नाशिक| बँकेत किंवा वित्तीय संस्थेत सोने तारण कर्ज घेतांना सोने व्हॅल्यूअर्सची भूमिका ही फार महत्वाची असते. व्हॅल्यूअर्सना व्हॅल्यूशन करतांना भेदसवणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे तसेच सर्व व्हॅल्यूअर्स नवीन मूल्यांकनाचे नवं तंत्रज्ञान अवगत करून देण्याचा उद्दिष्टयाने गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशन- महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आलेली आहे.
या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षपदी मुंबई येथील पुरुषोत्तम काळे तसेच आपल्या नाशिकचे राजेंद्र दिंडोरकर यांची राज्य कार्याध्यक्ष तर चेतन राजापूरकर यांची राज्य उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. संस्था महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका स्तरीय कार्यकरणीची निवड प्रक्रिया सुरू असून खान्देश विभाग प्रमुख श्री भैयाभाऊ भामरे यांनी नाशिक जिल्हा अध्यक्षपदी चारुहास घोडके व उपाध्यक्षपदी प्रल्हाद दुसाने यांची निवड झाली आहे, तसेच नासिक शहर अध्यक्षपदी अरविंद बागुल व उपाध्यक्ष पदी गोपाळ विसपुते यांची निवड झालेली आहे.
संघटनेची पहिली कार्यशाळा लवकरच नाशकात
लवकरच महाराष्ट्र राज्यातील सर्व गोल्ड व्हॅल्यूअर्स साठी कार्यशाळा नासिक येथे घेण्यात येणार आहे अशी माहिती उपाध्यक्ष चेतन राजापूरकर यांनी केली आहे.

