नाशिकरोड/प्रतिनिधी: सुभाषरोड भागात संशयितांनी दोन वाहनांच्या काचा फोडून विचारणा करणाऱ्या वाहन मालकांशी वाद घालत त्यांच्या जवळी रोकड लुटली.आज रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष रोड भागात विक्रांत केशव थोरात (रा. देवळाली गाव) व शेखर देवरे यांच्या मारुती बलेनो व तवेरा या वाहनांच्या काचा संशयित व्यक्तींनी फोडल्या. त्यानंतर विचारणा करायला गेलेल्या वाहन मालकांसोबत वाद घालून संशयितांनी त्यांच्याकडील रोकड हिसकावली. या घटने प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
