नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करत त्यावर आपण मात केली आहे. मात्र अद्यापही कोरोनाचा धोका कायम असून या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत तातडीने उपाययोजना केल्या जातील असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

फोटो क्रेडिट:विकास भुजबळ
ना. छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथील भुजबळ फार्म कार्यालय येथे कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परिस्थितीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे आमदार आणि पदाधिकारी यांची बैठक घेत आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विधानसभेचे उपसभापती ना.नरहरी झिरवळ, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीपकाका बनकर, आमदार नितीन पवार, काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर, नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ,देविदास पिंगळे,माजी आमदार दीपिका चव्हाण,जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे,विजय पाटील, संदिप पवार, यशवंत शिरसाठ आदी उपस्थित होते.
यावेळी ना. छगन भुजबळ म्हणाले की, राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत एकही नागरिक उपाशी राहू नये यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे आमदार तसेच जिल्ह्यातील काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यासोबत प्रत्येक मतदारसंघात असणाऱ्या अडचणी ना. छगन भुजबळ यांनी यावेळी समजून घेतल्या. यावेळी ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा,रुग्णवाहिका, कोविड केअर सेंटर, आणि डिसीएचसी मध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात तसेच जनरेटरची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आमदारांनी केली.खरीप हंगामासाठी शेतकरी पीक कर्ज वाटप, औद्योगिक वसाहत मधील अडचणी, कामगार, ग्रामीण भागातील लॉकडाऊनच्या काळात निर्माण झालेल्या अडचणी व त्यावर करावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर आढावा घेऊन हे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येतील असा विश्वास ना.छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

![]() |
| फोटो क्रेडिट:विकास भुजबळ |