नाशिक| उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या व इतर ०२ गुन्हयातील हवा असलेला आरोपी नाशिक शहरातील कुख्यात गुंड जॉन पडेची (वय २८) यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. गुन्हे शाखेच्या युनिट २ विभागाने ही कारवाई करुन त्याला जेरबंद केले आहे.
नाशिक शहरातील सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय् यांनी आदेश दिले होते. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय् , गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निषाणदार , सहाय्यक पोलीस आयुक्त मोहन ठाकुर, पो.निरी . अजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दि . मंगळवारी दि. २४ नोव्हेंबर २०२० रोजी येथील नेमणुकीला असलेले सहापो. निरीक्षक शामराव भोसले यांना गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीद्वारे सहा.पो.निरी. अभिजीत सोनवणे, सहा.पो.उपनिरी शामराव भोसले, पोहवा यशवंत बेंडकुळे, राजेंद्र घुमरे, अन्सार सैय्यद, पो.शि. संतोष माळोदे आदीच्या पथकाने पुणे शहरातील मुंढवा पोलीस ठाणे हद्दीत सापळा रचला,
येथिल पासपोर्ट ऑफिसच्यासमोर मधुबन चायनीज हॉटेल पिंगळे वस्ती येथून वरील गुन्हयात हवा असलेला कुख्यात आरोपी जॉन चलन पडेची (वय २८ वर्ष), रा.कॅथे कॉलनी, देवी मंदिराच्या मागे देवळाली कॅम्प, नाशिक यास सापळा रचुन चौकशीसाठी ताब्यात घेतले, त्याची सखोल चौकशी केेली असता आरोपीने वरील नमुद गुन्हयाची कबुली दिल्याने त्यास अटक करून पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आरोपीने नाशिकरोड आणि देवळाली येथिल विविध गुन्ह्यातील सहभागाची ही कबुली दिली आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निषानदार, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री मोहन ठाकुर. पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट २ विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, सपोनि श्रीराम पवार, अभिजीत सोनवणे वसंत खतेले, पोउपनिरी विजय लोंढे , सहा.पो.उपनिरी शामराव भोसले , राजेंद्र जाधव , पोहवा राजेंद्र घुमरे, यशवंत बेंडकुळे, अन्सार सैय्यद , शंकर काळे , देवकिसन गायकर , रमेश घडवजे, पोना संजय ताजणे, परमेश्वर दराडे , पो.शि. यादव डंबाळे , गौरव गवळी , संतोष माळोदे , जयंत शिंदे , बाळा नांद्रे महिला पो.शि. कोमल यादव आदींनी केली आहे.
