

नाशिक|प्रतिनिधी| मराठी तरुणांनी नोकरीच्या मागे  धावण्यापेक्षा स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करण्यावर अधिक भर द्यावा आणि मेहनत व जिद्दीने तो व्यवसाय यशस्वी करावा असे, प्रतिपादन माजी महापौर विनायक पांडे यांनी केले. एमजीरोड येथील बीएससी चॅटच्या दुसऱ्या शाखेचा शुभारंभ  माजी महापौर विनायक पांडे यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.  उच्च शिक्षित तरुणांनी मिळून सुरू केलेल्या या उपक्रमाचे पांडे त्यांनी कौतुक केलं आणि संचालकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पोतदार मार्बल्सचे संचालक बाळुकाका पोतदार, बापू पगारे, उमेश खाडे, एमजीरोड बीएससी चॅट शाखेचे संचालक दिपक आहिरे, अक्षय उगले, राष्ट्रवादीचे अजय बागुल, ज्ञानदेव पांडे, करपेभान आव्हाड, टोनी गोसावी, प्रतीक पांडे, सुमित जाधव, बाबा चव्हाण, आदित्य दवे, अक्षय वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. फोटो: माजी महापौर विनायक पांडे यांच्यासह उपस्थित मान्यवर नाशिक शहरात बीएससी चॅट सेंटरची साखळी तयार करण्याचा मानस असल्याचे बीएससी चॅट या ब्रँडचे मुख्य संचालक भूषण उगले यांनी सांगितले. या चॅट सेंटरच्या...

संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेला येणाऱ्या दिंडेकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या: स्थानिक ग्रामस्थांची जि.प. प्रशासनाकडे मागणी

नाशिक| प्रतिनिधी| नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथे श्री संतश्रेष्ठ  श्री.निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त राज्यातून अनेक भागातून पायी दिंडया येतात या दिड्या घेऊन येणाऱ्या  दिंडेकरांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून  जिल्हा परिषद अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांना तसे निवेदन देण्यात आले. यामुळे गावत स्वच्छता राहील  व रोगराईला आळा बसेल अशी विनंती निवेदनात करण्यात आली. यावेळी जिल्हापरिषद मुख्य अधिकारी  मित्तल मॅडम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परदेशी साहेब यांच्याशी चर्चा केली, तसेच या दिंड्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी गावामध्ये मोबाईल टॉयलेट, फिरते स्वच्छतालय सारख्या सुविधा उपलब्द करून देऊ असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी निवृत्ती महाराज कापसे, दिपक वाघ, शरद मांडे, शंकर खांडबहाले, अजय खांडबहाले, पंकज वाकतकर, सोमनाथ खांडबहाले, नितीन खांडबहाले, तुषार डहाळे  आणि ग्रामपंचायत महिरावणी, ग्रामपंचायत गणेशगाव (नाशिक) ग्रामपंचायत बेलगावढगा ग्रामस्थ उपस्थित होते.

इगतपुरीजवळ जिंदाल कंपनीत भीषण स्फोट; २ महिलेचा मृत्यू, १७ जण जखमी

नाशिक| इगतपुरी जवळील मुंडेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला असून आगीमुळे उंचच उंच धुराचे लोळ पसरलेले होते. एका मोठ्या बॉयलर मध्ये स्फोट झाल्याने ही घटना घडल्याचे कळते. यात दोन महिलांचा मृत्यू झाला असून १७ जण जखमी झाले. मुख्यमंत्र्यांनी इगतपुरी येथील घटनास्थळी भेट दिली. तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत जाहीर केली व जखमींवर मोफत उपचार करण्यात येतील असे सांगितले. या दरम्यान कंपनीत कर्माचारी काम करत होते. अचानक स्फोट झाल्याने सुमारे २० हून अधिक कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना नाशिकच्या खाजगी आणि सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, मात्र यात २ महिलांचा मृत्यू झाला असून १७ जखमींना बाहेर काढण्यात यश आले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  रूग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. याठिकाणी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी माध्यमांशी बोलतांना नाशिक, ठाणे, एचएएल येथून अग्निशमन दलाचे बंब मागविण्यात आले अशी माहिती दिली आणि आग विझविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. ...