Skip to main content

Posts

Showing posts from August, 2021

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यावर सर्वांचेच एकमत; प्राप्त सूचना, उपलब्ध पर्यायांचा अभ्यास करून शुक्रवारी पुन्हा बैठक: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई| ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे या विषयावर सगळ्याच पक्षांचे एकमत आहे. यासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना, विविध पर्यांयाचा अभ्यास करून येत्या शुक्रवारी यावर सर्वानुमते निर्णयाप्रत येण्यासाठी बैठक घेऊ असे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, , इतर मागास वर्ग व बहूजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अॅड.अनिल परब, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधान सभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, आमदार कपिल पाटील, आमदार देवेंद्र भुयार यांच्यासह सर्वपक्षीय नेते सर्वश्री विनायक मेटे, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, शैलेंद्र कांबळे, बाळासाहेब दोडतुले, मिलिंद रानडे, डॉ. अरुण सावंत आणि इतर मान्यवर उपस्थित होते. स्थानिक स...

कोविड कालावधीतील आरोग्य विद्यापीठाचे कार्य उत्तम: अनुसूचित जमाती कल्याण समितीतर्फे प्रशंसा

नाशिक| कोविड कालावधीतही आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे आव्हानात्मक परिस्थितीमध्ये देखील उत्तम कार्य करण्यात आले असल्याचे विधिमंडळ अनुसूचित जमाती समितीतर्फे सांगण्यात आले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात नुकतीच विधिमंडळ अनुसूचित जमाती समितीची बैठक झाली.   मा. विधानसभा सदस्य आमरदार श्री. दौलत दरोडा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीस विद्यापीठाचे मा. कुलसचिव डॉ. कलिदास चव्हाण समवेत आमदार श्री. शिरिष चौधरी, आमदार श्री. राजकुमार पटेल, आमदार श्री. किरण सरनाईक, आमदार श्री. रमेशदादा पाटील, आमदार श्री. राजेश पाडवी, आमदार  श्री. अनिल पाटील, आमदार श्री. श्रीनिवास वनगर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्री. अमरनाथ राजूरकर मंत्रालयाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय व आदिवासी विकास भवन येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अध्यक्षयी भाषणात मा.ना.श्री. दौलत दरोडा यांनी सांगितले की, विद्यापीठात शासन निधीतील आस्थापनेत अनुसूचित जमाती करीता असलेल्या रिक्त जागांवर त्वरीत मनुष्यबळ घेण्यातबाबत कार्यवाही करावी. अनुसूचित जमातीतील कोविड-19 आजाराने दिवंग...

उद्योगांसाठी भूखंडावर ४० टक्के बांधकामाची अट २० टक्के करू: उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई

मुंबई| महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाशी संबंधित विविध अडचणीसंदर्भात  उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई यांच्याकडे मंगळवारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विकास नियंत्रण नियमालवली नुसार भूखंडावरील ४० टक्के बांधकाम करण्याची अट शिथिल करून २० टक्के करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. तसेच उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले.  महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई यांची भेट घेतली.याप्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा यांनी उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई यांचे अभिनंदन करून करोनाकाळात राबविण्यात आलेल्या योजनांचे स्वागत केले. उद्योगांसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विविध बाबींकरिता पूर्तता कराव्या लागतात. उदा. चटई  निर्देशांक, इमारत पृणत्वाचा दाखला , ट्रान्सफर मुदतवाढ व अनुदान बाबत असलेल्या अडचणींची माहिती दिली.  तसेच महार...

उपनगरमध्ये नागरिकांना रेशनकार्ड वाटप;४५० ते ५०० नागरिकांना झाला लाभ

नाशिकरोड |प्रतिनिधी| उपनगर येथील युगांतर सोशल फाउंडेशन संपर्क कार्यालयात प्रभागातील नागरिकांना रेशनकार्ड वाटप करण्यात आले. जवळपास ४५० ते ५०० नागरिकांना टप्प्याटप्प्याने रेशनकार्ड वाटप करण्यात आले. कोविड-१९ चे सर्व नियम पाळून कार्यक्रम संपन्न झाला. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष अनिल जोंधळे, प्रभाग १६च्या नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे, युगांतर सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री रवि पगारे (सर), विनोद चौधरी, पंढरीनाथ काळूनगे हे मान्यवर उपस्थित होते. जवळपास ४५० ते ५०० नागरिकांना रेशनकार्ड टप्प्याटप्प्याने वाटप करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी बोलताना श्री रवि पगारे (सर) म्हणाले की, रेशनकार्ड हे अत्यंत उपयुक्त सरकारी दस्तऐवज असून भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी ते महत्वाचे राहणार आहे.  शासनाच्या नियमानुसार २०१९ पूर्वीचे रेशनकार्ड धारकांना रेशनदुकानातून सवलतीच्या दरात धान्य मिळेल. नवीन रेशनकार्ड धारकांना सहा महिन्यानंतर धान्य मिळू शकेल. प्रभागातील उत्तर भारतीय जनतेला याचा लाभ निश्चितच मिळेल. कारण उत्तर भारतीय अनेक रहिवासी यांचे वास्तव्य...

