नाशिक| चंद्रकांत पाटील यांना कुठे ही जाऊद्या कोल्हापूरला, पुणे, घरी हा त्यांचा विषय आहे, असे सांगून नाशिकचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांनी त्यांना टोला लगावला आहे.
![]() |
| फोटो: फाईल |
एकनाथ खडसेंना नोटीस येणारच होती
खडसे भाजपातून राष्ट्रवादीत आले त्यामुळे एकनाथ खडसे यांना इडीची नोटीस येणारच होती, आम्हाला कल्पना होती, असे सांगून भाजपा विरोधकांना नोटिशी पाठवून त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. माझ्या विरुद्ध, प्रताप सरनाईक आणि आता खडसे असा प्रकार सुरू आहे. विरोधात बोलले की इडीची तलवार लटकलेली असते अस हीे ते म्हणाले.
