त्र्यंबकेश्वर| त्र्यंबकच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी गेल्या ४ महिन्यापासुन बंद असलेले धार्मीक विधी सुरू करण्याचा निर्णय त्र्यंबक-ईगतपुरीचे आ.हिरामण खोसकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. त्यासाठी कलम १४४ तसेच इतर नियम काटेकोर पद्धतीने पाळण्याच्या सूचना आ.खोसकर यांनी लोकप्रतिनिधी, मंदिर प्रशासन, महसूल आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत केल्या आहे. कोवीड १९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून त्र्यंबकेश्वर मंदीरासह धार्मीक विधी कालसर्प शांती, नारायण नागबली आदी विधी बंद असल्यामुळे त्यावर अवलंबून असणारे अनेक व्यवसाय देखील बंद होते. त्यात प्रामुख्याने पुरोहित मंडळींकडे काम करणारे आदिवासी तसेच इतर कामगार, शहरातील कापड व्यापारी,फुल, भांडी, नागाची प्रतिमा विकणारे सोनार, लोजिंग व्यवसाय आणि इतर अनेक व्यावसायिकांवर बेरोजगारीची वेळ आली होती, त्याअनुषंगाने आ. हिरामण खोस्कर यांच्याध्यक्षतेखली एक पुरोहित, महसूल, पोलिस आदींची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात पुरोहित संघाची एक नियंत्रण समिती करुन सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम तंतोतंत पाळून एक नियमावली सादर करण्याच्या सूचना प्रांत अधिकारी तेज...