रामदास स्वामीनगर येथे मोफत कोविड-१९ लसीकरण केंद्राचा शुभारंभ; १५० नागरिकांचे लसीकरण

नाशिकरोड| प्रतिनिधी| प्रभाग १६ येथील रामदास स्वामी नगर, लेन क्र. २, राजमाता जिजाऊ वाचनालय येथे मोफत कोविड-१९ लसीकरण केंद्राचे उदघाटन झाले. पहिल्याच दिवशी जवळपास १५० नागरिकांनी लस घेतल्याची नोंद करण्यात आली.  लसीकरण केंद्राचे उदघाटन दगडू सोनवणे, रामदास बोरसे, उदय भोगले (सर) या ज्येष्ठांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभाग १६च्या नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे, नगरसेविका सौ आशा रफिक तडवी, नगरसेवक अनिल ताजनपुरे, नगरसेवक राहुल दिवे, महापालिका पूर्व विभागीय अधिकारी स्वप्नील मूदहलवाडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भारत सरकार मुद्रणालय, गांधीनगरच्या मागील रहिवासी क्षेत्र असलेले रामदास स्वामी नगर लेन क्र १, २, ३, वैभव सोसायटी, काठे नगर, इंद्रायणी कॉलोनी, प्रेरणा सोसायटी, खोडदे नगर व आसपासच्या परिसरात कोविड-१९ लसीकरण केंद्र असावे यासाठी येथील नागरिकांनी मागणी केली होती.  त्यानुसार परिसरातील सर्व लोकप्रतिनिधी यांच्या तर्फे पाठपुरावा करण्यात आला होता. आज कोविड-१९ लसीकरण केंद्र सुरू झाल्यानंतर येथील नागरिकांनी सर्व लोकप्रतिनिधी यांचे आभार मानले. या केंद्रात तातडीने नोंदणी(ऑन स्पॉट रज...

नाशकात 'एचयुआयडी'च्या विरोधातील सराफांचा बंद शंभर टक्के यशस्वी!

नाशिक| केंद्र सरकारने  ज्वेलेरी इंडस्ट्रीच्या शिखर संस्था बरोबर चर्चा न करता हॉलमार्कच्या चार प्रमाणित शिक्क्यामध्ये अचानक बदल करून (H U I D) एचयूआयडी ही किचकट, क्लिष्ट  व वेळ खाणारी प्रणाली आणली ही प्रणाली सराफ व्यावसायिकांसाठी अव्यवहरिक असल्याने सरकारच्या या जाचक निर्णयाविरुद्ध देशभरातील सराफ संघटनांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला होता, त्याला नाशिक सराफ सोसिएशनने पाठिंबा  दिला होता त्याप्रमाणे आज नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्व सराफी व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून आजचा हा संप शंभर टक्के यशस्वी केला. त्याचप्रमाणे नाशिक सराफ बाजार येथे व्यावसायिकांनी  याचा निषेध नोंदविला याप्रसंगी सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे, उपाध्यक्ष प्रमोद चोकसी, सेक्रेटरी किशोर वडनेरे, खजिनदार योगेश दंडगव्हाळ, नाशिक सराफ असोसिएशनचे माजी अध्यक्ष राजेंद्र दिंडोकर , माजी सेक्रेटरी सुनील महालकर पंचवटी सराफ असोसिएशनचे शामराव बिरारी, मयूर शहाणे, मुकुंद शहाणे, लकि नागरे, तुषार विसपुते व सराफ व्यवसायीक उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आदिवासी बांधवांसोबत केला रक्षाबंधन सण साजरा

मोखाडा| पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील तोरणशेत या गावातील आदिवासी पाड्यावर महाराष्ट्राचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जाऊन रक्षा बंधन साजरे केले. आदिवासीं महिलांना आजच्या रक्षा बंधनाच्या सणानिमित्त भेट वस्तुचे वाटप केले. त्याप्रसंगी दहिसर विधानसभेच्या आमदार मनिषा चौधरी भाजपा जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील ,भाजप अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव हेमंत सवरा, जिल्हा उपाध्यक्ष संतोष चोथे,ज्येष्ठ नेते नरेंद्र पाटील,तालुका अध्यक्ष विठ्ठल पाटील,सहकार प्रकोष संयोजक राजूकाका तुमडे, माजी तालुकाध्यक्ष रघुवीर डिंगोरे,शहर अध्यक्ष विलास पाटील,युवा मोर्चा सोशल मीडिया सेल सहसंयोजक दिशांत पाटील ,उमेश एलमामे ,प्रतीक पाघारे,शुभम डिंगोरे,वसंत झिंझुर्डे,हनुमंत पादीर ,अनिल एलमामे,एकनाथ झुगरे,हर्षल बात्रे आदी उपस्थित होते.

