पुणतांबा| दि. ७ जूनला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक होऊन साधक बाधक चर्चा झाली. त्यात १६ ठरावापैकी ९ ठरावावर सकारात्मक विचार झाला, ७० टक्के मागण्यांवर समाधान झाल्याचे ग्रामसभेत सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी सांगितले. त्यामुळे पुणतांबा ग्रामसभेत तूर्तास आंदोलन थांबवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. पुणतांबा येथे १ जूनपासून सुरू केलेले शेतकरी आंदोलन तूर्तास तरी थांबविण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. २३ मे रोजी पुणतांबा येथे विशेष शेतकरी ग्रामसभा आयोजित करून शेतकऱ्याच्या शेतमाल,विज,कर्ज व इतर अडचणीचे ठराव करून सरकारला निर्णय घेण्यासाठी १ जूनपर्यंतचे अल्टिमेट देण्यात आले होते, पण याची दखल सरकार दरबारी घेण्यात न आल्याने किसान क्रांतीतर्फे आंदोलन सुरू झाले. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी महसूल मंत्री,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी आंदोलक यांच्याशी चर्चा करत पाच दिवसानंतर संगमनेरला बैठकीला या म्हणून सांगितले त्यानंतर चौथ्या दिवशी कृषिमंत्री दादा भुसे यांनी आंदोलकांशी तीन तास चर्चा करून ७ जूनला उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या बरोबर बैठक पक्की केली.उपमुख्यमंत्री यांच्या दाल...