डब्ल्यूएचओच्या युरोपीय विभागातर्फे १९ मे २०२० रोजी एक अहवाल प्रसिद्ध झाला होता. २०१४ ते २०१८ कालावधीतील हा अहवाल ११ ते १५ वर्षीय मुलांच्या मानसिक आरोग्यावर आधारीत होता. साहजिकच तो महामारीच्या आधीच्या कार्यकाळातील अहवाल आहे. मात्र या अहवालातील अभ्यास ध्यानात ठेवून आपल्याला भारतातील मुलांसाठी कोविड-19 च्या काळात काम करावे लागणार आहे. या महामारीचा परिणाम हा शाळांमधील मुले आणि किशोर-किशोरींच्या मानसिक स्वास्थ्यावर होण्याची शक्यता आहे.
आपल्यातील बहुतेक लोकांना माहित आहे की मोठ्या शहरांमध्ये शाळा ऑनलाईन झाल्या आहेत. विद्यार्थी गॅजेट्सच्या सहाय्याने शाळांशी कनेक्ट होत आहे, त्यांचा जास्त वेळ हा 'गॅजेट्स हाताळण्यात जात आहे. या आभासी जगाने 'वास्तविक जग' बदलले आहे. विद्यार्थ्यांची दिनचर्या अचानक बदलली आहे. त्यांच्यात बदल घडवून आले आहे. त्यांच्यात विचार, चिंता आणि अवसाद दिसून येत आहे. काही गोष्टी मला चिंतित करतात, आम्ही पहिल्यांदा चर्चा केलेल्या लोकांपेक्षा ही परिस्थिती भिन्न आहे.
माझ्यामते कोविड-१९ या कालावधीनंतरच्या शालेय जीवनात काही नवीन अडचणींना मुलांना सामोरे जावे लागेल म्हणजेच त्यांना 'वास्तविकतेशी समायोजन करणे किंवा जुळून घेण्यात अडचणी येतील. त्यासाठी आपल्याला तयार राहावे लागेल, 'आभासी जगातून' त्यांना 'वास्तविक जगात आणण्याच्या प्रक्रिये दरम्यान त्यांच्यात चिंता वाढू शकते. त्यासाठी आपल्या सर्वांना त्याच्याशी कनेक्ट राहावे लागेल. सध्याचे ऑनलाईन शिक्षण सर्वांसाठी एका चहाच्या कपा सारखे नाही, त्यामुळे सर्वांना आपण एक सारखे गृहीत धरू शकत नाही, त्याची आवश्यकता ही नाही. एकदा शाळा सुरू झाली की पुन्हा त्यांच्यावर शिक्षणात चांगले प्रदर्शन दाखवण्याचा दबाव असेल, सुरुवातीला त्यांच्यात चिंता निर्माण होईल परंतु जीवनांत पुढे जाण्यास आणि जास्त प्रगती आणि ज्ञान प्राप्त करण्यास मदत होईल हे ही तितकेच खरे!
सुरुवातीच्या दिवसांत विद्यार्थ्यामध्ये आपल्या गॅझेट्स मित्राशी दुरावल्याची भावना निर्माण होऊन तो चिंतीत होईल, त्यावेळेस त्याला घरातील जवळच्यांनी मित्रत्वाच्या नात्याने स्वतंत्रपणे त्याच्याशी संवाद स्थापित करायचा आहे. माझा विश्वास आहे की पालकांसोबत शाळेतील शिक्षकांची भूमिका खूप महत्वाची आहे. त्यासाठी आपल्याला शिक्षकांना प्रथम विश्वासात घेऊन परिस्थिती साधारण बनवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मी शिक्षकांना अशा उपाययोजना बनविण्यास सुचवते ज्यामुळे युवांना त्यांच्या मनाची कवाडे उघडून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन देता येईल. सुरुवातीच्या दिवसांत शाळेत हलके फुलके आणि मौज-मस्ती सारखे वातावरण निर्माण करावे. आपल्याला सिलेबस पूर्ण करण्याची चिंता राहील परंतु त्याऐवजी आपण विद्यार्थ्यांची चिंता करायला हवी, आपण हे विसरायल नको की ते देशाचे भविष्य आहे. त्यांचे मानसिक स्वास्थ्य हे देशाच्या स्वास्थ्याशी निगडीत आहे, आपण सर्वजण मिळून त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी झटूया आणि उज्ज्वल भारत घडवूया !
तरुणा समनोत्रा
बाल मानसशास्त्रज्ञ,
उपचारात्मक प्रशिक्षक
मो-98501 86863