औरंगाबाद/प्रतिनिधी: केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राज्याच्या राजकारणातून संन्यास घेत पत्नी रंजना हर्षवर्धन जाधव यांना राजकीय वारसदार जाहीर केले आहे.
![]() |
| फोटो क्रेडिट:भास्कर निकाळजे |
अधिक माहिती अशी, माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे कन्नडचे माजी मंत्री कै. रायभान जाधव यांचे पुत्र आहेत. रायभान जाधव यांनी त्यांच्या कार्यकाळात चांगली कामे केली. याचा फायदा पुत्र हर्षवर्धन जाधव यांना झाला. जाधव हे दोन वेळा आमदार झाले. शिवसेनेत असताना आणि पुढे मनसेत दाखल होताच त्यांना तिकिट दिले गेले. माञ पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर.आर.पाटील असताना त्यांच्या ताफ्यात वाहन घुसवले असता त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचे प्रकरण घडले होते.
त्यानंतर त्यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टिका केल्याने त्यांना पक्षातून काढण्यात आले. जाधव यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सेनेचे अधिकृत उमेदवार सलग तीन वेळा खासदार झालेले चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत अपक्ष रिंगणात उतरल्यामुळे खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ईम्तियाज जलील हे खासदार म्हणून निवडून आहे. मतांचे विभाजन झाल्याने सेनेत नाराजी होती. पुढे झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने तिकिट कापल्याने हर्षवर्धन कन्नड मतदार संघातून अपक्ष म्हणून रिंगणात उतरले मात्र लोकसभेचा बदला म्हणून सेनेने त्यांचा पराभव केला.निवडणूक प्रचार काळात ठाकरे घराण्यावर टिका केली.
त्यानंतर त्यांच्या बंगल्यावर अज्ञात लोकांनी दगडफेक ही केली होती. त्यातच त्यांनी सासरे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावरही टीका केली. मधल्या काळात त्यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्षाची स्थापना केली. परंतु काही कारणास्तव पक्ष वाढला नाही. काही महिन्यापूर्वी किरकोळ कारणातून त्यांच्यावर अॕट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, अशा परिस्थिती पक्ष वाढविणे, कार्यकर्ते सांभाळणे कठीण झाले. सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे आणि याच परिस्थितीच त्यांनी सोशल मीडियात व्हिडिओच्या माध्यमातून आपला दोन दशकाचा राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केल्याने राजकारणात चर्चेला उधाण आले.
