Skip to main content

Posts

Showing posts from February, 2023

नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झाली आहे: मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

मुंबई| ‘कांदा उत्पादकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झाली आहे’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत बोलताना सांगितले. मुख्यमंत्री आपल्या निवेदनात म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारे आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषापेक्षा जास्त मदतही केली आहे. नाफेडला अतिरिक्त कांदा खरेदी करण्याची विनंती केली होती, त्याप्रमाणे खरेदी सुरु झाली आहे. 2.38 लाख मेट्रिक टन कांदा आत्तापर्यंत खरेदी झाला असून जिथे खरेदी केंद्र बंद असेल तिथे सुरु करण्यात येईल . कांदा निर्यातीवर देखील बंदी नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनासुद्धा आवश्यकतेनुसार मदत जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कांदा दरप्रश्न: निर्यातीला चालना द्या आणि नाफेडमार्फत कांदा खरेदी करा: छगन भुजबळ

मुंबई|नाशिक| राज्यातील कांद्याचे दर कोसळले असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्यामुळे शासनाने कांदा निर्यातीला अधिक प्रोत्साहन देण्यासोबत नाफेड मार्फत कांदा खरेदी सुरु करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तसेच बांगलादेशांत द्राक्ष निर्यात करण्यासाठी असलेली इम्पोर्ट ड्युटी कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतः बांगलादेशाच्या पंतप्रधानांशी बोलून प्रश्न मार्गी लावावा. यासाठी राज्यशासनाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज सभागृहात केली. कांद्याचे दर कोसळल्याने नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. याबाबत आज छगन भुजबळ यांनी सभागृहाचे लक्ष वेधून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, सुमारे ५ क्विन्टल कांदा विक्री नंतर शेतकऱ्याला केवळ १८ रुपये शिल्लक राहताय ही अतिशय गंभीर बाब आहे. कांदा उत्पादक शेतकरी हा अतिशय गरीब शेतकरी आहे. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी गेल्या वेळी मी उपमुख्यमंत्री असतान...

ग्रंथ वाचनाने व्यक्तीमत्व समृध्द होण्यास मदत होते: डॉ. राजेंद्र बंगाळ

नाशिक|नियमित ग्रंथ वाचनाने व्यक्तीमत्व समृध्द होते तसेच सकारात्मक विचार वाढण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ समवेत परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. एन.व्ही.कळसकर आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी अध्यक्षस्थानावरुन सांगितले की, मराठी भाषेचा प्रत्येकाने अभिमान बाळगला पाहिजे. सर्वांनी सतत विविध प्रकारच्या पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. पुस्तक वाचनातून साहित्याची आवड निर्माण होते. भाषा समृध्द होण्यासाठी त्यास बळकटी मिळते. समृध्द भाषेने व्यक्तीमत्व सकस होते. भाषा समृध्द होण्यासाठी मराठी साहित्याचे नियमित वाचन होणे गरजेचे आहे. भाषा संवर्धनासाठी मराठी भाषेचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, मराठी भाषा ...

श्रीमन्निवृत्तीनाथ महाराज पंचक्रोशी प्रदक्षिणा सोहळ्याचे आयोजन

नाशिक|प्रतिनिधी|श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर तथा संतश्रेष्ठ विश्वगुरू श्रीमन्निवृत्तीनाथ महाराज  पंचक्रोशी प्रदक्षिणा सोहळा २०२३ ( वर्ष दुसरे ) वारकरी भूषण हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली आहे. आशीर्वाद हरिभक्त परायण वैकुंठवासी आत्माराम बाबा नाशिककर तसेच वै . ह.भ.प.बापू बाबा देवगावकर तथा गुरुवर्य माधव बाबा घुले तसेच. ह.भ.प.रामकृष्णदास महाराज लहवितकर ह .भ .प एकनाथ महाराज गोळेसर यांच्या आशीर्वादाने शुक्रवार दिनांक २४/ २ /२३ रोजी सुरुवात होईल, निवृत्तीनाथ महाराज मंदिरात पादुकांचे पूजन होऊन आमदार हिरामण खोसकर संस्थानचे माजी अध्यक्ष, मुरलीधर पाटील .निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष, निलेश गाढवे व पंचकमिटी यांच्या हस्ते पूजन होऊन परिक्रमेला सुरुवात होईल. २४ तारखेला सकाळी नाष्टा सुरेश गंगापूत्र यांचा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर जनार्दन स्वामी आश्रम येथे होईल दुपारी जेवण अंजनेरी भजनी मंडळ देतील दुपारचा विसावा खंबाळे रात्रीचे भोजन समस्त ग्रामस तळेगाव अंजनेरी येथे होईल  २५ तारखेला दुसऱ्या दिवशी जातेगाव . मुळेगाव .यांचा नाश्ता होई...