शिंदे, घोटी टोलनाक्यावरील असुविधा दूर कराव्यात, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

नाशिक| नाशिक - पुणे हायवे व नाशिक मुंबई हायवेवर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. तसेच शिंदे व घोटी टोलमध्ये असलेली सदोष यंत्रणा याबाबत अनेकदा निवेदने देण्यात आलेले आहे. वाहतूकदारांना जर सुविधा मिळत नसतील तर टोल का भरावा असा प्रश्न वाहतूकदारासमोर आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येत नाही तोपर्यंत टोल बंद करा अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेली आहे. यावेळी शिंदे टोल येथील व्यवस्थापकांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावेळी अध्यक्ष राजेंद्र फड, माजी अध्यक्ष जयपाल शर्मा , उपाध्यक्ष बापू टाकाटे, सुभाष जांगडा,उपाध्यक्ष सतीश कलंत्री,अमोल शेळके, पंकज भालेराव, रवि पेहरकर,बाबा शर्मा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी शिंदे टोलच्या व्यवस्थापकांनी तर ओव्हरलोड वाहनांचा सर्रास वापरा मुळे रोड खराब होत असल्याचे सांगितले. याबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री अशोक चव्हाण, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, आमदार माण...

हजारांपेक्षा कमी झालेली रुग्णसंख्या दिलासादायक; ऑक्सिजन प्रकल्प पूर्ण करा: ना. भुजबळ

नाशिक|काही दिवसांपासून स्थिर असलेली कोरोनाबाधित उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या हजारांपेक्षा कमी झाल्याने दिलासादायक परिस्थिती आहे. ही रुग्णसंख्या अजून कमी होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तसेच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीबाबत आयोजीत आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. याबैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्कर्ष दुधेडिया, म्युकर मायकोसिस टास्क...

२३ ऑगस्टला सराफांचा देशव्यापी बंद; नाशिक सराफ व्यावसायिकांचा पाठिंबा

नाशिक| 'एचयुआयडी' सारख्या अत्यंत किष्ट, किचकट प्रणालीला विरोध करण्यासाठी येत्या २३ ॲागस्ट रोजी राज्य व केंद्रीय सराफ संघटनांनी पुकारलेल्या एकदिवसीय लाक्षणीक बंदला दि नासिक सराफ असोसिएशनने पाठिंबा दिला आहे. याबाबत  निर्णय घेण्यासाठी काल दि. २० ॲागस्ट रोजी नासिक सराफ असोसिएशन हॅाल येथे महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये नासिक शहरासह जिल्ह्यातील असोसिएशनशी चर्चा करून २३ ॲागस्ट रोजी नासिक शहरासह जिल्ह्यातील सर्व असोसिएशन एचयुआयडीला विरोध करण्यासाठी कडकडीत बंद पाळणार असल्याच्या निर्णयावर एकमत झाले. दि. २३ ॲागस्टला दिवसभर नाशिक शहरासह जिल्ह्यातील सर्व सराफी व्यवसाय एकदिवसीय बंद पाळणार आहेत. क्वालिटी कन्ट्रोलसाठी हॅालमार्क कायदा गरजेचा असून या कायद्याचे सर्व सराफ व्यावसायीकांनी स्वागत केले आहे. मात्र केंद्र सरकार एचयुआयडी सारखी क्लिष्ट प्रणाली आणुन सराफी व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर गदा आणू पहात आहे.  या कायद्याने व्यवसाय करणे कठीण होऊन बसले आहे. हा कायदा रद्द करण्याची एकमुखी मागणी देशभरातून केली जात असून त्या पार्श्वभुमीवर २३ ॲागस्टला संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील सराफ ...

व्हॉट्सॲप ग्रुपचा असाही सकारात्मक वापर; गरजू मित्राला दिला मदतीचा हात

मोखाडा| कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल मधील 1996 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करत गरीब मित्राला वीस हजाराची मदत केली. एक वर्षापूर्वी 1996 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी व्हाट्सअप ग्रुप स्थापन करत विचारांची देवाण-घेवाण सुरू केली. मात्र काही दिवसांपूर्वी एका गरीब मित्राला मदत करण्यासाठी एक हजार रुपये प्रत्येकी देण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत वीस हजार रुपयाची मदत जमा झाली.  त्यातून दहा हजार रुपयांचा किराणा व दहा हजार रुपये रोख अशी मदत करण्यात आली आहे. ही मदत देण्यासाठी मित्र एकत्र जमत त्याच्या घरी गेल्याने त्या मित्राला प्रचंड आनंद झाला व हर्षोल्लसित झालेल्या गरीब मित्राने आनंद व्यक्त करत सर्वांचे स्वागतही केले. व्हाट्सअप ग्रुपचा असाही सकारात्मक उपयोग होऊ शकतो हे आपणाला या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्यक्षात पाहायला मिळाले.

