नाशिक/ प्रतिनिधी: शुक्रवारी सकाळी कॉलेजरोड भागात बिबट्याने एका महिलेवर हल्ला करुन जखमी केले होते. मात्र त्यानंतर बिबट्या गायब झाला होता. वनविभागाने दिवसभर शोध घेतला पण त्याचा थांगपत्ता लागला नाही. यापूर्वी याठिकाणी बिबट्याचा वावर दिसून आला होता. महिलेवरील हल्ल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण होते.
शनिवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास पुन्हा तिडके कॉलनी येथील एसएसके हॉटेलच्या किचनमध्ये बिबट्या ताव मारत असल्याचे सीसीटिव्हीत दिसले. त्यानंतर पहाटे 5 वाजेच्या सुमारास राजसारथी सोसायटी येथे बिबट्याने 2 नागरिकांवर हल्ला केला. दोघे नागरिक मॉर्निंग वॉकला जात असताना हा सर्व प्रकार ही cctv कॅमेरात कैद झाला. बिबट्याचा वावर शहरीभागात वाढल्याने वनविभागाने आजूबाजूच्या भागात शोधमोहीम हाती घेतली आहे.
