नाशिक/ प्रतिनिधी: जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आतापर्यंत जिल्ह्यात बाधीत रुग्णांची संख्या १००१ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत ५७ जणांचा बळी गेला आहे. आज दिवसभर जिल्ह्यात १७ कोरोना बाधीत आढळले आहे. आज दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शहरात ७ जणांचा बळी गेला आहे.
![]() |
| फोटो:फाईल(WHO) |
मालेगावनंतर नाशिक शहर हळूहळू दुसरं हॉटस्पॉट ठिकाण म्हणून वाटचाल करत आहे. दिवसभरातील १७ बाधितांपैकी शहरातील १०, सिन्नर ३ तर जिल्ह्याबाहेरील २ रुग्ण असून जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आता कोरोना बाधितांना आकडा १००१ झाला आहे. तर ७३५ जण बरे झाले आहे. सध्या २०७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. मालेगाव ६९१,नाशिक शहर १२८, नाशिक ग्रामीण १३७ आणि जिल्ह्याबाहेरील ४५ जण आहेत.