मोखडा ग्रामीण रुग्णालय समस्यांबाबत केंद्रीय राज्यमंत्री पवार यांना निवेदन

मोखाडा| भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष विठ्ठल चोथे यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना मोखाडा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील समंस्याबाबत निवेदन दिले आहे.मोखाडा तालुका हा आदिवासी बहुल तालुका असुन अत्यंत दऱ्याखोऱ्यात विखुरलेला तालुका आहे, येथील आरोग्याच्या समस्यां नेहमीच चर्चेचा विषय राहीला आहे, याकडे चोथे यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भरती पवार यांचे लक्ष वेधले आहे. निवेदनात खालील मागण्या केलेल्या आहेत. ग्रामीण रुग्णालय मोखाडा करीता शववाहीनी उपलब्ध व्हावी, रुग्णांसाठी ५० कोटीची अतिरीक्त व्यवस्था उपलब्ध व्हावी.सोनोग्राफी करण्याची व्यवस्था आठवड्यातून निदान दोन वेळा तरी व्हावी.भूलतज्ज्ञाची नेमणूक करण्यात यावी.जेणेकरून येथेच सिझेरियन करून प्रसुती करता येईल.रूग्ण व रूग्णा़सोबत आलेल्या नातेवाईकांना बसण्यासाठी रूग्णालय परीसरात बाकडे व त्यावर शेडची व्यवस्था व्हावी.स्तनदा मातांसाठी सुविधायुक्त हिरकणी कक्ष स्थापन करण्यात यावा.रुग्णालयात शुध्द पाणी पिण्यासाठी आरो सुविधा उपलब्ध व्हावी.

आईचे छत्र हरवलेल्या बालकांना शिवसेनेकडून मदतीचा हात

मोखाडा| तालुक्यातील साखरी येथील ललिता बाबू वाघ (४५) या कातकरी महिलेचं पाच महिन्याचे बाळ असताना तिचा मृत्यू झाला, यानंतर गेल्या एका वर्षाभरापासून तिची मुलगी कल्पना सुनिल सवरा  ही त्या बाळाचा सांभाळ करत होती परंतु दुर्दैवाने प्रसूती दरम्यान तिचा देखील महिन्याभरापूर्वी मृत्यू झाला व सुदैवाने तिचे बाळ वाचले. परंतु  या दोन्ही बालकांना नियतीच्या खेळाने त्यांच्या आईपासून दुर केल्याने त्यांच  पालनपोषण करणं अवघड झालंय. त्याच्यासाठी शिवसेनेने मदतीचा हात पुढे केला. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचा मामा मंगेश बाबू वाघ हा कार्तिक (सहा महिने) गुरुनाथ (दीड वर्ष) यांचा सांभाळ करत होता.परंतु त्याला देखील सात महिन्याची मुलगी आहे, त्यातच त्यांची परिस्थिती देखील हलाखीची असल्याने त्याला देखील अधिक दिवस या मुलांचे सांभाळ करणे शक्य होत नव्हते, यामुळे गेल्या काही दिवस कार्तिकचे वडील या दोन्ही मुलांचा सांभाळ करत होते.या नंतर सुनिल सवरा याचा भाऊ कार्तिक सवरा हा गेल्या आठवड्या भरापासून या मुलांचा सांभाळ करतोय.  परंतु या सर्वांचीच परिस्थिती हलाखीची असल्याने या लहानग्याचा पालन पोषण कसं कराय...

रायुकाँ कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज राहावे: मेहबूबभाई शेख

नाशिक| राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज व्हा असे आवाहन नाशिक तालुका आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख यांनी केले आहे. दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात मालेगाव, सटाणा, चांदवड, देवळा नाशिकच्या दौऱ्यावर असतांना मेहबूबभाई शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत युवक जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग यांनी विविध बैठका, प्रवेशासोहळे आणि आढावा बैठकांचे आयोजन केले होते. नाशिक तालुका आणि देवळाली मतदारसंघ बैठकीत युवकांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागण्यासाठी मार्गदर्शन केले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नाशिक लोकसभा अध्यक्ष  कोंडाजीमामा आव्हाड होते. प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांचे स्वागत तालूका अध्यक्ष गणेश गायधनी आकाश पिंगळे, विशाल गायकर यांनी केले. यावेळी  जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम  कडलग, प्रदेश उपाध्यक्ष सचिन पिंगळे, महीला जिल्हा अध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे, तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे,आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सांगितले की, युवकांनी फक्त ...

