नाशिक| महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या उन्हाळी सत्रातील अंतीम वर्ष अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा दि. 16 जुलै 2020 पासून घेण्यात येणार आहे. यासंदर्भात विद्यापीठाकडून तात्पुरत्या स्वरुपाचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे मात्र कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता त्या-त्या परिस्थितीनुसार व शासनाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार अंतिम निश्चित वेळापत्रक हे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.
![]() |
| फोटो: फाईल |
याबाबत परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, शासनाच्या धोरणास अनुसरुन व वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या आदेशास अधिन राहून विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून सूचीत करण्यात येत आहे. कोव्हीड-19 आजाराचा प्रादुर्भाव व टाळेबंदीच्या सध्याच्या परिस्थितीच्या अनुषंगाने परीक्षार्थींनी सध्याचे वास्तव्याचे ठिकाण सोडू नये तसेच अनावश्यक प्रवास टाळावा.
ते पुढे म्हणाले की, सध्याच्या सोयीच्या वास्तव्याच्या ठिकाणीच शांतपणे परीक्षेची तयारी करावी. परीक्षा सदंर्भात परीक्षासंदर्भात आवश्यक सूचना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील. विद्यार्थ्यांनी इतर माध्यमातून येणाऱ्या सूचना व बातम्यांवर विश्वास ठेवू नये. विद्यापीठ परीक्षा संबंधी अधिक माहिती शिक्षक, विद्यार्थी, पालक व अभ्यांगत यांनी विद्यापीठाचे संकेतस्थळ www.muhs.ac.in वरील माहिती अधिकृत समजण्यात यावी.