साहित्यकणा फाऊंडेशनचे संमेलन ऊत्साहात; वरिष्ठ पत्रकार ब्रिजकुमार परिहार यांचा वृत्तसेवारत्न पुरस्काराने गौरव

नाशिक| येथील साहित्यकणा फाऊंडेशनच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन श्री. सबनिस यांच्या हस्ते झाले. युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ऐश्‍वर्य पाटेकर संमेलनाध्यक्ष होते. पं. अविराज तायडे, यशवंत पाटील, फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय गोराडे, सचिव विलास पंचभाई व्यासपीठावर होते.  श्री. सबनिस म्हणाले की, संयोजक म्हणून मंचावर बसणारे, मिरवणारे अनेकजण असतात. परंतु, साहित्यकणा फाऊंडेशनचे अध्यक्ष व सचिव हे दोन खंदे पदाधिकारी ज्या तळमळीने संमेलनासाठी राबत आहेत, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. अध्यक्षिय भाषणात श्री. पाटेकर म्हणाले की, अखिल भारतीय साहित्य संमेलनांत फक्त गर्दी होते. तेथे तळमळ दिसत नाही. अशा छोटेखानी संमेलनांतूनच साहित्यिक घडत असतात. साहित्यावर आतापर्यंत खुप बोललं गेलं, लिहिलं गेलं. पण, अशा माणसांवर बोललं पाहिजे. सुरवातीला प्रणव पाटणकर, विलास पाटणकर आदींनी स्वागतगीत सादर केले. सुरेखा बोऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले.  दरम्यान, उद्‌घाटन सत्रानंतर रावसाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय साहित्यकणा काव्य स्पर्धेत तब्बल ७० कवींनी सहभाग घेतला....

'आकांक्षेकडून अंत:प्रेरणेकडे' या संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन प्रबोधनी प्रशाला येथे उत्साहात

नाशिक|आकांक्षेकडून अंत:प्रेरणेकडे' या संकल्पनेवर आधारित  वार्षिक स्नेहसंमेलन भोसला महाविद्यालया जवळील प्रबोधनी प्रशाला इंग्रजी माध्यम शाळेत  उत्साहात पार पडला. अनेक प्रसिद्ध व्यक्ती केवळ इच्छाशक्तीच्या बळावर अतिशय प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यावर मात करून उत्तुंग यशोशिखरावर पोचल्या आहेत. यावेळी छोट्या परंतु परिणामकारक नाटिका आणि नृत्य यांच्याद्वारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सेंट्रल हिंदू एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ. मुंजे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्यासह इतर सात व्यक्तिरेखा रेखाटण्याचा प्रयत्न शिक्षक आणि विद्यार्थी यांनी अतिशय कौशल्याने आणि उत्स्फूर्तपणे केला . या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून  IRS DY  कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स भूमिका सैनी उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की इच्छाबळ असेल तर माणूस  अशक्य गोष्टी देखील शक्य करू शकतो. कार्यवाह हेमंत देशपांडे यांनी  कार्यक्रमाच्या संकल्पनेच्या याच हेतूसाठी संस्था करत असलेल्या कार्याचे विश्लेषण केले. स्नेहसंमेलनासाठी संस्थेचे कार्यवाहक माननीय हेमंत देशपांडे, सदस्य गिरीश वैशंपायन, सुयो...

रुची, गंध, श्रवण, दृष्टी, स्पर्श असे पंचेंद्रियांना समर्पित उद्यानाचे लोकार्पण

नाशिक| महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिसरात रुची, गंध, श्रवण, दृष्टी, स्पर्ष असे  पंचज्ञानेद्रियांना समर्पित ’विद्यापीठ संवेदना उद्यान’ तयार करण्यात आले आहे. या उद्यानाचा लोकार्पण सोहळा विद्यापीठाचे मा. कुलगुरु लेफ्टनंन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.  याप्रसंगी मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलींद निकुंभ, प्रमुख अतिथी म्हणून चेन्नई येथील कर्मचारी राज्य विमा निगम महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, लेफ्टनंन्ट जनरल डॉ. राजीव कानिटकर (निवृत्त) ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद पिंपरीकर, डॉ. षुभंागी पिंपरीकर, अधिष्ठाता डॉ. सुषीलकुमार झा, वित्त व लेखाधिकारी श्री. एन.व्ही. कळसकर, उपकुलसचिव डॉ. सुनील फुगारे, डॉ. संजय नेरकर आदी मान्यवर उपस्थित होते.  याप्रसंगी विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनंन्ट जनरल माधुरी कानिटकर यांनी संागितले की, पर्यावरण संवर्धनसाठी मानवी षरिरातील पंचज्ञानेंद्रीयांवर आधारित संवेदना उद्यान तयार करण्यात आले आहे. मेडिकल टुरिझमच्...

सोने झाले 60 हजारी; दरात ऐतिहासिक वाढ

नाशिक| आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमंतीत वाढल्या असून त्याचा परिणाम भारतात ही दिसून येत आहे. त्यामुळे सोन्याचे दर प्रति तोळा 60 हजार रुपयांवर पोहचला आहे. सध्या लग्न समारंभासाठीचा काळ असून सोन्याचे दर कमी होण्याची वाट बघणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला ही अतिरिक्त झळ पडणार आहे,  ही सोने भाव वाढ पुढे अशीच सुरू राहण्याची शक्यता ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज अरोरा यांनी वर्तवली आहे. फोटो: फाईल  श्री.अरोरा यांनी सांगितले की, बुधवारी रात्री आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किमतीत 1.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  यामुळे, भारतातील सोन्याचा दर 60,000 रुपये (999 शुद्धता) प्रति 10 ग्रॅमच्या वर उघडला आहे.  सोन्याचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.  यामध्ये ३ टक्के जीएसटीचाही समावेश आहे.  एमसीएक्सवर सोन्याचा भाव 58,500 रुपये प्रति ग्रॅमच्या आसपास आहे.  वास्तविक, यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.25 टक्के वाढ केली आहे.  महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी अमेरिकेत व्याजदर वाढले आहेत.  आज रात्री आणि उद्या संध्याकाळी आणखी एक डेटा अमेरिकेत येण...