नाशिक| नाशिकपासून जवळच टोलनाक्याच्या अलीकडे महामार्गावरच माडसांगवी या निवांत ठिकाणी हॉटेल शिवार ग्राहकांच्या सेवेत रूजू झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि येणाऱ्या- जाणाऱ्या प्रवाश्यांना हक्काचे स्वादिष्ट आणि आवडीचे भोजनाचे ठिकाण उपलब्ध झाले आहे.
नाशिक हे विविध रुचकर पदार्थांसाठी सर्वत्र प्रसिध्द आहे, इथली मिसळ जशी राज्यभर प्रसिध्द आहे. तसेच येथील व्हेज आणि नॉनव्हेज भोजनही चवदार आणि ओळख वेगळी असलेलं आहे. येथे व्हेज, नॉनव्हेज थाळी मिळणारच आहे, तसेच मिसळ थाळीची चव खवय्यांना हवी हवीशी वाटेल, खास झणझणीत तर्रिदार रसा असलेली मिसळ खवय्यांच्या पसंतीस उतरेल, संपूर्ण परिवारासाठी हॉटेल शिवार एक निवांत आणि चांगले ठिकाण आहे. प्रशस्त बैठक व्यवस्था आणि मनोरंजनाची व्यवस्था असणार आहे. तसेच वेगळ्या धाटणीने तयार केलेले चिकन, मटण आणि त्यासोबत बाजरी, ज्वारी, आणि नागलीची भाकर जेवणाची लज्जत वाढवणारी आहे.
स्वादिष्ट, रुचकर भोजन हवे असेल तर चला मग आपल्या शिवारला! एकदा शिवारला भेट दिली की, पुन्हा आल्याशिवाय चैन पडणार नाही. त्यामुळे संपूर्ण फॅमिलीसह नागरिकांनी शिवारला एकदा तरी भेट द्यावी असे आवाहन संचालक संदिप दूनबळ यांनी व्यक्त केले. हॉटेल शिवारच्या शुभारंभाप्रसंगी पत्रकार मनोहर पाटील, अमोल सोनवणे, मंगेश कुलकर्णी, दीपक भावसार, धनंजय बोडके, दिगंबर मराठे आदींंनी भेट देेेऊन संचालक संंदीप दुनबळे यांना शुभेच्छा दिल्या.