रामदास स्वामीनगरला लसीकरण केंद्र सुरू करावे: नगरसेविका सुषमा रवी पगारे यांची निवेदनाद्वारे मागणी

नाशिकरोड| प्रतिनिधी| भारत सरकार मुद्रणालय, गांधीनगरच्या मागील परिसर रामदास स्वामी नगर, लेन क्र. २ येथे तातडीने कोविड-१९ लसीकरण केंद्र सुरू करावे अशी आग्रही मागणी प्रभाग १६च्या नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे यांनी केली आहे. वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय (आरोग्य विभाग) महापालिका, नाशिक यांना प्रभाग १६च्या नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. प्रभाग १६ मधील गांधीनगर प्रेसच्या मागील बाजूस रामदास स्वामी नगर लेन क्र. १,२,३ असा मोठा रहिवासी परिसर आहे. याभागात अनेक सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध महिला, दिव्यांग, व्याधीग्रस्त राहतात. उपनगर परिसरात महापालिका अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, या एकाच ठिकाणी कोविड-१९ लसीकरण केंद्र सुरू आहे. परिणामी रामदास स्वामी नगर व आसपासच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, व्याधिग्रतांना तेथे जाऊन लस घेणे, हे तुलनेने त्रासदायक जाणवते. हा परिसर मोठा असल्याने उपनगर महापालिका केंद्र जाण्यास लांब पडते.  रामदास स्वामी नगर लेन क्र. २ येथे राजमाता जिजाऊ वाचनालय असून येथे मोठी जागा उपलब्ध आहे. तसेच हे वाचनालय प्रशस्त आहे. वाचनालयात लसीकरण क...

साई कॉम्पिटिशन अकॅडमीतर्फे प्रवेश सुरू

नाशिक| साई कॉम्पिटिशन अकॅडमीच्या वतीने विविध परीक्षा अभ्यासक्रमासाठी 2021 वर्षासाठी प्रवेश सुरू झाले असून विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश घ्यावा असे आवाहन संचालक प्रा. एन जी वसावे यांनी केले आहे. आजच आपला प्रवेश निश्चित करून घ्या, अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत. एमपीएससी / युपीएससी, पोलीस भरती एसएससी, रेल्वे, जिल्हा परिषद, एनडीए - आर्मी / एअरफोर्स / नेवी, आरोग्य विभाग, बँकिंग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आदी विभाग संपर्कासाठी संचालक एन.जी.वसावे (सर) साई कॉम्पिटिशन अकॅडमी ,नाशिक १ मजला बोरा शिल्प , एम.जी.रोड रेडक्रास सिग्नल जवळ , नाशिक -१ सरकारी दवाखान्याच्या समोर, विसरवाडी, ता. नवापूर, जि. नंदूरबार मो. 7744922956 /7719088977- 9850825449 येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

सामाजिक न्यायाची वसतीगृहे, निवासीशाळा बनली आरोग्य मंदिरे! हजारो कोरोना रुग्णांचा आसरा

पुणे| नाशिक| कोरोना आजाराच्या दुसऱ्या लाटेत सामाजिक विभागाची शासकीय वसतिगृह व निवाशी शाळांमध्ये आरोग्य विभागाने तात्पुरती कोवीड सेंटर उभारली. यामुळे हजारो रूग्णांना आरोग्य सुविधा मिळणे सोपे झाले. सामाजिक न्याय विभागाच्या  वसतिगृह व निवाशी शाळांनी आरोग्यमंदिर होतं महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे. दुसऱ्या लाटेत कोविड-19 ची परिस्थिती गंभीर बनल्याने समाजातील अनेक घटकांना त्यामुळे नुकसान सोसावे लागले तर, अनेकांना आपले जवळच्या व्यक्तीस गमवावे लागले आहे. या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी समाजातील असंख्य घटकांनी कशोसीने प्रयत्न केले. सामाजिक घटकांबरोबर विविध विभागांचे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना देखील सदर परिस्थितीला सामोरे जावे लागले. शासनाच्या विविध यत्रणांचा सहभाग हा देखील तितकाच महत्वाचा ठरला आहे.  दुसऱ्या लाटेत वसतीगृहे व निवासीशाळा ही आरोग्य मंदिरे बनल्याने राज्यातील हजारो रुग्णांना याद्वारे आरोग्य दानाचे महान कार्य झाले आहे. राज्यातील एकूण 441 शासकीय वसतीगृहातून जवळपास 45 हजार मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय दरवर्षी होत असते. राज्यात अनेक ठिकाणी वसतिगृ...

