मुंबई| शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी आपल्या शेरोशायरीतून नाव न घेता भाजपावर पुन्हा शाब्दिक बाण डागत निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या शयरीत म्हटले, तुम लाख कोशिश करलो मुझे बदनाम करने की मैं जब भी बिखरा हूँ दुगनी रफ्तार से निखरा हूँ...त्यांची अशा प्रकारची शायरी सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय आहे.
खा. संजय राऊत यांना इडीने नोटीस पाठवल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यासंदर्भात सोमवारी खा. राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली होती. यावेळी त्यांनी भाजपाचे काही नेते इडी कार्यालयात जाऊन कागदपत्रे आणत असल्याचा गंभीर आरोप केला होता. महाआघाडी सरकार स्थापनेसाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला अशा सर्वांना इडीच्या नोटिसा पाठवून त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. सध्या ते आपल्या विरोधकांचा समाचार ते सोशल माध्यमातूनच ते आपल्या खास शैलीत शेरोशायरीद्वारे घेत आहे. विरोधकांना ते शाब्दिक बाणा ने घायाळ करत असून त्यांनी सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म फेसबुक वर एक शेर पोस्ट करत नाव न घेता भाजपावर निशाणा साधला आहे.
यापूर्वीचा शेर
आ देखे जरा किसमे कितना हैं दम,
जमकरखना कदम मेरे साथीया
आजचा त्यांचा शेर पुढील प्रमाणे आहे.
तुम लाख कोशिश करलो
मुझे बदनाम करने की
मैं जब भी बिखरा हूँ
दुगनी रफ्तार से निखरा हूँ...
