नाशिक| नाशिक मूव्हीमॅक्सच्या माध्यमातून प्रादेशिक मनोरंजनासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. चित्रपट प्रदर्शनासह विविध प्रादेशिक उपक्रमांवर भर देऊन विस्तार करण्याचा सिनेलाईन उद्योग समूहाचा मानस आहे. नाशिक येथील मूव्हीमॅक्स सिनेमागृहांमध्ये स्थानिक सामग्रीच्या प्रवाहाचा विस्तार करण्याचा विचार करत आहे. भारतात ११ मे २०२२ ला चित्रपट प्रदर्शन व्यवसायात पुन्हा प्रवेश करून, सिनेलाइन इंडिया लि.ने विविधतेसह मूव्हीमॅक्स विस्तारासाठी ताकदीने सज्ज झाली. कनाकिया समूहाचा एक भाग म्हणून, नाशिक येथील प्रिमियम सिनेलाइन मल्टिप्लेक्स, मूव्हीमॅक्स आता ग्राहकांच्या मागणीनुसार प्रादेशिक स्तरावर नाशिकला चित्रपट प्रदर्शन व विविध सुविधात्मक उपक्रम उपलब्ध करत आहे. नाशिकला जसे व्यासपीठ उपलब्ध करून दिले तसे महाराष्ट्रातील आणि आसपासच्या भागात अशा प्रकारचे मनोरंजनाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे सिनेलाईनचे उद्दिष्ट आहे. समूहाचा थिएटरचा अनुभव अधिक समृध्द करण्यावर भर आहे. महामारीच्या काळात चित्रपट प्रदर्शनाच्या व्यवसायाला मोठा फटका बसला. अनेक प्रादेशिक चित्रपट प्रदर्शनाच्या रांगेत होते. लॉकडाऊननंतर वैविध्यप...