एक हात मदतीचा आधार जिजाऊ संस्थेचा

मोखाडा| मोखाडा तालुक्यातील शिरसगाव येथे राहणाऱ्या लोकांना ईश्वर चंदर जाधव यांना जिजाऊ संस्थेने घर उभारणीसाठी पत्रे व इतर अत्यावश्यक साहित्य उपलब्ध करून देऊन मदत केली आहे.मुसळधार पावसामुळे ईश्वर जाधव यांचे घर पडले होते ही माहीती माजी उपाध्यक्ष निलेश सांबरे यांना समजताच त्यांनी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून पत्रे व इतर साहित्याची मदत केली आहे. एक हात मदतीचा आधार माजी उपाध्यक्ष निलेश सांबरे संस्थापित जिजाऊ संस्था ही नेहमीच ठाणे,पालघर जिल्ह्यातील आदिवासी, गोरगरीब, गरजू, पिडीत, पुरग्रस्त, संकटग्रस्त यांना मदत करत असते. त्यांच्या या सेवाभावी कार्यामुळे जिजाऊ संस्थेच्या असंख्य शाखा सर्वत्र निर्माण झाल्या आहेत.

रेशनिंग दुकानदार संघटनेतर्फे मयत सभासदांच्या वारसांना आर्थिक मदत

नाशिक| नाशिक जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटना  व श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर  रास्त भाव दुकानदार संघटना यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सभासदांना भेडसावणाऱ्या समस्या आणि अडचणीबाबत चर्चा झाली . त्यामध्ये कमीशन वाढ व करोनानाने निधन झालेल्या कुटुंबियांच्या वारसांना आर्थिक मदत आणि विमा कवच शासनाकडून मिळवून देणे तसेच संघटनेतर्फे ही शक्य होईल तेवढी मदत करण्यावर एकमत झाले. शासनाने तात्काळ मदत करावी असे आवाहन  संघटनेच्या वतीने करण्यात आले.  यावेळी जिपचे माजी उपाध्यक्ष संपतराव सकाळे, वामनराव खोसकर, गणपत डोळसे पाटील, संघटनेचे कार्याध्यक्ष ह.भ.प. निवृत्ती महाराज कापसे,  पुंडलीक साबळे, लालू अचारी, अरुण बागडे, प्रकाश नाठे, दिलीप नवले, अशोक बोराडे, सागर भगत आदी उपस्थिती होते. मान्यवरांच्या उपस्थितीत मयत दुकानदार यांचे वारसदार दिनकर खेडूलकर,  गोटीराम दिव, आणि हेंमत तरवारे यांना प्रत्येकी ३०,००० रु. आर्थिक मदत देण्यात आले.

भाजपा आदिवासी आघाडीतर्फे पालघर जिल्ह्यात जागतिक आदिवासी दिन साजरा

मोखाडा| ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त पालघर जिल्ह्यात आदिवासी आघाडीच्या वतीने सर्व तालुका व मंडळ निहाय जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य हरिश्चंद्र भोये, प्रदेश कार्यकारणी आदिवासी आघाडी सचिव डॉ हेमंत सावरा, संघटन सरचिटणीस संतोष जनाठे,आदिवासी आघाडी प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा जिप सदस्य  सुरेखा थेतले, सरचिटणीस सुजित पाटील, सुशील औसरकर तसेच जिल्हा पदाधिकारी,मंडळ पदाधिकारी उपस्थित होते. आदिवासी आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्व ठिकाणी आदिवासी दिन कार्यक्रम संपन्न व्हावे यासाठी आदिवासी आघाडी पालघर जिल्हा अध्यक्ष मिलिंद झोले तसेच जिल्हा सरचिटणीस  अभिजित देसक,दैनत लहरे व विजय जवले यांनी प्रयत्न केले.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पाळला राज्यभर चेतना दिन

मुंबई| ११ ऑगस्ट १९६६ रोजी एका दिवसाची सामूहिक किरकोळ रजा घेऊन, महाराष्ट्रातील  राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी, राज्यस्तरीय एकजुटतेचे प्रदर्शन दाखवले  स्व. र.ग.कर्णिक यांच्या झंझावाती कार्यप्रणालीच्या माध्यमातून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना बलशाली झाली. त्यांच्या कार्याला स्मरून आज चेतना दिन पाळण्यात आला. आज ११ ऑगस्ट २०२१. गतकाळातील संघटनेच्या अभूतपूर्व यशामुळेच राज्यातील कर्मचाऱ्यांना आर्थिक व सेवा विषयक स्थैर्य लाभले. या संदर्भातील गेल्या ५८ वर्षातील संघटना कार्याच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी आजचा चेतना दिन महाराष्ट्रातील सर्व जिल्हानिहाय सरकारी कार्यालयात मोठ्या जोशात साजरा केला गेला. दुपारच्या भोजनाच्या सुट्टीत कार्यालय- कार्यालयात कर्मचारी सोशल डिस्टंसिंगचे पालन करून एकत्र आले व राज्य शासनाकडे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्या मंजूर व्हाव्यात यासाठी सामूहिक घोषणा देऊन, या प्रातिनिधीक सांघिक कृतीद्वारे शासनाचा लक्षवेध करण्यात आला.  आज राज्यभर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी या चेतन दिनाद्वारे  दर्शविलेली एकजूट ही सांप्रत राज्य शासनाला नजीकच्या काळात कर्मचाऱ...

