नंदूरबार| शिर्वे गावातील जिल्हा परिषदच्या मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप साई कॉम्पिटिशन अकॅडमी संचालक एनजी वसावे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसत होता.
शहरासह आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्व पटवून देणारी संस्था म्हणून साई कॉम्पिटिशन अकॅडमी प्रसिद्ध आहे. विविध स्पर्धा परीक्षेची तयारी संस्था करून घेत असते. तसेच शैक्षणिक मार्गदशन केले, शाळेच्या स्तरावरच स्पर्धा परीक्षेचे महत्व कळावे यासाठी विविध उपक्रम साई अकॅडमी राबवत असते.
नुकतेच साई कॉम्पिटिशन अकॅडमीतर्फे संचालक एनजी वसावे यांच्या हस्ते शिर्वे गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वही, पुस्तके आणि पेन वाटप करण्यात आले प्रमुख उपस्थिती गावातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य आणि असंख्य पद्धतीने गावकरी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य वाटपाची काही क्षणचित्रे
















