जिल्हा परिषदेच्या सभापती अश्विनी आहेर आणि वास्तुविशारद गौरव आज लग्नाच्या बेडीत अडकले; विवाह सोहळ्यात मान्यवर आणि आप्तेष्टांचा फेसबुक लाईव्हद्वारे सहभाग
नाशिक/ प्रतिनिधी: जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते मा. आ. अनिल आहेर यांची कन्या जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर आणि वास्तुविशारद गौरव यांचा विवाह सोहळा आज फेसबुक लाईव्हव्दारे पार पडला. अनोख्या पद्धतीने पार पडलेल्या सोहळ्यात नवदाम्पत्याला मान्यवर आणि आप्तेष्टांनी फेसबुकवर ऑनलाईन उपस्थिती दर्शवून आशिर्वाद आणि शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याने समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला.
![]() |
| फोटो: उदय रांजणगावकर |
कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यामुळे गर्दी होईल अशा कुठल्याच कार्यक्रमाला परवानगी नाही. लग्न कार्यात गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे मोजकेच नातेवाईक, हितचिंतकांच्या उपस्थित लग्न सोहळे पार पडत आहे. असाच एक लग्न सोहळा ज्याने आदर्श उदाहरण सर्वांसमोर ठेवले. माजी आ. अनिल आहेर यांची कन्या चि.सौ.का.अश्विनी(सभापती-महिला व बालकल्याण विभाग जि.प.नाशिक,सदस्य-नाशिक जिल्हा नियोजन समिती (M.Arch) आणि चि.गौरव(M.Arch) यांचा विवाह सोहळा आज २४ मे २०२० रविवार रोजी फेसबुक लाईव्ह याच्या माध्यमातून संपन्न झाला.
मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात सोशल डीस्टन्स नियमांचे पालन करण्यात आले. तसेच मास्क घालून वऱ्हाडी सहभागी झाले. उर्वरित मान्यवरांनी फेसबुक_लाईव्हद्वारे सहभागी होऊन नवदाम्पत्याला ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवून अश्विनी आणि गौरव यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या.ऑनलाईन सहभागी झालेल्या सर्वांचे याप्रसंगी समस्त आहेर परिवार(नायडोंगर) यांनी आभार मानले. आणि समाजात जनजागृती व्हावी आणि एक आदर्श निर्माण व्हावा यासाठी नवा पायंडा घालून दिला.