महाकवी वामनदादा कर्डक स्मारकाची दुरवस्था थांबवावी: शिष्टमंडळाचे महापौरांना साकडे

नाशिकरोड| अनेक वर्षांपासून महाकवी वामनदादा कर्डक यांच्या स्मारकाची दुरवस्था झाली असून नाशिककरांसाठी ही भूषणावह बाब नाही, तातडीने स्मारकाची दुरवस्था थांबवावी अशा मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने महापौर सतीश कुलकर्णी यांना देऊन त्यांना साकडे घातले. १५ ऑगस्ट २०२१ रोजी नाशिकचे महाकवी वामनदादा कर्डक यांची ९९ वा जयंती उत्सव साजरा केला जातो आहे. नाशिकरोड दसक-पंचक परिसरातील स्मशानभूमीच्या बाजूला असलेले हे स्मारक धूळखात पडले आहे. स्मारकाला भेट देण्यासाठी अनेक लोककलावंत बाहेर गावावरून येत असतात. पण स्मारकाला लागलेले ग्रहण पाहून त्यांना निराशाच होते. महाराष्ट्रातील अनेक लोककला आणि कलावंतांना ते आदरस्थानी आहेत. महाराष्ट्र मातीतील लोककला, अस्मिता वामनदादा यांनी जपली आहे. निदान हे जाणून तरी लोककलावंत यांना सन्मान देऊन त्यांच्या स्मारकाची दुरवस्था थांबविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, वामनदादा यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा, विद्युतीकरण करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले. महापौर कुलकर्णी यांनी तातडीने दुरवस्था थांबविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन देऊन तसे आदेश पारित...

सामाजिक न्याय विभागास ८२२ कोटीचा निधी प्राप्त! स्वाधार योजनेसह शिष्यवृत्तीचा प्रश्न मार्गी लागणार

नाशिक| राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांना कोविड परिस्थितीमुळे निधी उपलब्ध होण्यास दिरंगाई झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. यासंदर्भात समाज कल्याण आयुक्तालय मार्फत शासनाशी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. श्री धनंजय मुंडे मा.मंत्री, सामाजिक न्याय विभाग यांच्या विशेष प्रयत्न व मार्गदर्शनाखाली विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री अरविन्द कुमार व विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सातत्याने निधी मिळणे बाबत मागणी लावून धरली होती. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध शिष्यवृती संदर्भात विविध सामाजिक संघटना, प्रसारमाध्यमांनी देखील हा विषय लावून धरल्याने त्याची दखल शासनाकडून घेण्यात आली आहे.  स्वाधार योजनेसह इतर महत्वाच्या विद्यार्थी हिताच्या विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी शासनाने *सुमारे ८२२ कोटी ५० लाख रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागास वितरित केला आहे.* त्यामुळे सदरचा निधी लवकरच विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासनाकडून वितरित करण्यात आलेला निधी व योजनांचा तपशील पुढीलप्रमा...

डोळ्यांच्या पापणी सवे तू... राहुल बर्वे

डोळ्यांच्या पापणी सवे तू... सोबत आहेस पण दिसत नाहीस तू... उघडताच डोळे अदृश्य होतेस तू... बंद करताच डोळे हरावतेस तू... माझ्या विचारांचा समुद्र तू... मध्ये असलो तर भिजवतेस तू... किनाऱ्यावर सुखाचा स्पर्श देऊन जातेस तू... हृदयाच्या ठोक्या प्रमाणे तू... शांत असलो तर ठोके वाढवतेस तू.. उसळलेलं असेल तर त्यांना थांबवतेस तू... धागा मी त्यातले मणी तू... कुंकू मी त्यातला रंग तू... शरीर मी त्यातले प्राण तू... तुझ्यात मी आणि माझ्यात तू... रचना: राहुल बर्वे, मुंबई

