राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आक्रमक झाली असून जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पडळकर यांचा निषेध करुन जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार यांच्या नेतृत्वाखाली प्रतिमेस जोडेमारो आंदोलन झाले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतप्त भावना आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते नाना महाले, कोंडाजी मामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, असं वक्तव्य करून आमदार पडळकर यांनी नवा वाद उपस्थित केला आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात मोठा रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला जोडे मारत घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. तसेच त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तो जप्त केला. पवार साहेबां बाबत बोलणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे. यापुढे पडळकर यांना जिल्हा आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी फिरू देणार नाही असा इशारा जिल्हाध्यक्ष पगार यांनी दिला.

