नाशिक| कृषीमंत्री दादा भुसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली तपासणी करून घ्यावे असे आवाहन ना. भुसे यांनी केले आहे.
त्याबाबत माहिती देताना ना. भुसे म्हणाले, माझी कोविड-19 ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोविड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य तो उपचार घेत आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती ठीक आहे. लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत पुन्हा रुजू होईन असे सांगितले आहे.