भालाफेकित नीरज चोप्राला सुवर्णपदक, भारताला १२ वर्षानंतर दुसरे पदक

दिल्ली| टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने तब्बल १२ वर्षानंतर दुसरे गोल्ड मेडल मिळविले आहे. यापूर्वी अभिनव बिंद्रा याने बीजिंग ऑलिम्पकमध्ये पहिले गोल्ड मिळवले होते. नीरजच्या या कामगिरीमुळे भारताची मान उंचावली असून इतर खेळाडूंना प्रेरणा देणारी आहे. निरजला गोल्ड मेडल मिळाल्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुरुवातीपासून नीरज चोप्राची दमदार कामगिरी बघून सर्व भारतीयांना त्याच्यावर विश्वास होता. प्रत्येक सामन्यागणीक त्याची कामगिरी उंचावत असल्याने त्याच्यावर सर्व भारतीयांची नजर होती आणि त्याने सर्वांच्या अपेक्षांवर खरं उतरत भारताला भालाफेक मध्ये गोल्ड मेडल मिळवत तब्बल १२ वर्षानंतर दुसरे गोल्ड मिळवून देत भारताची मान उंचावली. २००८ आली अभिनव बिंद्रा याने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवले होते.   भारताला गोल्ड मिळून द्यायचा नीरजचा इरादा पक्का दिसत होता. जेव्हा नीरज अंतिम फेरीत भाला फेकण्यासाठी धावत होता, तेव्हा असे वाटले की हा तरुण ऑलिम्पिकमध्ये काही तरी क...

डेल्टा व्हेरियंटचा सामना करण्यासाठी लसीकरणावर भर द्या: भुजबळ

नाशिक| कोरोना बाधितांची रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोरोनाच्या कुठल्याही व्हेरियंटचा सामना करण्यासाठी लसीकरण हाच शाश्वत पर्याय आहे. त्यासाठी लसीकरणावर भर देवून लसीकरणाची गती वाढविण्यात यावी, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या कोरोना सद्यस्थितीबाबत आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी  जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, उपजिल्हाधिकारी ज्योती कावरे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, डॉ. उत्कर्ष दुधेडिया, म्युकर मायकोसिस टास्क फोर्सचे डॉ. संजय गांगुर्डे, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. ...

मल्याळी असोसिएशनतर्फे कोकणातील पूरग्रस्तांना मदत

नाशिकरोड|प्रतिनिधी|ऑल इंडिया मल्याळी असोसिएशनतर्फे (नाशिक विभाग)  कोकणातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू व इतर साहित्य ट्रक  भरून कोकण प्रांताकडे रवाना करण्यात आले. प्रभाग १६च्या नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे, नगरसेविका सौ आशा तडवी, नगरसेवक श्री राहुल दिवे, नगरसेवक श्री अनिल ताजनपुरे या लोकप्रतिनिधींच्या हस्ते ध्वज दाखवून ट्रक रवाना करण्यात आला.  याप्रसंगी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अनिल शिंदे, नगरसेविका सौ संगिता गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मल्याळी असोसिएशनचे (नाशिक विभाग) कार्य कौतुकास्पद असून या असोसिएशनने सामाजिक बांधिलकी जपली आहे. यापूर्वीही असोसिएशनने भरपुर मदत केली आहे. पूरग्रस्त कोकण भागात अनेक लोकं उघड्यावर आहेत. त्यांना मल्याळी असोसिएशनने मदतीचा हात पुढे करून बांधिलकी जपली. त्यांच्या कार्याला सर्व लोकप्रतिनिधींकडून शुभेच्छा, असे गौरवोद्गार नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे यांनी काढले. मल्याळी असोसिएशनचे प्रेसिडेंट रणजित नायर यांनी सर्व लोकप्रतिनिधी, प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी युगांतर सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष...

महत्वपूर्ण उपलब्धी: देशात ५० कोटी नागरिकांचे लसीकरण

दिल्ली| भारतातील कोविड लसीकरण मोहिमेने आज 50 कोटी लसींच्या मात्रा देण्याचा टप्पा पूर्ण केला, या मैलाच्या टप्प्यानंतर, पुढेही आपण लसीकरणाची गती अशीच कायम ठेवू आणि ‘सर्वांना लस-सर्वांना मोफत लस’ मोहिमेअंतर्गत सर्व नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करु, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. याबद्दल केलेल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले,  "भारताच्या कोविडविरुद्धच्या लढाईला आज मोठे बळ मिळाले आहे. लसीकरणाच्या आकडेवारीने 50 कोटी मात्रांचा टप्पा पार केला. आता याच भक्कम पायावर, आपण लसीकरणाची संख्या अधिकाधिक वाढवत नेऊ आणि ‘सर्वांना लस, मोफत लस” मोहिमेअंतर्गत देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करू, अशी आशा आहे.” भारताने देशव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत 50 कोटी मांत्राचा टप्पा पार केला  *देशात आतापर्यंत एकूण 3,10,55,861 रुग्ण बरे झाले आहेत. *रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 97.37% *गेल्या 24 तासात 40,017 रुग्ण बरे झाले *भारतात गेल्या 24 तासात 38,628 नव्या रुग्णांची नोंद *भारतात सध्या एकूण सक्रीय रुग्णसंख्या 4,12,153 *एकूण रुग्णसंखेच्या तुलनतेत सक्रीय रुग्ण 1.29% आहेत. *साप्...